ETV Bharat / politics

अमरावतीला फसवणूक नको विकास पाहिजे, विरोधकांची टीका; तर खासदारांनी शेकडो कोटींचा विकास केला, सत्ताधाऱ्यांचा दावा - Amravati Lok Sabha Constituency - AMRAVATI LOK SABHA CONSTITUENCY

Amravati Lok Sabha Constituency : अमरावती लोकसभा मतदारसंघात मागील काही वर्षांपासून विकासाचे प्रश्न प्रलंबितच असून खासदारांनी केवळ स्वप्नं दाखल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. तर मतदारसंघात शेकडो कोटी रुपयांचा विकास केल्याचा दावा महायुतीकडून करण्यात आलाय.

Amravati Lok Sabha Constituency
अमरावतीला फसवणूक नको विकास पाहिजे विरोधकांची टीका तर खासदारांनी शेकडो कोटींचा विकास केला, सत्ताधाऱ्यांचा दावा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 25, 2024, 5:46 PM IST

Updated : Apr 25, 2024, 9:10 PM IST

प्रतिक्रिया देताना माजी खासदार अनंत गूढे

अमरावती Amravati Lok Sabha Constituency : अमरावती लोकसभा मतदारसंघात तसंच जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून विकासाचे प्रश्न प्रलंबितच आहेत. गेल्या दहा वर्षात खासदारांनी केवळ स्वप्नं दाखवली काहीच केलं नाही असा आरोप विरोधकांनी केलाय. तर मतदारसंघात शेकडो कोटी रुपयांचा विकास केल्याचा दावा विद्यमान खासदारांच्या वतीनं करण्यात आलाय. अमरावतीमध्ये नेमके काय प्रश्न आहेत आणि काय राजकीय स्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी तसंच अमरावती लोकसभा मतदारसंघातील एकूणच राजकीय परिस्थिती आणि प्रलंबित विकास कामं या संदर्भात माजी खासदार अनंत गुढे, युवा स्वाभिमान पक्षाचे प्रवक्ते बाळू इंगोले आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अविनाश दुधे यांच्यासोबत 'ईटीव्ही भारत'नं चर्चा केली.

अमरावतीचा विकास रखडला - गुढे : अमरावती लोकसभा मतदारसंघातील विकासाचं गणित गेल्या दहा वर्षांमध्ये पूर्णपणे बिघडलेलं आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यानंतर विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी पूर्णतः विकासाकडं दुर्लक्ष केलंय. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही ही सर्वात मोठी समस्या आहे. मोदी यांनी आश्वासन दिलं होतं की शेतमालाला दीडपट भाव देऊ, मात्र त्यांनी योग्य हमीभाव सुद्धा दिला नाही. शेतकऱ्यांसाठी या सरकारनं तीन कायदे केले शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केला आंदोलन केलं, जीव दिला त्यानंतर सरकारला कायदे मागे घ्यावे लागले ही सरकारची नामुष्की आहे. मात्र, सरकार शेतकऱ्यांसाठी काहीही करताना दिसत नाही. सोयाबीन, तूर यांना हमीभाव मिळत नाही. त्यामुळं शेतकरी हवालदिल झालाय. नवनीत राणा यांनी आणि रवी राणा यांनी विकासाची कुठलीही कामं केलेलं नाहीत. केवळ या जिल्ह्यातील जमिनी हडपण्याचं काम केलं आहे. शासकीय जमिनी रेल्वेच्या जमिनी हडप करायच्या. हनुमान चालीसाचं नाटक करायचं याच्या पलीकडे त्यांनी काहीही केलं नाही असा आरोप अनंत गुढे यांनी केलाय. त्यामुळं यावेळी जनता त्रस्त झाली असून महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना प्रचंड मतानं निवडून देण्याचा निर्धार जनतेनं केला असल्याचंही गुढे यांनी सांगितलं. अमरावतीतील महत्त्वाचे प्रश्न असलेल्या टेक्स्टाईल पार्क मीनाक्षी आणि शकुंतला रेल्वे तसंच विमानतळ याबाबतीत गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. मात्र, त्याला यश आलं नाही आणि विद्यमान खासदारांनी त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोपही गुढे यांनी केलाय.

