पुणे Aditya Thackeray Pune Visit : वरळीमध्ये अनधिकृत बांधकामाच्या विषयावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राडा झाला आहे. याबाबत शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांना विचारलं असता ते म्हणाले की, "मनसे हा सुपारीबाज पक्ष आहे. त्यांच्यावर मी काही बोलणार नाही. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांवर हल्ला केलाय. निवडणुका आल्या की ते सुरू होतात आणि मग झोपतात. अशा टपोरी लोकांवर लक्ष देऊ नये, पावसाळ्यात ज्याप्रमाणे छत्री येतात त्याचप्रमाणे मनसे निवडणुका आल्या की, दिसतात" असा टोला यावेळी आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
आदित्य ठाकरे पुणे दौऱ्यावर : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पुण्यातील पूरस्थिती असलेल्या एकता नगर भागातील रहिवाशांबरोबर संवाद साधला. यावेळी त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, मी नदी सुधार प्रकल्पाला स्थगिती दिली होती. त्याच ठेकेदारानं दिल्लीतही अशीच अवस्था करून ठेवली आहे. आज पुण्यात पावसामुळं जी परिस्थिती झाली झाली आहे. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. आमचं सरकार आलं की, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करू.
नदी सुधार प्रकल्प : अजित पवार यांच्याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारलं असता ते म्हणाले की, मी वेश बदलून लोकांना भेटायला आलो नाही. नदी सुधार प्रकल्पाबाबत आदित्य ठाकरे म्हणाले की, यासंदर्भात मी प्रेझेंटेशन यापूर्वी दिलेलं होतं. नदी सुधारला विरोध नाही, पण मी स्थगिती दिली होती त्यातील त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. पण तसं झालेलं नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसंच अधिकाऱ्यांना निलंबित करून प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी प्लॅन ऑफ ॲक्शन गरजेचा आहे.
हेही वाचा -
- मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवर आणि भ्रष्ट कंत्राटदारांवर आदित्य ठाकरेंचा संताप; दिला 'हा' इशारा - Aaditya Thackeray Mumbai PC
- "...त्याचवेळी फडणवीसांवर एफआयआर का नाही केला?" चंद्रशेखर बावनकुळेंचा अनिल देशमुखांना सवाल - Chandrashekhar Bawankule
- खोके सरकारनं अर्थसंकल्पात दाखवलं गाजर : आदित्य ठाकरेंची महायुती सरकारवर टीका - Aaditya Thackeray On budget