ETV Bharat / international

भूकंपानं तैवान हादरलं; एकाचा मृत्यू तर 50 नागरिक जखमी, गगनचुंबी इमारती कोसळल्या - Earthquake In Taiwan - EARTHQUAKE IN TAIWAN

Earthquake In Taiwan : तैवानला भूकंपाचा मोठा धक्का बसला आहे. या भूकंपात तैवानमधील इमारती कोसळल्या आहेत. त्यामुळे एका नागरिकाचा मृत्यू झाला असून 50 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती तैवानच्या अग्निशमन विभागानं दिली आहे.

Earthquake In Taiwan
कोसळलेली इमारत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 3, 2024, 8:25 AM IST

Updated : Apr 3, 2024, 9:34 AM IST

तैपेई Earthquake In Taiwan : तैवानला बुधवारी सकाळी भूकंपाचा मोठा हादरा बसल्यानं नागरिकांची मोठी धावपळ झाली. या भूकंपात गगनचुंबी इमारती कोसळल्या असून भूकंपानं नागरिकांना मोठा हादरा बसला आहे. या भूकंपात पाच मजली इमारतीचा पहिला मजला कोसळला असून बाकीचा भाग 45 अंशाच्या कोनात जमिनीला टेकला आहे. तैवानला बसलेला भूकंपाचा धक्का हा 7.2 रिश्टल स्केलचा असल्याची माहिती तैवानच्या हवामान विभागानं दिली आहे. या भूकंपात आतापर्यंत एका नागरिकाचा मृत्यू झाला असून 50 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाल्याची माहिती तैवानच्या अग्निशमन विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे.

भूकंपात एकाचा मृत्यू तर 50 नागरिक जखमी : तैवानमध्ये आलेल्या भूकंपात एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर 50 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. तैवानमधील गगनचुंबी इमारती कोसळल्यानं घटनास्थळावर बचावकार्य करण्यात येत आहे. तैवानमध्ये आलेला भूकंपाची तिव्रता 7.2 रिश्टल स्केल असल्याची माहिती तैवानच्या हवामान विभागानं दिली आहे. मात्र दुसरीकडं अमेरिकी भूवैज्ञांनिक सर्वेक्षण विभागानं हा भूकंप तब्बल 7.4 रिश्टल स्केल तिव्रतेचा असल्याचं स्पष्ट केलं आहे. तैवान भूकंप निरीक्षक पथकाचे प्रमुख वू चिएन-फू यांनी सांगितलं की, "चीनच्या तटापासून दूर असलेल्या किनमेन द्विपापर्यंत भूकंपाचा प्रभाव दिसून आला आहे. सुरुवाती भूकंपाच्या एका तासानंतर तैपेईमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत."

जमिनीला टेकल्या गगनचुंबी इमारती : तैवानमध्ये आलेल्या भूकंपानं मोठा हादरा बसला आहे. तैवानमधील गगनचुंबी इमारती जमिनीला टेकल्या आहेत. अनेक इमारतींची पडझड झाली आहे. इमारतींचा मलबा रस्त्यावर आल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. त्यामुळे अग्निशमन दल आणि आपत्ती निवारण पथकातील जवान बचावकार्यात गुंतले आहेत.

भूकंपामुळे जपानमध्ये त्सुनामीची शक्यता : तैवानमधील भूकंपात आतापर्यंत एका नागरिकाचा मृत्यू झाला असून 50 पेक्षा अधिक नागरिक गंभीर झाल्याची माहिती तैवानच्या अग्निशमन विभागानं दिली. या भूकंपाचा हादरा इतका जबरदस्त आहे, की जपानमध्ये त्सुनामी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जपान सरकारनं याबाबत इशारा दिला आहे.

तैवानमधील मेट्रो, रेल्वेसेवा स्थगित : तैवानमध्ये आलेल्या शक्तीशाली भूकंपामुळे तेथील रेल्वे सेवा आणि मेट्रो सेवा स्थगित करण्यात आली आहे. तैवानच्या तैपेई शहरातील स्थिती सामान्य झाली आहे. सकाळीच लहान मुलं शाळेत गेले आहेत. सकाळी जनजीवनही सुरळीत सुरू झाल्याची माहिती तैवानच्या अग्निशमन विभागाच्या वतीनं देण्यात आली.

हेही वाचा :

  1. Earthquake today in Maharashtra : मराठवाड्यात हिंगोली, परभणीसह नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिक भयभीत
  2. भूकंपाच्या धक्क्यानं जपान हादरलं; आठ नागरिकांचा मृत्यू, जपानमध्ये त्सुनामीचा इशारा
  3. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शक्तिशाली भूकंपानं हादरला जपान, त्सुनामीचाही दिला इशारा

Last Updated : Apr 3, 2024, 9:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.