नवनीत राणा यांनी विकास केला : युवा स्वाभिमान पक्षाचे प्रवक्ते बाळू इंगोले म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून अमरावतीमध्ये निश्चित विकास झाला नव्हता, हे खरं आहे. परंतु, गेल्या पाच वर्षांमध्ये नवनीत राणा यांनी विकासाच्या विविध योजना अमरावती शहरात राबवल्यात. या योजनांच्या माध्यमातून त्यांनी गोरगरिबांपर्यंत विकासाची कामं केली आहेत. त्या दररोज सकाळी जनता दरबार भरवतात आणि या जनता दरबारात येऊन दररोज शेकडो लोक आपली गाऱ्हाणी मांडतात आणि सोडवणूक करुन घेतात. त्यांनीच अमरावतीमध्ये टेक्सटाईल पार्क आणलंय. विमानतळासाठी त्याच प्रयत्न करत आहेत. विमानतळ लवकरच सुरू होईल. तसंच शकुंतला रेल्वे आणि मीनाक्षी रेल्वेसाठीही त्यांचे प्रयत्न सुरू असून, रेल्वे वेगन फॅक्टरी त्यांनी सुरू केल्याचा दावा इंगोले यांनी केलाय. अमरावती जिल्ह्यात पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी आणि महायुतीची हवा आहे. त्यामुळं नवनीत राणा याच पुन्हा प्रचंड मतांनी निवडून येतील त्यात कुठलाही वाद नाही असं त्यांनी सांगितलं. राणा यांनी कुठंही जमीन हडपलेली नाही. शासकीय जमिनीवर मोठे प्रकल्प उभारणे म्हणजे जमीन हडपने नाही. नवनीत राणा यांच्यावर अर्वाच्च शब्दात टीका केली जाते. मात्र लोकांमध्ये जाऊन त्यांच्या उत्सवात सहभागी होणे म्हणजे नाच गाणे करणे नाही. लोकांमध्ये मिसळतात म्हणूनच लोक त्यांना मानतात असंही इंगोले यांनी सांगितलं.

नवनीत राणा म्हणजे खोटेपणा : यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अविनाश दुधे म्हणाले की, नवनीत राणा म्हणजे खोटेपणा असं समीकरण आता अमरावतीमध्ये रुढ झालंय. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी खोटं बोलून आणि दमदाटी करुन लोकांना फसवलय. त्यांनी मोक्याच्या जागा बळकावण्याचा प्रयत्न केलाय. नवनीत राणा म्हणजे केवळ शोबाजी आणि नौटंकी असंच आता सर्व जनतेचं मत तयार होऊ लागलंय. अमरावती लोकसभा मतदारसंघातील जर जातीय समीकरण पाहिलं तर अल्पसंख्याक समाज आणि दलित समाज हा काँग्रेसच्या मागे उभा असल्याचं चित्र आहे. त्याशिवाय भारतीय जनता पक्षातील कार्यकर्ते नाराज आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके हे विरोधात आहेत. त्यामुळं ही निवडणूक राणा यांच्यासाठी अत्यंत अडचणीची ठरणार आहे. राणा जी विकासाचं काम सांगत आहेत, ही विकासाची कामं गेल्या अनेक वर्षांपासून सुरू झालेली आहेत. आता ती अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळं त्याचं श्रेय घेण्याचं प्रयत्न राणा करत असतील तर ते योग्य नाही. यंदाच्या निवडणुकीत बच्चू कडू यांनी सुद्धा अत्यंत ताकदीचं आव्हान उभं केलंय. अमरावतीतील जनतेचा कल आणि एकूण मतांची गोळाबेरीज पाहिली तर सामाजिक कामाचा अनुभव आणि बच्चू कडू यांच्या प्रतिमेचा वापर होत असल्यानं दिनेश बुब या त्यांच्या उमेदवाराला चांगली मतं मिळतील. कदाचित बळवंत वानखडे पहिल्या क्रमांकावर दिनेश बुब दुसऱ्या आणि नवनीत राणा तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या जातील असा अंदाजही दुधे यांनी व्यक्त केलाय.

हेही वाचा :

  1. नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ अमित शाह सभा घेणार, पण मंडप पुन्हा सुटल्याने नागरिकांची तारांबळ - Amit Shah Amaravati Meeting
  2. अमरावतीत आज राजकीय दंगल; अमित शाह यांची सभा, बच्चू कडू यांची मिरवणूक - Ravi Rana Vs Bacchu Kadu
  3. नवनीत राणांविरोधात उद्धव ठाकरेंनी थोपाटले दंड; म्हणाले, 'बदला घेणारच' - Lok Sabha Election 2024

Last Updated : Apr 25, 2024, 9:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.