धुळे : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी बड्या नेत्यांची फौज सध्या महाराष्ट्राच्या मैदानात आहेत. दरम्यान, आज अमित शाह धुळ्यात होते. यावेळी बोलताना त्यांनी थेट इंदिरा गांधींचं नाव घेत काँग्रेसवर निशाणा साधला. धुळे जिल्ह्यातील चाळीसगाव येथे ते बोलत होते.
इंदिरा गांधी आल्या तरी... : प्रचार सभेत बोलताना अमित शाहांनी कलम 370 चा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, "काँग्रेसनं ज्या ज्या राज्यात सरकार बनवलं त्या राज्यांमध्ये त्यांनी दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत. हरियाणा निवडणुकीत राहुल गांधी सांगत होते आम्ही जिंकू, पण तिथं निकाल आमच्या बाजूनं आला. राहुल गांधी जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 परत लागू करण्याबद्दल बोलत आहेत, त्यांना सांगेन की, इंदिरा गांधी परत आल्या तरी जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 परत लागू करू देणार नाही. राहुल गांधी यांना सांगू इच्छितो की, तुमची चौथी पिढी आली, तरी मी कलम 370 पुन्हा लागू करून देणार नाही."
#WATCH | Jalgaon, Maharashtra: Addressing a public rally in Chalisgaon, Union Home Minister Amit Shah says, " the politics of congress is based on lies. they are saying that the investment in maharashtra decreased after the mahayuti government was formed... after the government of… pic.twitter.com/zKNhFObItl
— ANI (@ANI) November 13, 2024
उध्दव ठाकरे घरातून बाहेर पडत नव्हते : यावेळी बोलताना अमित शाहांनी उध्दव ठाकरेंवरही निशाणा साधला. "उध्दव ठाकरे कोरोना काळात कुठं होते? हा माझा त्यांना प्रश्न आहे. कोरोना काळात आम्ही जेव्हा दिल्लीत बैठक घ्यायचो, तेव्हा उध्दव ठाकरे घरातून बाहेर पडत नव्हते," असं म्हणत त्यांनी ठाकरेंनाही टोला लगावला.
महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येणं गरजेचं : "छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा 23 तारखेला सुफडा साफ होईल. राज्यातील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार पूर्ण भारतात एक नंबरचं सरकार आहे. महायुतीचं सरकार आल्यापासून महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यामुळं महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येणं गरजेचं आहे," असं अमित शाह म्हणाले.
मंगेश चव्हाणला निवडून द्या : महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांना निवडून देण्याचं आवाहनही अमित शाह यांनी केलं. "मंगेश चव्हाण एका मतदारसंघात 2300 कोटीची कामं करतो, हे उल्लेखनीय आहे. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भरपूर कामं झालीत. मंगेश चव्हाण यांनी केलेल्या कामाची यादी माझ्या मतदारसंघात दाखवली, तर मला माझ्या मतदारसंघात निवडून यायला अडचण होईल, इतकी कामं येथे झाली आहेत. मंगेश चव्हाणला निवडून द्या. त्याला मोठा माणूस बनवून दाखवतो," असं अमित शाह प्रचार सभेत बोलताना म्हणाले.
हेही वाचा