ETV Bharat / opinion

बीएसई सेन्सेक्स जोरात; जणून घ्या कशानं वाढला ग्राहकांचा आत्मविश्वास - Pump Up The Confidence

Pump Up The Confidence : सेन्सेक्समध्ये सध्या चांगलीच तेजी दिसून येत आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात सेन्सेक्स 61 हजार 112.44 वरुन या एप्रिल महिन्यात 74 हजार 482.78 वर पोहोचला. त्यामुळे सेन्सेक्समध्ये मोठी वाढ झाल्यानं ग्राहाकांमध्ये मोठा आत्मविश्वास आला आहे.

Pump Up The Confidence
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat Marathi)
author img

By Tulsi Jayakumar

Published : May 8, 2024, 1:46 PM IST

Updated : May 8, 2024, 3:27 PM IST

हैदराबाद Pump Up The Confidence : बीएसई सेन्सेक्स सध्या जोरात असून त्याच्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. बीएसई सेन्सेक्स एप्रिल 2023 मध्ये 61 हजार 112.44 वरुन एप्रिल 2024 मध्ये तब्बल 74 हजार 482.78 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत मोठा आशावाद निर्माण झाला आहे. बीएसई वाढल्यानं भारतीय गुंतवणूकदारांमध्ये मोठा आशावाद निर्माण झाला. एप्रिल 2024 च्या आकडेवारीला जागतिक आर्थिक आऊटलूकनं पुष्टी दिली. जागतिक अर्थव्यवस्था डळमळीत होत असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र मजबूत होत असल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. भारतानं 2024 या आर्थिक वर्षात 6.8 टक्केचा जीडीपी दर गाठण्याचा अंदाज वर्तवला आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेपुढं असणार गंभीर प्रश्न : मागील वर्षाच्या तुलनेत सेन्सेक्स तब्बल 22 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होत असल्याचं स्पष्ट होत आहे. मात्र भारतानं जीडीपी वाढवून तो 6.8 चा दर गाठण्याचा अंदाज वर्तवला आहे. मात्र हा दर घटून तो 6.5 टक्के पूर्ण करण्यात यश येईल, असा अंदाज अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. भारताचा विकास दर यावर्षी आणि पुढील वर्षी टिकून राहील, याबाबत आपण किती आत्मविश्वास ठेऊ शकतो, असा सवाल करण्यात येत आहे. याबाबत अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय टीव्ही शोमध्ये त्यांना विचारलं, तर धोरण निर्मात्यांकडून काय उत्तर येईल, आत्मविश्वास ? लॉक किया जाए ? असा सवाल उपस्थित करण्यात येईल.

ग्राहकांच्या आत्मविश्वासाचा मागोवा : भारतीय ग्राहकांना आकर्षित करुन त्यांना खरेदीकडं वळवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ग्राहकांच्या आत्मविश्वासाकडं आणि त्याच्या भूमिकेकडं पुरेसं लक्ष दिले जात नाही, असं दिसते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) अशा ग्राहकांच्या आत्मविश्वासाचा मागोवा द्वैमासिक आधारावर घेतला जातो. यात रिझर्व्ह बँकेकडून एका वर्षापूर्वीच्या अपेक्षांवरील प्रश्नांचा समावेश असतो. यात आर्थिक परिस्थिती, रोजगार, उत्पन्न आणि खर्च, ग्राहक आत्मविश्वास निर्देशांक आदी विचारात घेतले जातात. त्यात ग्राहक आत्मविश्वास निर्देशांक हा प्रमुख सूचक आहे. तो धोरण निर्मात्यांना घरांच्या उपभोग आणि बचतीच्याबाबत भविष्यातील घडामोडींची जाणीव करुन देतो. यात 100 पेक्षा जास्त आकडे असल्यास आशावादा आणि बचत करण्याऐवजी खर्च करण्याची प्रवृत्ती नमूद करते. तर 100 पेक्षा कमी गुण प्रचलित असल्यास निराशावाद सूचित करत असल्याचं दिसून येते.

ग्राहकांना पुढील वर्षाबद्दल अधिक विश्वास : भारतातील 19 शहरांमध्ये 2 ते 11 मार्च 2024 या कालावधीत एक सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणात 6 हजार 083 नागरिकांचा समावेश असून त्यातील 50.8 टक्के महिला उत्तरदात्यांचा समावेश आहे. या सर्वेक्षणात अर्थव्यवस्थेच्या भावी स्थितीबाबत महत्त्वाची माहिती संकलित करण्यात आली आहे. आत्ताच्या अर्थव्यवस्थेबाबत ग्राहकांचा आत्मविश्वास सुधारल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे. 2019 च्या मध्यापासून तो सर्वोच्च पातळीवर स्थिरावल्याचं दिसून आलं. हा निर्देशांक मे 2021 मध्ये 48.5 वर घसरला होता. तेव्हा तो एका दशकातील सर्वात कमी होता. सध्या निर्देशांक 98.5 वर आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये असा आत्मविश्वास अजूनही 100 च्या अंकापेक्षा कमी आहे. हा आत्मविश्वास अर्थव्यवस्थेतील निराशावादी भावना दर्शवतो. भविष्यातील अपेक्षा निर्देशांक 125.2 वर प्रचलित असलेल्या 2019 च्या मध्यापासून पुन्हा उच्चांकासह ग्राहकांना पुढील वर्षाबद्दल अधिक विश्वास वाटतो. मात्र हा आकडा 96.4 च्या मूल्यासह मे 2021 मध्ये निराशावादी प्रदेशात घसरला होता, असंही या अहवालातून पुढं आलं.

हेही वाचा :

  1. अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजाराच्या निर्देशांकात 800 अंकांची वाढ; गुंतवणुकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण
  2. इराण-पाकिस्तानमधील तणावामुळं शेअर बाजारात 'भूकंप'; गुंतवणुकदारांचे काही मिनिटांत बुडाले 1.5 लाख कोटी
  3. शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी ग्रीन झोनमध्ये; सेन्सेक्स 69 हजाराच्या पार, तर निफ्टी 20 हजार 800 वर

Last Updated : May 8, 2024, 3:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.