नांदेड HM Amit Shah Rally : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नांदेड दौऱ्यावर येत आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी नरसी इथं जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक चव्हाण यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.
महायुतीचे अनेक नेते राहणार उपस्थित : खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचाराची सभा आज सायंकाळी 4 वाजता नायगाव तालुक्यातील नरसी इथं जाहीर सभा होणार आहे. भाजपाकडून या सभेची जय्यत तयारी करण्यात आलीय. नरसी येथील शासकीय विश्रामगृहाच्या समोरील मैदानावर होणाऱ्या या जाहीरसभेला राज्यसभा खासदार अजित गोपछडे, माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांताताई पाटील, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, डॉ. माधवराव किन्हाळकर यांच्यासह महायुतीच्या सर्व घटक पक्षांतील सर्व प्रमुख नेत्यांसह पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपानं दिलीय. अमित शाह यांच्या या जाहीर सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सभेसाठी भव्य सभामंडप उभारण्यात आलाय.
कॉंग्रेस उमेदवाराच्या बालोकिल्ल्यात सभा : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं गृहमंत्री अमित शाह यांची जिल्ह्यात पहिलीच जाहीर सभा होत आहे. तसंच या सभेसाठी महायुतीचे अनेक नेते हजेरी लावणार आहेत. यामुळं जिल्ह्यातील भाजपा महायुतीच्या कार्यकत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाल्याची प्रतिक्रिया भाजपाचे सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली. विशेष म्हणजे नांदेड लोकसभेचे काँग्रेस उमेदवार वसंतराव चव्हाण यांचा तालुका असणाऱ्या नायगाव जवळील नरसी इथं या सभेचं आयोजन करण्यात आलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यात काँग्रेसला गळती लागली आहे. आजच्या सभेत काँग्रेसचे काही नेते व कार्यकर्ते भाजपाच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. या भागातील काँग्रेसला मिळणाऱ्या मतांना खिंडार पाडण्याचा भाजपाकडून प्रयत्न असणार आहे.
हेही वाचा :