ETV Bharat / international

ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षाचा विजय; केयर स्टारमर ब्रिटनचे नवे पंतप्रधान - keir starmer

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 5, 2024, 11:01 PM IST

ब्रिटनमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षानं मोठा विजय मिळवला आहे. केयर स्टारमर यांनी निवडणुकीतील विजयानंतर आपलं विजयी भाषण दिलंय. बदललेला मजूर पक्ष देशसेवेसाठी तत्पर असल्याचं त्यांनी सांगितलं.

keir starmer
पंतप्रधान केयर स्टारमर (Etv Bharat National Desk)

लंडन : ब्रिटन सार्वत्रिक निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा दारूण पराभव झाला असून मजूर पक्षानं मोठा विजय मिळवला आहे. पंतप्रधान झाल्यानंतर केयर स्टारमर यांनी देशाला संभोधित केलं. जनतेला संबोधित करताना त्यांनी ब्रिटनला एक मजबूत देश बनवण्यावर भर दिला. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा पराभव करत केयर स्टारमर यांनी ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला आहे. सार्वत्रिक निवडणुकीत केयर स्टारमर यांच्या मजूर पक्षाने 200 हून अधिक जागा जिंकल्या आहेत. केयर स्टारमर यांनी राजा चार्ल्स तिसरा यांच्याशी बकिंगहॅम पॅलेसमध्ये भेट घेतली. परंपरेनुसार, नवीन सरकार स्थापन करण्यासाठी बकिंगहॅम पॅलेसमध्ये हातांचं चुंबन नावाचा समारंभ आयोजित केला जातो.

स्टार्मर ब्रिटनचे नवे पंतप्रधान : ब्रिटन (यूकेचे) नवे पंतप्रधान म्हणून केयर स्टारमर यांनी शुक्रवारी आपल्या पहिल्या भाषणात ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षाच्या प्रचंड विजयानंतर देशाची पुनर्बांधणी करण्याचे वचन दिलंय. राष्ट्राला संबोधित करताना ते म्हणाले: "आमचं काम आम्ही आजपासून सुरू करतो". ऋषी सुनक यांच्या जागी गुरूवारी यूकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 200 हून अधिक जागांवर मजूर पक्षाला मोठा विजय मिळाला आहे . ब्रिटनचे नवे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी हॉलबॉर्न तसंच सेंट पॅनक्रस या जागांवर विजय मिळवलाय. मजूर पक्षाच्या विजयावर 61 वर्षीय केयर स्टारमर म्हणाले की, ‘मी तुमचा आवाज होईन, मी तुम्हाला पाठिंबा देईन, मी तुमच्यासाठी दररोज लढेन.’ स्टारमर यांनी विजयानंतर शुक्रवारी विजयी भाषण केलं. ब्रिटनमध्ये 4 जुलै रोजी सार्वत्रिक निवडणुका झाल्या. पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आपला पराभव स्वीकारला आहे. मात्र, सुनकनं आपली जागा राखण्यात यश मिळवलं आहे. त्यांनी उत्तर इंग्लंडमधील रिचमंड तसंच नॉर्थलर्टन जागा जिंकली आहे.

देशानं परिवर्तनासाठी केलं मतदान : स्टारमर पंतप्रधान होण्यापूर्वी मोनार्क येथे झालेल्या बैठकीनंतर ऋषी सुनक यांनी राजीनामा दिला. स्टारमर म्हणाले की, देशानं परिवर्तनासाठी मतदान केलं. त्यासोबत मजूर पक्ष राजकारणात परतलाय. 'नागरिकांना मिळणाऱ्या सेवापासून त्यांना दीर्घकाळ दूर ठेवलं जात, तेव्हा देशवासीयांच्या मनात एक विचित्र परिस्थिती निर्माण होते. सर्व मिळून जनतेच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करू.

हे वाचलंत का :

  1. ऋषी सुनक यांना दणका; ब्रिटनच्या संसदेत 'सिंह आला पण गड गेला', मजूर पक्षाची मोठी घोडदौड - UK Election 2024
  2. ब्रिटनमध्ये 4 जुलै रोजी मतदान : PM ऋषी सुनक संकटात; विद्यमान पंतप्रधानांना 'या' पक्षाचं आव्हान - UK Upcoming National Election
  3. ब्रिटनमध्ये मतदानाला सुरूवात; मूळ भारतीय वंशाचे ऋषी सुनक केयर स्टारर यांना पराभूत करणार का? - Voting IN Britain

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.