ETV Bharat / politics

मित्र असावा तर असा! निवडणुकीत मित्राचा विजय व्हावा म्हणून पठ्ठ्याचा बार्शी ते पुणे सायकलीवर प्रवास - Lok Sabha Election - LOK SABHA ELECTION

Lok Sabha Election : आपला मित्र उमेदवार असून त्या मित्रासाठी बार्शीतील एका पठ्ठ्यानं चक्क बार्शी ते पुणे सायकलीवर प्रवास करुन पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आपला मित्र जास्तीत जास्त मतांनी जिंकून यावा यासाठी बाप्पाच्या चरणी साकडं घातलंय.

Lok Sabha election
पठ्ठ्याचा बार्शी ते पुणे सायकलीवर प्रवास (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 4, 2024, 6:00 PM IST

निवडणुकीत मित्राचा विजय व्हावा म्हणून पठ्ठ्याचा बार्शी ते पुणे सायकलीवर प्रवास (ETV Bharat Reporter)

पुणे Lok Sabha Election : राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढत आहे. अनेक ठिकाणी तापमान 40 पार गेलं असून मोठ्या प्रमाणावर उन्हाचा चटका बसताना पाहायला मिळत आहे. त्यातच सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रमधुमाळी असून पहिल्या दोन टप्प्यातील मतदान हे पूर्ण झालंय आणि तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झालीय. दोन्ही टप्प्यांत अनेक भागात उन्हाच्या चटक्यामुळं मतदान कमी झालेलं पाहायला मिळालं. मात्र असं असलं तरी आपला मित्र उमेदवार असून त्या मित्रासाठी बार्शीतील एका पठ्ठ्यानं चक्क बार्शी ते पुणे सायकलीवर प्रवास करुन पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आपला मित्र जास्तीत जास्त मतांनी जिंकून यावा यासाठी बाप्पाच्या चरणी साकडं घातलंय.

बार्शी ते पुणे पायी प्रवास : राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत असून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिलीय. तर महायुतीनं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या अर्चना पाटील यांना उमेदवारी दिलीय. असं असलं तरी शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचे मित्र शौकत बार्शीकर यांनी चक्क बार्शी ते पुणे सायकलीवर प्रवास करत पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ओमराजे निंबाळकर जास्तीत जास्त मतांनी निवडून यावे यासाठी बाप्पा चरणी साकडं घातलंय.

काय म्हणाले बार्शीकर : याबाबत शौकत बार्शीकर म्हणाले की, "ओमराजे निंबाळकर हे माझे जिवलग मित्र असून, मित्रासाठी काही पण करण्यासाठी मी तयार आहे. माझा मित्र हा जास्तीत जास्त मतांनी निवडून यावा यासाठी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी प्रार्थना करण्यासाठी मी बार्शी ते पुणे सायकलीवर प्रवास केलाय. 1 मे रोजी मी बार्शी इथून निघालो होतो आणि आज तिसऱ्या दिवशी पुण्यात पोहोचलो असून बाप्पा चरणी साकडं घातलंय की माझा हा उमेदवार जास्तीत जास्त मतांनी निवडून यावा."

हेही वाचा :

  1. अमित शाहांपासून नारायण राणेंपर्यंत उद्धव ठाकरेंची चौफेर फटकेबाजी; नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर - Uddhav Thackeray Speech
  2. उत्तर मध्य मुंबईत आता होणार तिरंगी लढत, एमआयएमनं अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दिला उमेदवार - lok sabha election 2024
  3. "ज्यांच्या पाया पडून तुम्ही मुख्यमंत्री झालात..."; अमित शाहांचा उद्धव ठाकरेंसह शरद पवार अन् काँग्रेसवर हल्लाबोल - Amit Shah Sabha in Maharashtra

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.