ETV Bharat / opinion

डॉक्टर्स डेवर डॉक्टर काय म्हणतात, वाचा प्रसिद्ध डॉक्टर पी रघुराम यांचे विवेचन - DOCTOR ON DOCTORS DAY - DOCTOR ON DOCTORS DAY

National Doctor Day : आज राष्ट्रीय डॉक्टर्स डे. यानिमित्त ज्यांच्या नावाने हा दिवस साजरा केला जातो त्या डॉक्टर रॉय पुरस्काराने सन्मानित डॉ. पी. रघुराम यांनी एका डॉक्टरचं मनोगत व्यक्त केलं आहे. डॉक्टरांनी समाजाप्रति कसं योगदान दिलं पाहिजे याबाबत आपले अनुभव आणि मत व्यक्त केलं आहे.

National Doctor Day
राष्ट्रीय डॉक्टर्स डे (कॉन्सेप्ट इमेज (Getty Images))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 1, 2024, 6:58 PM IST

मुंबई - National Doctor Day : डॉ बी.सी. रॉय, भारतरत्न पुरस्कारप्राप्त, दिग्गज चिकित्सक, परोपकारी, शिक्षणतज्ञ आणि भारतातील सर्वाधिक काळ काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांपैकी एक. डॉक्टर बी.सी.रॉय यांनी आयुष्यभर आरोग्य सेवा सुधारण्यासाठी अथक परिश्रम घेतले. आजचा डॉक्टर्स डे हा डॉ. रॉय यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. तसंच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्या सर्व डॉक्टरांना, जीवन बदलणे आणि त्यांच्या कौशल्यानं असंख्य जीव वाचवण्याचा उद्देश असतो. 33 वर्षांपूर्वी (1991), मी डॉक्टर म्हणून पदवीधर झालो, अगदी त्याच वर्षी भारतानं डॉक्टर्स डे साजरा करण्यास सुरुवात केली! मला डॉ. बी.सी. रॉय नॅशनल अवॉर्ड (2017), हा सर्वोच्च सन्मान मिळाला आहे. त्यामुळे या दिनाचं माझ्यासाठी आणखीन महत्व वाढतं.

डॉक्टर्स डे : भारतात प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांसाठी हा दिवस आणखी खास आहे. असाधारण वचनबद्धतेचा स्वीकार करण्याचा हा एक महत्त्वाचा दिवस आहे. "वैद्यो नारायणो हरी" म्हणजे डॉक्टर म्हणजे, भगवान नारायण आणि भगवान हरि स्वयें। काही प्रदेशांमध्ये, विशेषतः ग्रामीण भारतात, डॉक्टरला देवाप्रमाणे मानले जाते. डॉक्टरवर रुग्ण विश्वास ठेवतात आणि त्यांचे जीवन त्यांच्या हातात देतात. रुग्ण डॉक्टरांवर विश्वास ठेवतात आणि त्यांचे शरीर डॉक्टरांच्या हातात देतात. अनेकदा आपल्या मित्रांनाही जी माहिती लोक देत नाहीत ती शारीरिक व्याधीसंदरभातील सर्व माहिती ते डॉक्टरांना देतात. शिवाय, लोक त्यांचं शरीर तपासणीसाठी डॉक्टरपुढे पूर्णपणे उघड करतात. अनेकदा संपूर्णपणे अनोळखी डॉक्टरकडे स्वतःवर शस्त्रक्रिया करण्याची आपलं शरीर सोपवतात. इतर कोणत्याही व्यवसायात, एखाद्या व्यक्तीला नियमित सलोख्यानं अत्यंत विश्वास मिळतो. त्यापेक्षा कैकपटीनं जास्त विश्वास डॉक्टरांना अनुभवायला मिळतो. या विश्वासासा प्रत्येक डॉक्टरनं जागलं पाहिजे.

याच कारणास्तव डॉक्टरांना उच्च पातळीवरील नैतिक आचारसंहिता असणे बंधनकारक आहे आणि तो तो डॉक्टरचा विशेषाधिकार आहे या समजून घेतलं पाहिजे. दुर्दैवाने, गेल्या काही वर्षांपासून, विविध कारणांमुळे, डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील परस्पर विश्वासात झपाट्याने घट होत आहे, ही परिस्थिती रुग्ण आणि डॉक्टर दोन्हीसाठी चांगली नाही. डॉक्टरांनी गमावलेला विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी एकत्र काम करणं गरजेच आहे. हे अनोखं नातं अधिक दृढ करण्यासाठी डॉक्टर्स डे पेक्षा चांगला दिवस दुसरा असूच शकत नाही.

क्लिनिकल क्षमता आणि प्रभावी संवाद ही प्रत्येक डॉक्टरसाठी आवश्यक कौशल्ये आहेत. अलिकडच्या काळात, जेव्हा डॉक्टर-रुग्ण संबंध गंभीर ताणतणावातून जात आहेत, तेव्हा संभाषण कौशल्ये अधिक महत्त्वाची बनतात. रुग्ण डॉक्टरांच्यामध्ये जसा योग्य संवाद गरजेचा आहे, त्याचवेळी नियमितपणे तपासणीच्या निमित्तानंही योग्य संवाद रुग्णाच्या बरोबर साधला गेला पाहिजे. आजच्या ब्रेकिंग न्यूजच्या जमान्यात मीडियाला संबोधित करण्यासाठीदेखी संवाद कौशल्ये सर्व प्रकारे सर्वोत्तम असणे आवश्यक आहे.

