ETV Bharat / politics

राहुल शेवाळे यांची प्रचारात मुसंडी, महाविकास आघाडीचा वाद चव्हाट्यावर - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : शिवसेनेचा आणि मनसेचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे. स्थानिक प्रश्नांसाठी आपण सातत्यानं लढत आहोत म्हणून जनता पुन्हा एकदा आपल्यालाच संधी देईल, असा दावा त्यांनी केला. तर दुसरीकडं अनिल देसाई (Anil Desai) प्रचारासाठी आले असता त्यांच्याशी वाद घालून त्यांना विभागातून निघून जाण्यास काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाग पाडलं.

Rahul Shewale
राहुल शेवाळे (Mumbai Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 15, 2024, 9:29 PM IST

प्रतिक्रिया देताना राहुल शेवाळे (Mumbai Reporter)

मुंबई Lok Sabha Election 2024 : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा नायगाव, दादर, माहीम माटुंगा, सायन, चेंबूर, वडाळा या विभागांनी मिळून तयार झाला आहे. या विभागात संमिश्र लोकवस्ती आहे. झोपडपट्ट्यांमध्ये राहणारा वर्ग आहे तसाच उच्चभ्रू इमारतीत राहणारे नागरिकही आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. त्यामुळं उमेदवार भर उन्हातही प्रचार यात्रा काढत आहेत. या लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिल देसाई (Anil Desai) आणि शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्यात लढत पाहायला मिळत आहे. मात्र, सध्या तरी प्रचारात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी आघाडी घेतल्याचं चित्र आहे.

स्थानिकांच्या मुद्द्यांवरच लढणार : या मतदारसंघातून आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहोत. त्यामुळं स्थानिक मतदारांना आपल्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. या मतदारसंघातील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचे प्रश्न आहेत. बीडीडी चाळीच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे. या प्रश्नावर आपण सातत्यानं लक्ष देऊन आहोत तसंच या मतदारसंघातील तरुणांच्या रोजगाराबाबत आणि एकूणच धारावीतल्या उद्योगांबाबतही आपण सजग असून धारावी पुनर्वसनाच्या प्रश्नावरही सातत्यानं पाठपुरावा करत आहोत असं राहुल शेवाळे यांनी सांगितलं.

शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशीच लढत : या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळं विजय कोणाचा होणार असं विचारताच ते म्हणाले की, वास्तविक या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी लढत आहे. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या मतदारसंघात कुठेही अस्तित्वाला दिसत नाही. त्यामुळं आम्ही तर ही लढत शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशीच मानत आहोत. त्यामुळं या मतदारसंघात शिवसेना पक्षाचा निश्चित विजय होईल यात कुठलाच वाद नाही असं ते म्हणाले.

अनिल देसाईंना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा विरोध : या मतदार संघात प्रचारासाठी फिरत असलेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांना या मतदारसंघातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच विरोध केल्याची बाब समोर आलीय. पांजरापोळ चेंबूर येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अनिल देसाई यांना प्रचारासाठी आले असता त्यांच्याशी वाद घालून त्यांना विभागातून निघून जाण्यास भाग पाडलं. त्यामुळं महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. यासंदर्भात देसाई यांच्याशी संपर्क साधला असता अशा पद्धतीची कुठलीही घटना घडली नाही आणि महाविकास आघाडीमध्ये समन्वय असून सर्व एकदिलाने काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. अस्मितेसाठी महाराष्ट्र पेटून उठत नाही ही खंत - इतिहासतज्ञ इंद्रजीत सावंत; तर पंतप्रधानांनी महाराष्ट्राची माफी मागावी, विरोधकांची मागणी - Political Reaction on Jiretop
  2. दहा वर्षांत पालघरचा विकास ठप्प, आमदार राजेश पाटील यांचा आरोप; म्हणाले आमच्याकडे पालघरच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार - RAJESH PATIL ON PALGHAR
  3. प्रफुल पटेलांनी राज्यातील जनतेची माफी मागावी, अन्यथा...; संभाजी ब्रिगेडचा इशारा - Praful Patel

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.