ETV Bharat / politics

राज्यात 33 विद्यमान खासदार निवडणुकीच्या रिंगणात, अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार? - Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 48 जागांपैकी 33 जागांवर विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आलीय. त्यामुळं या अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार? याकडं सर्वांचंच लक्ष लागलंय.

33 sitting MP will contest Maharashtra Lok Sabha Election 2024
33 विद्यमान खासदार निवडणुकीच्या रिंगणात, अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार ? (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 6, 2024, 10:25 PM IST

मुंबई Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात लोकसभेच्या असलेल्या एकूण 48 जागांपैकी 33 जागांवर विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक 16 खासदार भाजपाचे असून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे 8 तर शिवसेना ठाकरे गटाचे 5 विद्यमान खासदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळं ही लढत अत्यंत चुरशीची होणार आहे.

खासदार हॅट्रिक करण्याच्या तर आमदार खासदारकीच्या प्रतीक्षेत : यंदाची निवडणूक ही सर्व बाजूंनी महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. मागील दोन वर्षात राज्यात बदललेली राजकीय समीकरणं, पक्षांतर्गत फोडाफोडी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना भेटणारी भावनिक साथ या कारणानं यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार निवडीवरून दोन्ही बाजूनी चांगलीच रस्सीखेच झालेली बघायला मिळाली. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघा दोन दिवसांचा कालावधी उरलेला असताना सुद्धा अनेक मतदारसंघात उमेदवारांची घोषणा झाली नव्हती. जिंकून येणाऱ्या उमेदवारास प्रथम प्राधान्य देण्यात येईल हा निकष दोन्ही बाजूंनी प्रामुख्यानं ठेवण्यात आला होता. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीनं काही प्रमाणात अंतर्गत वाद मिटवून उमेदवारांची घोषणा करण्यात आघाडी घेतली. तर महायुतीनं सध्याची बदललेली राजकीय समीकरण, एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाचा दबाव याकरता दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींशी विचार विनिमय करून उमेदवारांची घोषणा करण्यास उशीर जरी केला असला तरी सुद्धा विद्यमान 16 खासदारांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. विशेष म्हणजे मुंबईतील तिन्ही विद्यमान खासदारांचे त्यांनी पत्ते कट केले आहेत. यामध्ये उत्तर मुंबईचे खासदार गोपाल शेट्टी, उत्तर मध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजन, उत्तर पूर्व मुंबईचे खासदार मनोज कोटक यांचा पत्ता कट करण्यात आला असून उत्तर पूर्व मुंबई मधून आमदार मिहिर कोटेचा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलंय. तर चंद्रपूरमधून आमदार, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलंय.

भाजपाचे 'हे' उमेदवार हॅट्रिक करण्याच्या तयारीत :

सांगली - संजय काका पाटील

नंदुरबार - हिना गावित

धुळे - सुभाष भामरे

रावेर - रक्षा खडसे

वर्धा - रामदास तडस

नागपूर - नितीन गडकरी

भिवंडी - कपिल पाटील

गडचिरोली-चिमूर- अशोक नेते

ठाकरे गटाकडून यांना मिळालंय तिकीट :

रत्नागिरी - सिंधुदुर्ग - विनायक राऊत

ठाणे - राजन विचारे

परभणी - संजय जाधव

मुंबई दक्षिण - अरविंद सावंत

धाराशिव - ओमराजे निंबाळकर

या विद्यमान खासदारांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं असून ओमराजे निंबाळकर सोडता इतर चारही उमेदवार यंदा हॅट्रिकच्या तयारीत आहेत.

बदललेली राजकीय समीकरणे आणि जागा : महाराष्ट्रातील यंदाची लोकसभा निवडणूक ही अनेक कारणानं देशासाठी महत्त्वाची ठरणार आहे. विशेष करून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये पक्षांतर्गत पडलेली फुट, या फुटीनंतर बदललेली राजकीय समीकरणं, निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये प्रचाराच्या रणधुमाळीत छेडले गेलेले विषय, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, उद्धव ठाकरे, शरद पवार कुटुंबातील भावनिक मुद्दे, हे सर्व पाहता जनतेचा कौल नेमका कोणाच्या बाजूनं असेल हे सांगणं इतकं सोप्प नाही. ठाकरे गट 21 जागा लढवत असून शिवसेना एकनाथ शिंदे गट 15 जागा लढवत आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा लढवत असून राष्ट्रवादी अजित पवार गट 4 जागा लढवत आहे. शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे या विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलीये. तर अजित पवार गटाकडून त्यांचे एकमेव विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व घडामोडी पाहता एकूण 33 विद्यमान खासदारांपैकी किती खासदार आपलं अस्तित्व टिकवण्यात यशस्वी होतात यावर बरंच काही अवलंबून आहे.

यंदा चित्र बदलणार : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना राजकीय विश्लेषक जयंत माईणकर म्हणाले की, विद्यमान 33 खासदारांपैकी बऱ्याच खासदारांना यंदा निवडणुकीत पराभवाला सामोरं जाण्याची शक्यता जास्त आहे. विशेष करून राज्यात यंदा महायुतीला बऱ्यापैकी फटका बसणार आहे. याचं कारण राज्यात बदललेली राजकीय समीकरणं आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे यंदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मदतीला मुस्लिम आणि दलित मतांची साथ असणार आहे. तसंच बारामती मतदारसंघात शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे या कुठल्याही परिस्थितीमध्ये हॅट्रिक करतील. हे मतदान 7 मे ला तिसऱ्या टप्प्यात होत असून बारामतीमध्ये झालेला चमत्कार अनेक मतदारसंघांमध्ये होणार आहे. तसंच उद्धव ठाकरे यांना ज्या परिस्थितीमध्ये वर्षा बंगला सोडावा लागला ती परिस्थिती किंवा ते चित्र अजूनही बाळासाहेब ठाकरे यांच्या अस्सल शिवसैनिकांच्या मनातून किंवा नजरेतून सुटलेलं नाही. म्हणूनच उद्धव ठाकरे यांना या निवडणुकीत भावनिक मुद्द्याचा बऱ्यापैकी फायदा होणार आहे. महायुतीच्या नेत्यांनी कितीही सांगितलं तरी सुद्धा यंदाची निवडणूक ही नरेंद्र मोदी यांच्यासाठी वाटते तितकी सोप्पी नसून महाराष्ट्रातून तरी हे चित्र बदलणार आहे, असंही माईणकर यावेळी म्हणाले.

हेही वाचा -

  1. मडकं फोडतात विरोधक, मात्र फायदा होतो शरद पवारांनाच! विरोधकांनी मडकं फोडून जनतेत निर्माण केलाय असंतोष - Lok sabha election 2024
  2. नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, ठाकरेंच्या भाषणामुळं मत परिवर्तन होईल? - Lok Sabha Election 2024
  3. आजपासून प्रियंका गांधी घेणार अमेठी, रायबरेलीची सूत्रं हाती; दोन वॉररूममधून सुरू केलं काम - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.