नवी दिल्ली Teesta Water Management Project : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना पुढील आठवड्यात चीन दौऱ्यावर जाणार आहेत. त्यापूर्वी चीननं त्यांना सुखद धक्का दिला आहे. बांगलादेशनं तीस्ता नदी व्यवस्थापन आणि जीर्णोद्धार प्रकल्पाबाबत कोणतीही भूमिका घेतल्यास चीन त्याचं स्वागतचं करेल, असं चीनच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यासाठी ही स्वागतार्ह बाब आहे. विशेष म्हणजे भारतानं या प्रकल्पात स्वारस्य दाखवल्यानं अभ्यास करण्यासाठी तांत्रिक टीम पाठवण्याची घोषणा केल्यानंतर चीनचं हे स्पष्टिकरण आलं आहे. मागील महिन्यात शेख हसिना यांच्या नवी दिल्ली भेटीदरम्यान भारतानं हा निर्णय जाहीर केला.
बांगलादेशसोबत चांगले संबंध राखण्यास चीन तयार : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी भारत भेटीवर असताना भारतानं तीस्ता नदी प्रकल्पाविषयी स्वारस्य दाखवलं. त्यानंतर गुरुवारी ढाका इथं बांगलादेशातील चीनचं राजदूत याओ वेन यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले की, बांगलादेश जोपर्यंत TRCMRP बाबत निर्णय घेत आहे, तोपर्यंत त्यांच्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध राखण्यास मदत होत असेल, तर चीन याबाबत तयार आहे. ढाका इथल्या प्रसारमाध्यांनी याओ वेन यांच्या हवाल्यानं याबाबतची माहिती दिली. “बांगलादेशसाठी जर TRCMRP हा प्रकल्प जर अनुकूल असेल, तर आम्ही बांगलादेशची भूमिका स्वीकारण्यास तयार आहोत. त्यामुळे यापुढं या प्रकल्पावर काय भूमिका घ्यायची हे पूर्णपणे बांगलादेशवर अवलंबून आहे."
चीन आहे भारतासोबत काम करण्यास इच्छुक ? : चीनचे बांगलादेशमधील राजदूत याओ वेन यांनी ढाका इथं प्रसारमाध्यमांना माहिती दिली. यावेळी त्यांना TRCMRP या प्रकल्पावर चीन भारतासोबत काम करण्यास इच्छुक आहे का, असं विचारलं. यावेळी "मी म्हणालो की हे पूर्णपणे बांगलादेशनं ठरवायचं आहे. आम्ही कोणत्याही भूमिकेसाठी तयार आहोत. आम्हाला बांगलादेशचे शेजारील देशांशी चांगले संबंध आहेत, हे पाहायचं आहे. तुम्हाला माहिती आहे, हे तुमच्या परराष्ट्र धोरणाचं यश आहे." बांगलादेशच्या विनंतीनुसार चीननं तिस्ता नदीच्या सततच्या जलसंकटाचा सामना करण्यासाठी अभ्यास केला. चायनीज पॉवर कॉर्पोरेशननं TRCMRP या प्रकल्पाचा अहवाल सादर केला. त्यानंतर बांगलादेशच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या अहवालाला मान्यता दिली. या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी चीननं बांगलादेशला 1 अब्ज डॉलर्सचं कर्जही देऊ केलं.
काय आहे बांगलादेशचा TRCMRP तीस्ता प्रकल्प ? : तीस्ता नदीमुळे बांगलादेशात शेतकरी सुजलाम सुफलाम झाला आहे. मात्र ही नदी बांगलादेशात प्रवेश करण्यापूर्वी भारताच्या सिक्किम आणि पश्चिम बंगालामधून वाहते. तीस्ता नदीची एकूण लांबी 414 किमी आहे. मात्र यापैकी 151 किमी ती सिक्किममधून तर 142 किमी ती पश्चिम बंगालमधून वाहते. बांगलादेशात तीस्ता नदीची लांबी 121 किमी आहे. तीस्ता नदीवर करोडो लोकांची उपजिविका अवलंबून आहे. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीस्ता नदीच्या पाणी वाटपावरुन आक्षेप घेतला आहे. त्यामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यात वाद निर्माण झाला. तीस्ता नदी बांगलादेशासह भारतातही सिंचन, पिण्याचे पाणी आणि जैवविविधता टिकवण्यासाठी महत्त्वाची आहे. मात्र आता तीस्ता नदीला हंगामी पाण्याची टंचाई, गाळ आणि प्रदूषणासारख्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं. यामुळे तीस्ता नदीचं संवर्धन आणि व्यवस्थापन करणं बांगलादेशी सरकारसाठी एक गंभीर समस्या बनली आहे. TRCMRP या प्रकल्पाची सुरुवात बांगलादेश सरकारनं जलस्रोत व्यवस्थापन, पूर नियंत्रण आणि व्यवस्थापन, इकोसिस्टम जीर्णोद्धार, प्रदूषण नियंत्रणासाठी केली. यामध्ये कृषी, औद्योगिक आणि घरगुती वापरासाठी पाण्याचं शाश्वत आणि वितरण करण्याचा सहभाग आहे. पावसाळ्यात महापूर टाळण्यासाठी उपाययोजना राबवणं आणि टंचाईच्या काळात पाण्याचा प्रवाह व्यवस्थापित करणं हे देखील या प्रकल्पाचा भाग आहे. जैवविविधतेला पाठिंबा देऊन पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी नदीला पुनर्संचयित करणं, कठोर नियमांद्वारे प्रदूषण पातळी कमी करणं आणि उद्योगाला प्रोत्साहन देणं यावर हा प्रकल्प निगराणी राखणार आहे.
