ETV Bharat / politics

'हट्ट कुणाचाही असो, हक्क तुमचाच'; साताऱ्याच्या उमेदवारीसाठी अजित पवार यांना कार्यकर्त्यांचा आग्रह - Ajit Pawar Group - AJIT PAWAR GROUP

Lok Sabha Elections : पुण्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची (Ajit Pawar Group) बुधवारी बैठक झाली. साताऱ्याच्या उमेदवारीवर तुमचाच हक्क असल्याची भावना कार्यकर्त्यांनी बैठकीत मांडली. तसच फलटणमधील कार्यकर्त्यांनी माढा मतदारसंघातील उमेदवार बदलण्याची मागणी केली.

Lok Sabha Elections
अजित पवार गट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 28, 2024, 3:25 PM IST

Updated : Mar 28, 2024, 3:54 PM IST

सातारा Lok Sabha Elections : : लोकसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं आहे. देशभरात येत्या 19 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील विविध पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. सातारा लोकसभा उमेदवारीवारीवरील दावा सोडायला अजित पवार गट तयार नाही. 'हट्ट कुणाचाही असो, हक्क तुमचाच असून साताऱ्याचा उमेदवार राष्ट्रवादीचाच (Satara Lok Sabha Seat) असावा', अशी भूमिका मांडत साताऱ्यातील कार्यकर्त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासमोर उमेदवारीचा आग्रह धरला.

उमेदवार राष्ट्रवादीचाच असावा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा लोकसभा उमेदवारीच्या संदर्भात मते जाणून घेण्यासाठी बुधवारी पुण्यात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. बैठकीला ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर, वाईचे आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण उपस्थित होते. साताऱ्याचा उमेदवार राष्ट्रवादीचाच असावा, तसेच माढ्याचा उमेदवार बदलावा, अशी मागणी त्यांनी केली.

लोक विचारपूर्वक निर्णय घेतात : विधानसभा निवडणुकीत लोक स्थानिक सोयीनुसार निर्णय घेत असतील. परंतु, लोकसभेला लोक विचारपूर्वक निर्णय घेतात, हे मागील निवडणुकीत दिसून आलय. राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्यात केवळ दोन आमदार असतानाही लोकसभेचा उमेदवार निवडून आला. जिल्ह्याचा राजकीय आढावा घेताना लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेच्या पूर्वीची स्थिती आणि नंतरची परिस्थिती ध्यानात घेण्यासारखी असल्याचं कराड तालुक्यातील एका ज्येष्ठ कार्यकर्त्यानं अजित पवार यांच्यासमोर उदाहरणासह स्पष्ट केलं.

हट्ट उदयनराजेंचा, पण हक्क अजितदादांचाच : पुण्यातील बैठकीत अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवारीसाठी आक्रमक झालेल्या उदयनराजेंचा नामोल्लेख टाळून संयमानं भूमिका मांडली. उमेदवारीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांचा हट्ट असला तरी उमेदवारीवर अजित पवार तुमचाच हक्क आहे. त्यामुळं उमेदवार राष्ट्रवादीचाच असावा, असा आग्रह उपस्थित कार्यकर्त्यांनी धरला.

हेही वाचा -

  1. आघाडीत बिघाडी! उद्धव ठाकरेंनी आघाडी धर्म पाळला नाही; बाळासाहेब थोरात यांची स्पष्टोक्ती - MVA meeting over seat sharing
  2. पाच वर्षात गडकरींच्या उत्पन्नात 116 टक्क्यांनी वाढ; वाचा महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरेंची किती आहे संपत्ती? - Nagpur Lok Sabha Constituency
  3. लोकसभेत एकमेकांविरोधात, मात्र समोर येताच अमोल कोल्हेंचा आढळराव पाटीलांना पाया पडून नमस्कार! - Shirur Lok Sabha Constituency

Last Updated : Mar 28, 2024, 3:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.