ETV Bharat / opinion

अमेरिकेचे उपाध्यक्ष पदाचे रिपब्लिकन उमेदवार जे डी व्हॅन्स यांच्या निवडीचे भारतावरील संभाव्य परिणाम - J D Vance - J D VANCE

J D Vance अमेरिकेमध्ये सध्या सार्वत्रिक निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी उपाध्यक्षपदासाठीचे उमेदवार म्हणून जे डी व्हॅन्स यांच्या नावाची घोषणा केली आहे. एक ट्रम्प निष्ठावंत अशी त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर बौद्धिक कुशाग्रतेसाठीही ते ओळखले जातात. उपाध्यक्षपदी जर ते निवडून आले तर भारताला काय फायदा होऊ शकतो यासंदर्भात दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील रिसर्च स्कॉलर संजीत कश्यप आणि विवेक मिश्रा यांचा लेख.

जे डी व्हॅन्स
जे डी व्हॅन्स (File photo of JD Vance (Getty Images))
author img

By Vivek Mishra

Published : Jul 23, 2024, 4:32 PM IST

नवी दिल्ली J D Vance - रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी उपाध्यक्षपदासाठीचे उमेदवार म्हणून जे डी व्हॅन्स यांच्या नावाची घोषणा केली आहे. मिलवॉकीमधील रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनच्या दरम्यान त्यांच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवारीची घोषणा करणाऱ्या सोशल मीडिया पोस्टसह, अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी GOP अर्थात अमेरिकेतील रिपब्लिकन पार्टीच्या भवितव्याबद्दल स्पष्ट संकेत दिले आहेत.

जे डी व्हॅन्स हे ओहयो सिनेटचे सदस्य आहेत. पॉप्युलिस्ट उजव्यांचे आशास्थान आहेत. मुक्त व्यापार, नियंत्रणमुक्ती, कर कपात आणि एक लहान राज्य या रीगन यांच्या रिपब्लिकन तत्वांपासून दूर राहून, व्हॅन्स यांनी पक्षाच्या वाढत्या लोकप्रिय, उदारमतवादी धोरणांचा पुरस्कार केला आहे, त्यामुळेच ट्रम्प यांना त्यांची निवड केली आहे.

कामगार-वर्गीय पार्श्वभूमीतून उदयास आलेल्या, व्हॅन्स यांनी महत्त्वाकांक्षेनं अमेरिकेतील सत्तासोपानात वावर वाढवला आहे. प्रथम उच्चभ्रू लोकांचे प्रिय म्हणून त्यांची लोकप्रियता होती. आताही ते सर्वच कामगार वर्गांचेही चाहते झालेले आहेत.

येल लॉ स्कूल आणि सिलिकॉन व्हॅलीची पार्श्वभूमि त्यांना आहे. अमेरिकन उच्चभ्रू वर्तुळातील त्याचा लौकिक आहे. अत्यंत उजव्या विचारसरणीची भूमिका घेण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे त्यांच्यावर टीकाही झाली. पण समीक्षकही ओहयोच्या या सिनेटरची बौद्धिक कुशाग्रता आणि पॉप्युलिस्ट डाव्यांसोबत समस्या-आधारित युती बनवण्याची त्यांची इच्छा मान्य करतात. यामुळे ते विद्यमान राजकीय परिदृश्यात एक महत्त्वाचे राजकारणी ठरतात. एक तरुण आणि प्रतिभावान राजकारणी म्हणून, रिपब्लिकन पक्ष आणि परिणामी, अमेरिकन लोकशाहीच्या पुनर्निर्मितीमध्ये व्हॅन्स एक महत्त्वपूर्ण नेता आहेत. निवडणुकांमध्ये ट्रम्प आघाडीवर असून डेमोक्रॅट्स गोंधळात असताना, उपाध्यक्ष म्हणून व्हॅन्स यांची संभाव्य भूमिका त्यांच्या परराष्ट्र धोरणाच्या विचारांकडे लक्ष वेधते. शीतयुद्धानंतरचं रिपब्लिकन आर्थिक जागतिकीकरण आणि नवसंरक्षणवादापासून दूर राहण्याच्या अनुषंगाने, व्हॅन्स यांच्या विचारातील आर्थिक राष्ट्रवाद आणि संयमित परराष्ट्र धोरण जर ते निवडून आले तर पाहायला मिळेल.

