सिओल (दक्षिण कोरिया) Fire in Lithium Battery Factory : दक्षिण कोरियाची राजधानी सीओलजवळील लिथियम बॅटरी बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली. या आगीत 22 जणांचा मृत्यू झाला. तर या अपघातात सात जण जखमी झाले असून, सहा जण बेपत्ता असल्याची माहिती आहे.
बहुतांश परदेशी नागरिकांचा समावेश : या संदर्भात स्थानिक अग्निशमन अधिकारी किम जिन यंग यांनी एका स्थानिक मीडियाला सांगितलं की, सीओलच्या दक्षिणेकडील ह्वासेओंग शहरात असलेल्या कारखान्यातील बचाव कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा शोध घेतल्यानंतर मृतदेह बाहेर काढले. बेपत्ता झालेल्यांपैकी बहुतांश परदेशी नागरिक असून त्यात चिनी नागरिकांचा समावेश असल्याचं किम यांनी यापूर्वी म्हटले होतं. सिग्नल कारखान्याच्या दुसऱ्या मजल्यावर बेपत्ता झालेल्या लोकांचं मोबाईल ट्रॅक करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच किम म्हणाले की, एका प्रत्यक्षदर्शीनं अधिकाऱ्यांना सांगितले की कामगार बॅटरी तपासत आणि पॅकेजिंग करत असताना आग लागली, परंतु आगीचं नेमकं कारण तपासलं जाईल.
कारखान्यात शेकडो लोक करत होते काम : मृत सापडलेले लोक पायऱ्या उतरण्यात अयशस्वी झाले. आग विझवणारी यंत्रणा कार्यरत आहे की नाही हे अधिकारी तपासतील, असंही किम म्हणाले. तसंच आग लागण्यापूर्वी कारखान्यात एकूण 102 लोक काम करत होते. अध्यक्षीय कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, अध्यक्ष यून सूक इओल यांनी यापूर्वी अधिकाऱ्यांना वाचलेल्यांचा शोध घेण्यासाठी सर्व उपलब्ध कर्मचारी आणि उपकरणे तैनात करण्याचे आदेश दिले होते.
रशियातही चर्चवर हल्ला : रशियातील दागेस्तान या परिसरातील चर्चवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तब्बल 20 जण ठार तर 30 ते 40 नागरिक गंभीर जखमी झाले आहे. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलंय.
हेही वाचा :