हैदराबाद Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक निकाल 2024 मध्ये भारतीय जनता पार्टीला अपेक्षित यश मिळालं नाही. भाजपानं लोकसभा निवडणूक 2024 मध्ये 400 जागा जिंकण्याच्या वल्गना केल्या होत्या. मात्र त्यांना केवळ 240 जागांवरचं समाधान मानावं लागलं. भारतीय जनता पार्टीनं 400 जागा जिंकल्या नाहीत, मात्र तरीही भाजपां मित्रपक्षांच्या मदतीनं देशात सरकार स्थापन केलं. मागील दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अधिक जागा मिळवतील अशी अपेक्षा भाजपाला होती. मात्र अपेक्षित निकाल लागले नाहीत. आता केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन झालं आहे. आता भाजपाला नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू आणि जयंत चौधरी यांच्यावर अवलंबून रहावं लागणार आहे. हे तीनही धर्मनिरपेक्ष पक्ष असल्यानं भाजपाला त्यांच्याशी जुळवून घेणं गरजेचं आहे.
भारतीय जनता पार्टीचं सरकार एनडीएच्या घटक पक्षांवर अवलंबून : भारतीय जनता पक्षानं आश्वासन दिल्याप्रमाणं 400 जागा जिंकल्या नाहीत. मात्र तरीही भाजपा दिल्लीत सरकार स्थापन केलं. गेल्या 10 वर्षात देशानं जे काही पाहिलं त्यापेक्षा वेगळा निकाल लागला. मंगळवारी संपलेल्या निवडणूक लढतीनंतर स्थापन होणारं एनडीएचं सरकार अनेक अर्थांनी वेगळं असणार आहे. भारतीय जनता पार्टी युतीचं सरकार नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू आणि जयंत चौधरी या तीन धर्मनिरपेक्ष मित्रपक्षांवर अवलंबून राहणार आहे. एनडीए सरकारला कारभार चालवण्यासाठी एक समान किमान कार्यक्रम (CMP) तयार करावा लागणार आहे. या लोकसभा निवडणुकीत केवळ 400 जागा जिंकण्याचंच नव्हे, तर 2047 पर्यंत सत्तेत राहण्याचं भाजपाचं स्वप्न होतं. मात्र भाजपा या निवडणूक निकालात निराशेच्या स्थितीत कसा पोहोचला ? त्यासाठी भाजापाला निवडणुका आणि लोकशाहीचा अर्थ समजून घेऊन भविष्यात वाटचाल करावी लागणार आहे. भाजपाच्या नेत्यांनी केलेल्या बेताल वक्तव्यानं 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'इंडिया' आघाडीनं त्यांना या निवडणुकीत मोठी धावपळ केली. त्यामुळे इंडिया आघाडीनं जिथं तडजोड केली नाही, तिथं त्यांना धक्का बसला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाधिकारशाहीनं वागले : भाजपानं राम मंदिर उभारलं, मात्र त्याचा त्यांना जास्त फायदा झाला नाही. त्यामुळे एकाधिकारशाहीनं वागल्याचं उत्तर प्रदेश हे चांगलं उदाहरण आहे. एकाधिकारशाहीनं वागणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याशिवाय कोणीही स्पर्धेत नसल्यासारखं वागले. त्यामुळे पक्षाच्या अन्य उमेदवाराला महत्त्व आलं नाही. मात्र भाजपाच्या या नितीला मतदारांनी स्वीकारलं नाही. मतदारांनी उमेदवारांना त्यांच्या मतदारसंघातील कामगिरीनुसार न्याय दिला. भाजपानं देशभरातील अनेक मतदार संघात अनेक खासदार बदलले, मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. यापैकी काही उमेदवारांना बाहेरचं मानलं गेल्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. उत्तरप्रदेश हे राज्य भाजपासाठी देखील महत्त्वाचं होतं, उत्तरप्रदेशमध्ये भाजपाला सत्तेत आणण्यासाठी अनेक धार्मिक मुद्द्याला हत्यार करण्यात आलं होतं.