परदेशात अनावश्यक युद्धांवर अमेरिकन खजिना आणि मनुष्यबळ वाया घालवण्याबद्दल निओकॉन्सना जबाबदार धरले जाते. नवउदारवादी जागतिकीकरणाला औद्योगिक पाया खचणे, कामगार शक्तीचे दडपण आणि कामगार-वर्गाच्या असुरक्षिततेसाठी दोषी मानलं जात आहे. त्यांच्या निवडीनं त्यावर उपाय होण्याची शक्यता वाढेल. सततच्या देशांतर्गत सांस्कृतिक संघर्षांव्यतिरिक्त, व्हॅन्स यांचे नेतृत्व लोकवादी, उदारमतवादी देखील असेल. अमली पदार्थांची तस्करी आणि बेकायदेशीर इमिग्रेशनला सामोरे जाण्यासाठी सीमा सुरक्षेच्या दिशेने त्यांचा कठोर दृष्टिकोन राहील.

व्हॅन्स यांच्या पसंतीच्या परराष्ट्र धोरणाच्या अजेंड्यामध्ये चीनच्या दिशेनं कठोर दृष्टिकोन राहील. युरोपियन भागीदारांच्या बाजूने झुकतं माप असेल. तैवानसह पूर्व आशियाई मित्र देशांना व्यापार धोरण तसंच यूएस निर्यात स्पर्धात्मकतेच्या सेवेमध्ये डॉलरचं अवमूल्यन यांचा समावेश आहे. युक्रेनमध्ये वाटाघाटीद्वारे समझोत्यासाठी अमेरिकेला सहमती देण्याचं वारंवार आवाहन केल्यामुळे व्हॅन्स यांच्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टिकोनाला अलिप्ततावादी म्हणून लेबल लावणं चूक होईल. व्यापक परराष्ट्र धोरणाच्या चौकटीत युक्रेनसाठी जैसे थे स्थितीचा आग्रह धरणे, तसंच युक्रेनचे स्वातंत्र्य आणि तटस्थता यासाठी दीर्घकालीन अमेरिकन सुरक्षा हमी या दोन्हीची हमी समाविष्ट आहे.

तैवानच्या प्रश्नावर, प्रथम आक्रमण करणार नाही याच्या खात्रीसाठी नकारात्मक दृष्टीकोनातून प्रतिबंधासाठी वन्स सहमत आहेत. इस्रायलला कट्टर समर्थन आणि इराण संदर्भात व्हॅन्स यांची मध्यपूर्वेतील भूमिका मुख्यतः डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखीच आहे. ज्यामध्ये अनावश्यक लष्करी हस्तक्षेपाला त्यांचा विरोध आहे. तसंच त्यांची 'अब्राहम एकॉर्ड्स'च्या दृष्टिकोनाला अनुकूलता आहे. काही लोक लष्करी हस्तक्षेपाविरुद्धच्या त्यांच्या आवाहनाला संयमाचं लक्षण म्हणून पाहतात.

जर ही निवडणूक त्यांनी जिंकली तर, व्हॅन्स यांचा ट्रम्प प्रशासनाच्या परराष्ट्र धोरणावर होणारा संभाव्य प्रभाव आत्ताच सांगणे म्हणजे ते अवेळी सांगितल्यासारखं होईल. तथापि, ट्रम्प यांचा अनिश्चित दृष्टीकोन आणि यावरील कमी लक्ष पाहता सेरेब्रल व्हॅन्स यांना आगामी काळात अध्यक्षपदाची बढती मिळवण्यासाठी अजेंडा अधिक प्रभावीपणे अंमलात आणण्याकरता ही चांगली संधी असेल.

भारतीय दृष्टीकोनातून, आशियाई भागाकडे अधिक लक्ष दिल्यास अमेरिका आणि भारत यांच्यात अधिक चांगला समन्वय निर्माण होऊ शकतो. त्याचवेळी तथापि, व्हॅन्स यांचा संरक्षणवादी आर्थिक लोकवाद पाहता, डॉलरचे अवमूल्यन यावर जोर देऊन, उत्पादनाला चालना देण्याच्या भारताच्या स्वत:च्या महत्त्वाकांक्षेला खीळ बसू शकत नाही.

आयसीईटी उपक्रमांतर्गत भारतासोबत महत्त्वाकांक्षी उदयोन्मुख तंत्रज्ञान सहकार्य व्हॅन्स आणि ट्रम्प यांचं संभाव्य प्रशासन चालू ठेवणार का हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल.

(टीप : या लेखात व्यक्त केलेली मते लेखकांची वैयक्तिक आहेत. येथे व्यक्त केलेली तथ्ये आणि मते याच्याशी ईटीव्ही भारत सहमत असेलच असे नाही)

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.