ETV Bharat / international

​निसर्गामुळे आपण आहोत, त्यामुळे निसर्ग जपा...; जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त 'या' गोष्टी नक्की करा - World Nature Conservation Day 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 28, 2024, 11:58 AM IST

World Nature Conservation Day : जागतिक निसर्ग संवर्धन दिन दरवर्षी 28 जुलै रोजी साजरा केला जातो. मानवाला आपल्या पुढच्या पिढ्यांना जगवायचं असेल तर निसर्गाचं संरक्षणाशिवाय कोणताही पर्याय नाही. त्यासाठी निसर्ग आणि त्यातील प्रत्येक घटकाचं संवर्धन करणं अत्यावश्यक आहे.

World Nature Conservation Day
World Nature Conservation Day (Source - ETV Bharat)

World Nature Conservation Day लखनौ: लोकांना पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूक करण्यासाठी दरवर्षी 28 जुलै रोजी 'जागतिक निसर्ग संवर्धन दिन' साजरा केला जातो. हा दिवस निसर्ग आणि पर्यावरणाचं महत्त्व दर्शवतो. जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश पृथ्वीवरील नैसर्गिक वातावरणातून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले प्राणी आणि झाडे वाचवणं हा आहे. त्यामुळं निसर्गाचं रक्षण करणं प्रत्येकाची जबाबदारी आहे. यावेळची थीम 'लोक आणि वनस्पती जोडणे, वाइल्डलाइफ संवर्धनात डिजिटल इनोव्हेशन एक्सप्लोअर करणे.' ही आहे.

लखनौ विद्यापीठाच्या भूविज्ञान विभागाचे प्रमुख प्रा. ध्रुव सेन सिंह सांगतात की, "निसर्गातील प्रदूषणामुळं वातावरणातील बदल हे मोठं आव्हान बनलं आहे. सध्या नियोजित वेळेत मान्सून येत नाही. याशिवाय प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळं निसर्गाची हानी होत आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी आपल्या पूथ्वीचं संरक्षण करण्याच्या महत्त्वाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी 'जागतिक निसर्ग संवर्धन दिन' साजरा केला जातो."

उपजीविकेसाठी जंगलं आवश्यक : "निसर्गातूनच आपल्याला अन्न, पाणी आणि हवा मिळते. जगण्याची सर्व साधनं आपल्याला निसर्गाकडून मिळतात. निसर्ग टिकला नाही तर सर्वांचं जीवन उद्ध्वस्त होईल. निसर्गाचं संरक्षण केलं नाही तर जीवन कसं चालेल? आज आपण निसर्ग संवर्धनाबाबत अनेक आव्हानांना तोंड देत आहोत. जंगलं तोडली जात आहेत. नद्या कोरड्या पडत आहेत. वायू आणि जल प्रदूषण वाढत आहे. याचा अर्थ जीवनाची सर्व साधनं नष्ट होत आहेत. आपल्या नैसर्गिक संसाधनांचं रक्षण करण्यासाठी आणि पृथ्वीवर होणारे नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी निसर्गाचं संरक्षण महत्वाचं आहे." असं प्रा. ध्रुव सेन सिंह म्हणाले.

पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी ही पावलं उचला

  • जास्तीत जास्त झाडे लावा.
  • प्लास्टिक वापरू नका. प्लास्टिक वापरण्यास इतरांनाही मनाई करा.
  • पाण्याचा विनाकारण वापर करू नका. पाणी वाचवा.
  • घरातून बाहेर पडताना घरातील वीज आणि पंखे बंद करा. जेणेकरून विजेची बचत होईल.
  • टिकाऊ-उत्पादनांचा वापर करा.

'या' तीन घटकांवर मानवी जीवन अवलंबून : पृथ्वीवरून आपल्याला अन्न, जलमंडलातून पाणी आणि वातावरणातून शुद्ध हवा मिळते. या तीन घटकांवर मानवी जीवन अवलंबून आहे. हे तिन्ही घटक दिवसेंदिवस असेच प्रदूषित होत राहिलं तर मानवी जीवन संपणार आहे. निसर्गाचं रक्षण कसं करता येईल, याचा विचार करणं गरजेचं आहे. पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे जिथं माणसाला जीवन जगणं शक्य आहे. कारण इथं पाणी आणि हवा आहे. पृथ्वी सोडून इतर कोणत्याही ग्रहावर किंवा उपग्रहावर हवा आणि पाणी आढळून येत नाही. त्यामुळं सर्वांनी मिळून निसर्गाचं रक्षण केलं पाहिजे. हा संदेश देण्यासाठी 'जागतिक निसर्ग दिन' साजरा केला जातो.

  • जंगलातून आपला उदरनिर्वाह : "लाखो लोकांची उपजीविका जंगलांवर अवलंबून आहे. लाकूड, फळं, फुलांपासून अनेक कुटूंब अपला उदरनिर्वाह करतात. जंगलामुळं अन्न, निवारा आणि जीवनाच्या इतर अत्यावश्यक गरजा पूर्ण होतात. त्यामुळं निसर्गाचं संरक्षण महत्वाचं आहे, " असे प्रा. ध्रुव सेन सिंह म्हणाले.

जागतिक संवर्धन दिनाचं महत्त्व : नैसर्गिक साधनसंपत्तीचा अमर्याद वापर आणि अतिशोषणामुळं ग्लोबल वॉर्मिंगचं परिणाम भावी पिढीसाठी गंभीर असू शकतात. जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा करण्याचं उद्दिष्ट नैसर्गिक संसाधने, जैवविविधता आणि पर्यावरणाचं जतन करणे हा आहे. या दिवशी नैसर्गिक संसाधनं नष्ट होण्याच्या जोखमींबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.

हेही वाचा

  1. पृथ्वी वाचवा, आपलं भविष्य वाचवा : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जंगल वाचवण्याचा संदेश - World Environment Day 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.