मुंबई Anil Patil on Rohit Pawar : शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आमदार रोहित पवार यांची उद्या (1 फेब्रुवारी) रोजी दुसऱ्यांदा ईडी कडून चौकशी केली जाणार आहे. रोहित पवार यांच्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यभर निदर्शनं करणार असल्याच्या कारणावरून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरद पवार गटावर निशाणा साधला आहे.
राज्यभर घंटानाद आंदोलन : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची 1 फेब्रुवारीला पुन्हा ईडी चौकशी होणार आहे. यनिमित्तानं कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारच्या विरोधात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय आणि तहसील कार्यालया समोर घंटा नाद केला जाणार असल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी दिली. यापूर्वी रोहित पवार यांची 24 जानेवारीला ईडीकडून तब्बल 10 तास चौकशी करण्यात आली होती. आता पुन्हा त्यांना गुरुवारी चौकशीला बोलावलं आहे. तसंच मुंबईतील कार्यलयासमोर कार्यकर्ते अन्नत्याग आणि घंटा नाद आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.
कुठलाच पक्ष तुमचं काहीच बिघडू शकणार नाही : रोहित पवार ईडी समोर पहिल्यांदा गेले त्यापूर्वी अनेक नेते देखील चौकशीला गेले. प्राजक्त तनपुरे, जयंत पाटील ईडी चौकशीला सामोरे गेले आणि बाहेर देखील आले. परंतु त्याचा पॉलिटिकल शो कोणी केला नाही. ईडीच्या माध्यमातून पॉलिटिकल शो करणं म्हणजे आम्ही केलेलं कर्तृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न असल्याची टीका रोहित पवार यांच्यावर अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी केलीय. भाजपाला दोष देणं, राज्यातील नेत्यांना दोष देणं हा केवळ पॉलिटिकल इव्हेंट आहे. माझी त्यांना विनंती आहे की, आपलं कर्तृत्व चांगलं असेल तर ईडीत तुम्हाला काहीही करणार नाही, शो करण्यापेक्षा आपल म्हणणं ईडीसमोर योग्य पद्धतीने मांडलं तर भाजपा काय कुठलाच पक्ष तुमचं काहीच बिघडू शकणार नाही.
हेही वाचा -