उत्तर प्रदेशात झाले भाजपाचे हाल : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारनं 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराचं उद्घाटन केलं. लोकसभा निवडणुकीत भाजपाला पुन्हा सत्तेत येण्यासाठी राम लल्लाच्या अभिषेकाची तारीख निवडण्यात आली. योगी आदित्यनाथ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून हिंदूत्वाची बाजू भक्कम करण्यासाठी उपस्थित होते. प्रचाराच्या सुरुवातीच्या काळात भाजपानं मंदिर उभारणीचं यश या सरकारचं यश म्हणून मिरवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला फारसं यश मिळालं नाही. भाजपा प्रचाराचे अनेक मुद्दे शोधत असूनही प्रत्येक वेळी इंडिया आघाडी त्यांची कोंडी करत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्पसंख्यांकासाठी भीती निर्माण करण्याच्या प्रयत्नातून फुटीरतावादी भाषा वापरली. ही एक रणनीती त्यांच्यासाठी पूर्वी काम करत होती. गेल्या वेळी छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीदरम्यान, भाजपानं बहुमताचा आकडा वाढवण्यासाठी गेल्या वर्षी इस्रायलवर हमासच्या हल्ल्याचा वापर केला. कोणताही आधार नसला तरी भाजपाला त्याचा मोठा फायदा झाला. यावेळी भाजपा सर्वच बाबतीत हतबल असल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी अनेक प्रसंगी नरेंद्र मोदी यांना चुकीचं ठरवलं. समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांनी भाजपाच्या नेतृत्वाला गोंधळात टाकण्यासाठी रणनीती वापरली. एक्झिट पोलमधून दिलासा मिळूनही, भाजपानं त्याचा फार फायदा होणार नसल्याचं ओळखलं. सत्ताधारी पक्षातील एका नेत्यानं “भाजपा 40 जागा गमावेल” हे एप्रिलच्या सुरुवातीस स्पष्ट केलं होतं. भाजपाचे उत्तरप्रदेशातील नियंत्रण सुटत असल्याचं स्पष्ट होत होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ असलेल्या वाराणसीमध्ये प्रस्तुत लेखकांना कटुता दिसून आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थकही त्यांच्यावर ताशेरे ओढत असल्याचं दिसून आलं.
ओडिसामध्ये चांगल्या जागा जिंकल्यानं मिळवल्या 240 जागा : वाराणसीत नरेंद्र मोदी उमेदवार असल्यानं भाजपा पूर्व उत्तर प्रदेशात 13 जागा जिंकेल, अशी अपेक्षा होती. मात्र भाजपाला अपेक्षित यश मिळालं नाही. रायबरेली आणि अमेठी जिंकण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका यांनी जोरदार प्रयत्न केले. त्यांच्या मेहनतीचा मोठा फटका स्मृती इराणी यांना बसला. स्मृती इराणी यांचा राहुल गांधी यांचे समर्थक किशोरी लाल शर्मा यांच्याकडून अपमानास्पद पराभव झाला. राहुल गांधी यांनी रायबरेली मतदार संघात मोठ्या फरकानं विजय मिळवला. मात्र त्या तुलनेत नरेंद्र मोदी वाराणसीतून कमी फरकानं विजयी झाले. राजस्थानात भाजपानं अनेक जागा गमावल्या, मात्र ओडिसा आणि आंध्र प्रदेश राज्यात मतदारांना आकर्षित करण्यात यश मिळवलं. भाजपाला 240 जागांपर्यंत मजल मारता आली, त्याचं कारण भाजपानं ओडिसामध्ये चांगली कामगिरी केली. दिल्लीतही बाजपानं चांगली कामगिरी केली, परंतु आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वावर भाजपानं कुरघोडी केली. त्यामुळे आगामी काळात 'आप' राजकीय पटलावरुन गायब होऊ शकते. इंडिया आघाडीनंही सरकार स्थापनेचा प्रयत्न केला असला तरी, त्यात त्यांना यश आलं नाही.
हेही वाचा :
- काँग्रेसला मत म्हणजे पाकिस्तानला मत, त्यामुळे काँग्रेसला पाडा - योगी आदित्यनाथ - Yogi Adityanath In Malegaon
- "मोदींना सत्तेत येण्यापासून रोखण्याची कुणाचीही हिंमत नाही, निवडणुकीनंतर काँग्रेससह इंडिया आघाडीचं..."- योगी आदित्यनाथ - Lok Sabha Election 2024
- नरेंद्र मोदींची हॅट्रिक; चहा विक्रेता ते तीनवेळा पंतप्रधान होण्यापर्यंतचा मोदींचा प्रवास वाचा एका क्लिकवर - Narendra Modi PM Oath Ceremony