कीव, युक्रेन PM Modi Meets Zelenskyy : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युक्रेनच्या दौऱ्यावर गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कीव इथं भेट देऊन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची गळाभेट घेत त्यांना भारत हा नेहमीच शांततेचा पुरस्कर्ता देश असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुमचा मोठा प्रभाव आहे. युक्रेन आणि रशिया युद्धात भारतानं युद्धविराम करुन शांतता प्रस्थापित करण्यास मध्यस्थी केल्यास आनंदच होईल, असं सांगितलं.
" india supports ukraine's sovereignty": says zelenskyy amid pm modi's visit
— ANI Digital (@ani_digital) August 23, 2024
read @ANI Story | https://t.co/tdLKkDlpbn#PMModi #India #Kyiv #Ukraine #VolodymyrZelenskyy #sovereignty pic.twitter.com/D1qWbhWtqw
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली वोलोडिमिर झेलेन्स्की यांची गळाभेट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनला भेट देत राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची गळाभेट घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेन आणि रशिया यांच्या युद्धात भारत शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करेल, असं आश्वासन त्यांना दिलं. भारत हा नेहमीच शांततेचा पुरस्कर्ता असलेला देश आहे. भारतानं नेहमीच शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे भारत शांतता प्रस्थापित करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावण्यास तयार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना सांगितल्याचं वृत्त वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
" you have big influence," ukraine president zelenskyy on a possible india brokered ceasefire with russia
— ANI Digital (@ani_digital) August 23, 2024
read @ANI Story | https://t.co/NPtgPwP7Ag#PresidentZelenskyy #India #Ukraine #Russia pic.twitter.com/jcJPhoVrx0
#WATCH | Kyiv: On his meeting with PM Narendra Modi, Ukrainian President Volodymyr Zelenskyy says, " a very good meeting. this is a historic one...i am very thankful to the pm for coming. it's a good beginning with some practical steps...if he (pm modi) has ideas (on peace) we… pic.twitter.com/Y4VWTsTSoL
— ANI (@ANI) August 23, 2024
तुमचा मोठा प्रभाव आहे, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींची स्तुतीसुमने : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनला भेट दिल्यानंतर त्यांनी राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. यावेळी या दोन नेत्यांमध्ये चांगलीच चर्चा झाली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुमचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे तुम्ही रशिया आणि युक्रेन युद्धात शांतता प्रस्थापित करण्यासाठी मध्यस्थी केल्यास आम्हाला आनंदच होईल, अशा शब्दात पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं उधळली. याबाबत युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी वृत्तसंस्थेला बोलतानाही याबाबतची माहिती दिली.
#WATCH | Kyiv: On his meeting with PM Narendra Modi, Ukrainian President Volodymyr Zelenskyy says, " a very good meeting. this is a historic one...i am very thankful to the pm for coming. it's a good beginning with some practical steps...if he (pm modi) has ideas (on peace) we… pic.twitter.com/Y4VWTsTSoL
— ANI (@ANI) August 23, 2024
देशाविरोधात एका माणसाचं युद्ध : रशिया आणि युक्रेन यांचा संघर्ष गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे. रशियानं युक्रेनवर अनेक हल्ले केले आहेत. मात्र हे युद्ध अद्यापही थांबण्यास तयार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. यावेळी वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी वृत्तसंस्थेला पंतप्रधान मोदींच्या भेटीबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, भारत आपली भूमिका बजावेल. भारतानंही हे एका माणसाचं एका देशाविरोधात युद्ध असल्याचं ओळखलं आहे. या एका माणसाचं नाव व्लादिमीर पुतिन आहे. पुतीन यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा प्रभाव आहे, त्यामुळे तुम्ही पुतीनला थांबवू शकता, असा विश्वास राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी वृत्तसंस्थेला बोलताना व्यक्त केला.
#WATCH | Ukraine President Volodymyr Zelenskyy says, " i am happy that pm modi came to visit us and i believe this is very important...this is the first visit of the prime minister of india to ukraine. we are ready on our part to do the respective steps. we've heard messages from… pic.twitter.com/P6XxtssQDC
— ANI (@ANI) August 23, 2024
#WATCH | Kyiv: Ukrainian President Volodymyr Zelenskyy says, " with regards to the citizens of india that were tricked to participate in the combat operations - pm modi started with that, he said that he condemns it and he will make everything possible for the citizens of india… pic.twitter.com/og9eXOgxLV
— ANI (@ANI) August 23, 2024
हेही वाचा :
- रशिया युक्रेन युद्धात भारताची भूमिका जागतिक परिप्रेक्षात महत्वाचीच नाही तर आणखी काय... - Russia Ukraine war
- Modi Talks with Zelenskyy: पीएम मोदींचा फोनवरून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींशी संवाद, म्हणाले 'युद्ध हे उत्तर नाही'
- Ukraine plane crashes : ग्रीसमध्ये युक्रेन एअरलाइनचे मालवाहू विमान कोसळले