ETV Bharat / politics

नवनीत राणा यांचा पराभव का झाला? प्रवीण पोटे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देतं 'हे' सांगितलं कारण - Pravin Pote Resignation - PRAVIN POTE RESIGNATION

Pravin Pote Resignation : लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती वेगळ्याच वेळणावर गेल्याचं पाहायला मिळालंय. अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांचा पराभव झाल्यावर भाजपाच्या गोटात शुकशुकाट पसरला आहे. याप्रकरणी विधानपरिषद सदस्य प्रवीण पोटे यांनी अमरावतीच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

Navneet Rana
प्रवीण पोटे आणि नवनीत राणा (ETV BHARAT MH DESK)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 6, 2024, 11:23 AM IST

प्रतिक्रिया देताना प्रवीण पोटे (ETV BHARAT Reporter)

अमरावती Pravin Pote Resignation : अमरावती लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केल्यावर पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता प्रामाणिकपणं भाजपाच्या विजयासाठी प्रयत्न करीत होता. पक्षाचे सर्व मते हे नवनीत राणा यांना मिळालीत. जो काही वीस पंचवीस हजाराचा फरक पराभवासाठी कारणीभूत ठरला, त्यासाठी राणा यांचे काही जणांसोबत व्यक्तिशः असणारे मतभेद कारणीभूत ठरले असावेत, असा दावा, प्रवीण पोटे यांनी केला आहे.

नवनीत राणांच्या पराभवानंतर भाजपाच्या गोटात शुकशुकाट : अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांची उमेदवारी अमित शाह यांच्या गोटातून जाहीर झाली होती. अमरावतीच्या जागेला अतिशय महत्त्व आलं होतं. देशातील महत्त्वाच्या मतदारसंघापैकी एक अमरावती लोकसभा मतदारसंघ गणला जात असताना, नवनीत राणा यांचा पराभव झाल्यामुळं अमरावती भाजपाच्या गोटात शुकशुकाट पसरला. भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून आमदार प्रवीण पोटे यांनी या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत बुधवारी रात्रीच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना ईमेलद्वारे आपल्या पदाचा राजीनामा पाठवला.

अमरावतीत झालेल्या पराभवाची संपूर्ण जबाबदारी ही माझी आहे, यामुळं मी राजीनामा दिला. माझ्या पक्षातील अनेक वरिष्ठांनी राजीनामा देऊ नये या संदर्भात मला सांगितलं. मात्र, मी हा निर्णय घेतला आहे. आता विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुका होतील अशावेळी एखाद्या नव्या व्यक्तीनं ही जबाबदारी स्वीकारायला हवी असं माझं मत आहे. - प्रवीण पोटे, परिषद सदस्य

अमरावतीत मुस्लिम आणि दलितांच्या मतांची संख्या अधिक : अमरावती शहरात मुस्लिमांची सव्वा लाख मते आहेत. तर दलितांची जवळपास 90 हजार मतं आहेत. यापैकी दीड लाख मते ही काँग्रेसला पडली आहेत. यामुळं अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना मोठा फटका बसल्याचं चित्र दिसतंय. बडनेरात नवनीत राणा यांना चांगली मत पडली आहेत. याशिवाय तिवसा, अचलपूर आणि दर्यापूर या ठिकाणीदेखील काँग्रेस आघाडीवर आहे. "वास्तविक भाजपच्या मतांमध्ये वाढ झाली असून गतवेळीदेखील मुस्लिम आणि दलित मतांमुळंच युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा पराभव झाला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंबावर उभ्या असणाऱ्या नवनीत राणा या मुस्लिम आणि दलितांच्या मतांमुळंच निवडून आल्या होत्या," असं प्रवीण पोटे यांनी म्हटंलय.

हेही वाचा -

  1. उद्धव ठाकरे लवकरच मोदींसोबत असणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ; रवी राणा यांच्या दावा - Lok Sabha Election Results 2024
  2. "लहान मुलगासुद्धा सांगेल की नवनीत राणा..."; राणांच्या विजयावर आमदार बच्चू कडू यांचं भाकीत - Lok Sabha Election 2024
  3. 'असे खुंखार आम्ही घराबाहेर पाळतो', नवनीत राणा यांचं ओवैसींना सडेतोड प्रत्युत्तर - Navneet Rana Vs Asaduddin Owaisi

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.