ठाणे Lok Sabha Election 2024 : निवडणुकीच्या कामावर नेमलेले ठाणे जिल्ह्यातील ३२ हजार अधिकारी, कर्मचारी (Government Employees) आणि पोलीस कर्मचारी टपाली मतदानाद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानाच्या दिवशी प्रत्यक्षात मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करणं शक्य नसल्यानं त्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय. ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघातील अधिकारी आणि कर्मचारी टपालाच्या माध्यमातून आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
टपाली मतदानाची केली सोय : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण तसेच ठाणे या लोकसभा मतदार संघामध्ये पाचव्या टप्पात निवडणुका होणार आहेत. या अनुषंगानं ठाणे जिल्ह्यामध्ये निवडणूक कामासाठी नेमणूक झालेले 32 हजार अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या आहे. यामध्ये पोलिसांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय.
फॉर्म 12 डी उपलब्ध : भारतीय निवडणूक आयोगाकडील सुचनेनुसार निवडणूक कर्तव्यार्थ असलेले अधिकारी आणि कर्मचारी, तसेच अत्यावश्यक सेवेत असलेल्या अधिकारी, कर्मचारी, तसेच पोलीस कर्मचारी यांना पोस्टानं मतपत्रिका न पाठविता पोस्टल फॅसिलिटेशन सेंटर तसेच पोस्टल वोटिंग सेंटरमध्ये मतदान करुन घेता येणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर फॉर्म 12 आणि फॉर्म 12 डी उपलब्ध केले आहेत. अद्याप बऱ्यांच कर्मचाऱ्यांचं टपाली मतपत्रिकेचं अर्ज येणं बाकी आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीचं काम त्यांच्या मतदार संघामध्येच मिळणार आहे, असं कर्मचारी इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेटचा वापर करून आपल्या पोलिंग बूथवर मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती, निवडणूक विभागाच्या वतीनं देण्यात आली.
मूलभूत अधिकार बजावता येणार : मतदानाच्या कामासाठी अधिकारी याचं मत वाया जाऊ नये, म्हणून सरकारनं निवडणूक आयोगाचं मदतीनं कर्मचाऱ्यांसाठी केलेली ही विशेष व्यवस्थेचा फायदा घेऊन तीस हजार कर्मचाऱ्यांना मतदान करण्याचा हक्क बजावता येणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण देशभरात व्यवस्था करण्यात आली असून मतदानाचा टक्का यामुळं वाढण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा -
- पूर्व नागालँडच्या सहा जिल्ह्यांमध्ये २० आमदारांसह एकानंही केलं नाही मतदान, शून्य टक्के मतदानाचं कारण तरी काय? - Lok Sabha Election 2024
- दिव्यांग व्यक्ती काम करत असलेले स्वतंत्र मतदान केंद्र, निवडणूक आयोगाचा अनोखा उपक्रम - Handicapped Voting Centre
- मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी? काय आहे मतदारसंघाचा इतिहास? - Mumbai North East Lok Sabha