ETV Bharat / international

भारतीय वंशाच्या जोडप्याला ब्रिटनमध्ये 33 वर्षांची शिक्षा, कोकेन तस्करीकरिता सुरू केली होती कंपनी - couple jailed for 33 years

Indian Couple Punishment in UK : भारतीय जोडप्याला ऑस्ट्रेलियात कोकेनची तस्करी आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सोमवारी साउथवॉर्क क्राउन कोर्टातील ज्युरीनं दोषी ठरविलं. कोकेनची तस्करीच्या 12 गुन्ह्यांमध्ये आणि मनी लॉन्ड्रिंगच्या 18 गुन्ह्यांसाठी दोषी ठरवत त्यांना 33 वर्षांचा कारावास न्यायालयानं सुनावलाय.

Indian Couple Punishment in UK
Indian Couple Punishment in UK
author img

By PTI

Published : Jan 31, 2024, 7:50 AM IST

Updated : Jan 31, 2024, 8:17 AM IST

लंडन Indian Couple Punishment in UK : ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या जोडप्यावर अर्धा टन कोकेन ऑस्ट्रेलियात पोहोचवल्याचा आरोप करण्यात आलाय. 59 वर्षीय आरती धीर आणि 35 वर्षीय कवलजीत सिंग रायजादा असं या जोडप्याचं नाव आहे. मे 2021 मध्ये ऑस्ट्रेलियन बॉर्डर फोर्सनं सिडनी विमानतळावर त्यांच्याकडून सुमारे 601 कोटी रुपयांचं 57 दशलक्ष पौंड कोकेन जप्त करण्यात आलं होतं.

कोकेन निर्यात आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी दोषी : या जोडप्यानं ऑस्ट्रेलियात कोकेनची तस्करी आणि मनी लाँड्रिंगचे आरोप फेटाळले आहेत. सोमवारी साउथवॉर्क क्राउन कोर्टातील ज्युरीनं त्यांना तस्करीच्या 12 गुन्ह्यांमध्ये आणि मनी लॉन्ड्रिंगच्या 18 गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले. दोघांनाही मंगळवारी त्याच न्यायालयात 33 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलीय.

514 कोकेन आढळलं : ब्रिटनमधून सहा मेटल टूलबॉक्सेससह व्यावसायिक उड्डाणांद्वारे औषधांची वाहतूक करण्यात आली होती. ते उघडले असता त्यात 514 किलो कोकेन आढळून आलं. हे ऑस्ट्रेलियात विकलं गेलं असतं तर त्याची किंमत 601 कोटी रुपयांपेक्षा जास्त असती. ब्रिटनमध्ये एक किलो कोकेनची किंमत 26,000 पौंड आहे. परंतु, ऑस्ट्रेलियामध्ये त्याची किंमत तब्बल 1लाख 10 हजार पौंड आहे.

बनावट कंपनी उघडून ड्रग्सची तस्करी : या जोडप्यानं 'WeFry Freight Services' नावाची एक बनावट कंपनी स्थापन केल्याचं तपासादरम्यान आढळून आलं. याचा उद्देश ड्रग्सची तस्करी करणे होता. या जोडप्याच्या निवासस्थानाची झडती घेतली असता एक टूलबॉक्स सापडला. त्याची किंमत 2855 पौंड आहे. या टूलबॉक्समध्ये कवलजीत सिंग रायजादा यांच्या बोटांचे ठसेही सापडले आहेत.

  • 22 वेगवेगळ्या बॅंक खात्यांमध्ये रोख : या दोन्ही आरोपींच्या बँक खात्यांमध्ये रोख रक्कम असल्याचं तपासात दिसून आलंय. ही रक्कम त्यांच्या घोषित उत्पन्नापेक्षा कितीतरी जास्त होती. त्यांनी 2019 पासून 22 वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये सुमारे 740,000 पौंड रोख ठेवले होते. त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे.

हेही वाचा :

  1. Mumbai Airport : विमानतळावर एका व्यक्तीच्या बॅगेत 28 कोटी किंमतीचे 281 किलो कोकेन जप्त,एका भारतीय प्रवाशाला अटक
  2. डीआरआयची मोठी कारवाई; शरीरात लपवून आणल्या कोकेनच्या 'इतक्या' कॅप्सूल, व्हेनेझुएलाच्या प्रवाशाला ठोकल्या बेड्या

Last Updated : Jan 31, 2024, 8:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.