जरी नीतिशास्त्र; संप्रेषण कौशल्यांना संपूर्ण पाश्चात्य जगामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमात एक स्थापित स्थान आहे, ते अलीकडेपर्यंत भारतीय वैद्यकीय अभ्यासक्रमाचा भाग नव्हते. तथापि, 2019 मध्ये, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने नवीन सक्षमता आधारित वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रम (CBME) मध्ये वैद्यकीय नीतिशास्त्राचा समावेश केला. “ॲटिट्यूड, एथिक्स अँड कम्युनिकेशन” (AETCOM) मॉड्यूलचे उद्दिष्ट डॉक्टरांसाठी आवश्यक असलेले ज्ञान, वृत्ती आणि मूल्ये विकसित करणे आहे.

वैद्यकीय नीतिमत्ता प्रत्येक डॉक्टरनं बाळगली पाहिजे यात वादच नाही, त्याचवेळी समाजात वावरतानं डॉक्टरांची जबाबदारी अधिक वाढते त्यांना सामाजिक स्तरावरही नैतिकता अधिक कठोरपणे पाळणं गरजेचं आहे. डॉक्टर कितीही हुशार, ज्ञानी आणि कुशल असला तरीही, त्याच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये नैतिक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याशिवाय आपल्या कोणत्याही कामगिरीला महत्त्व राहणार नाही. म्हणून, डॉक्टर एक चांगला माणूस असणे सर्वात महत्वाचे आहे. या क्षेत्रात खूप संधी आहेत, अगदी कमी स्पर्धा आहे. उत्तुंग नितीमत्तेचा विचार करता रामोजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रामोजी राव यांचा येथे उल्लेख करणे उचित आहे. ते नीतिमत्तेचे प्रतिक आणि भारताचे आदर्श नागरिक होते.

डॉक्टर हे समाजात आदर्श असले पाहिजेत. वैद्यकीय व्यवसाय औषध/शस्त्रक्रियेचे विज्ञान म्हणजे "रॅट-रेस" नाही. डॉक्टर म्हणून आयुष्यात बरेच करण्याजोगे काही नाही असे नाही. समाजाला लाभदायक अशा अर्थपूर्ण गोष्टीमध्ये डॉक्टरांनी हिरीरीनं सहभागी झालं पाहिजे. आपल्या लोकसंख्येपैकी 70% पेक्षा जास्त लोक ग्रामीण भागात राहतात. भारतात 6,00,000 गावे आहेत. माझी इच्छा आहे की ज्यांच्याकडे संसाधने आहेत अशा 6 लाख सधन लोकांनी 6 लाख गावे दत्तक घेतल्यास, अमृत काळात येणारी 25 वर्षे निःसंशयपणे स्वप्ने, उद्दिष्टे पूर्ण करण्याची सुवर्णसंधी ठरेल. भारतभरातील असंख्य लोकांच्या डॉक्टरांकडून असलेल्या आकांक्षा डॉक्टरांनी वेळोवेळी पूर्ण केल्या पाहिजेत. स्तनाच्या कर्करोगावर मात केलेल्या माझ्या आईची काळजी घेणे आणि माझ्या मातृभूमीची सेवा करणे हे एक आदर्श उदाहरण सांगता येईल, जे एकप्रकारे आशीर्वाद आहे. माझ्या दत्तक गावात (इब्राहिमपूर) वैयक्तिक परोपकाराच्या माध्यमातून जीवनात परिवर्तन घडवून आणणाऱ्या धर्मादाय उपक्रमांचं नेतृत्व करण्यासोबतच जवळपास दोन दशकांपासून अधिक काळ प्रभावीपणे स्तन कर्करोग निदान मोहिमेने मला सर्वात जास्त समाधान दिलं आहे.

डॉक्टर्स डेच्या निमित्ताने, मी स्वतःला हिप्पोक्रॅटिक शपथेतील एका महत्त्वाच्या घटकाची आठवण करून देऊ इच्छितो - आणि तो म्हणजे 'रुग्णाचे भले करणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य आहे'. शेवट करताना, 1953 मध्ये सर रॉबर्ट हचिसन या दिग्गज डॉक्टरांनी लिहिलेल्या वाक्याचा पुनरुच्चार करुन यापेक्षा योग्य प्रार्थनेचा मी विचार करू शकत नाही. सुमारे 70 वर्षांपूर्वी त्यांनी जे सांगितले ते आजही प्रासंगिक आहे.

हेही वाचा :

योग्य आरोग्यासाठी प्लम्सचा करा आहारात समावेश - 5 benefits of plums

सक्रिय राहू इच्छिता, तर करा 'हा' व्यायाम - monday motivation

'जागतिक रक्तदाता दिवस'!जाणून घ्या रक्तदानाचे फायदे - WORLD BLOOD DONATION DAY

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.