चीनच्या धोरणामुळे भारताला का वाटली पाहिजे काळजी ? : बांगलादेशातील चीनच्या प्रभावानं दक्षिण आशियातील भारताचा पारंपरिक प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. बांगलादेश चीनच्या जवळ गेल्यानं ढाक्यातील भारताचा प्रभाव कमी होऊ शकतो. त्यामुळे भारताच्या नेतृत्वातील प्रादेशिक सहकार्य उपक्रमांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास दक्षिण आशियातील भारताच्या धोरणात्मक हितसंबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. TRCMRP या प्रकल्पामुळे चीन-बांगलादेश यांच्यातील वाढत्या संबंधांमुळे इतर दक्षिण आशियाई देशांना चीनसोबत जवळकीचे संबंध शोधण्यास प्रोत्साहन मिळू शकते. त्यामुळे या प्रदेशातील भारताचा प्रभाव आणखी कमी होईल. त्यामुळे या प्रदेशात चीन एक प्रबळ देश म्हणून उदयास येईल. भारताला सिलीगुडी कॉरिडॉरजवळ TRCMRP सारख्या मोठ्या प्रकल्पात आरक्षण असल्याचं मानलं जाते. या प्रकल्पाला ईशान्य भारताला उर्वरित देशाशी जोडणारा चिकन नेक म्हणूनही ओळखलं जाते. हा कॉरिडॉर भारत-चीन सीमेजवळ आहे. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयानं असंही म्हटले आहे की, "बांगलादेश या प्रस्तावावर कार्यवाही करताना भू-राजकीय समस्या लक्षात घेईल."
TRCMRP प्रकल्पात भारत बांगलादेशला काय देणार मदत ? : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शेख हसिना यांच्यात मागील महिन्यात नवी दिल्लीत भेट झाली. या दोघात झालेल्या चर्चेनंतर भारतानं TRCMRP चा अभ्यास करण्यासाठी तांत्रिक टीम पाठवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान शेख हसीना यांनी संयुक्त प्रसारमाध्यमांना संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, “चौपन्न समान नद्या भारत आणि बांगलादेशला जोडतात. आम्ही पूर व्यवस्थापन, पूर्व चेतावणी आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पांवर सहकार्य करत आहोत. आम्ही 1996 च्या गंगा जल कराराच्या नूतनीकरणासाठी तांत्रिक स्तरावर चर्चा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशातील तीस्ता नदीचं संवर्धन आणि व्यवस्थापन यावर चर्चा करण्यासाठी एक तांत्रिक पथक लवकरच बांगलादेशला भेट देईल.” भारत बांगलादेशातील रंगपूर इथं सहायक उच्चायुक्तालय उघडणार असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं. TRCMRP रंगपूरच्या परिसरात येत असून हा प्रकल्प बांगलादेशच्या हद्दीत आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना याबाबत काहीही म्हणता येणार नाही. त्यामुळे भारतानं प्रभावीपणे चीनला रोखलं आहे.
भारताच्या ऑफरला शेख हसीनानं कसा दिला प्रतिसाद ? : नवी दिल्लीहून ढाका इथं परतल्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी "बांगलादेश भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या प्रस्तावांवर विचार करेल. आम्ही तिस्ता प्रकल्प हाती घेतला. चीननं प्रस्ताव दिला असून भारतानंही आम्हाला प्रस्ताव दिला आहे. आम्ही दोन्ही प्रस्तावांचं मूल्यमापन करून आमच्या नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनं सर्वात फायदेशीर आणि स्वीकारार्ह असा प्रस्ताव स्वीकारू.” बांगलादेश विकासाच्या गरजांवर आधारित मैत्री कायम ठेवतो. जेव्हा आम्हाला प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर आमच्यासाठी अनुकूलता, कर्जाची परतफेड करण्याची आमची क्षमता, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आम्हाला मिळणारा परतावा आणि त्याचा आमच्या देशातील लोकांना कसा फायदा होईल, यासारख्या घटकांचा विचार करतो," असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. "बांगलादेशमध्ये तीस्ता नदीच्या पाणीवाटपाचा भारतासोबत दीर्घकाळचा मुद्दा आहे. त्यामुळे भारतानं तीस्ता प्रकल्प केल्यास बांगलादेशसाठी ते सोपं होईल," असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा :