तेल अवीव Israeli airstrike I-मध्यपूर्वेत लेबेनॉन आणि इस्राययलमध्ये अघोषित युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. लेबेनॉनमध्ये पेजर, वायरलेससह स्फोट घडवून दहशतवादी हिजबुल्लाह संघटनेला सळो की पळो करून सोडले. त्यानंतर इस्रायलच्या संरक्षण दलानं दहशतवादी संघटनेचा कमांडर हवाई हल्ल्यात ठार केला. इइस्रायलच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला. तर १५ जण जखमी झाल्याची माहिती लेबेनॉनच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली. हिजबुल्लाहकडून अद्यापर्यंत प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
आयडीएफनं एक्स मीडियावर पोस्ट करत हिजबुल्लाहचा कमांडर मोहम्मद हुसैनचा हवाई हल्ल्यात खात्मा झाल्याचं म्हटलं आहे. पोस्टमध्ये म्हटले,"हा कमांडर इस्रायलच्या नागरिकांवर झालेल्या अनेक हवाई हल्ल्यांसाठी जबाबदार होता. त्यानं यूएव्ही आणि अनेक स्फोटकांचा वापर करून इस्रायलचे नागरिक आणि आयडीएफच्या जवानांवर हल्ले केले होते. गेल्या काही वर्षांमध्ये हा दहशतवादी यूएव्ही मॅन्युफॅक्चुअरिंगसह गुप्तचर यंत्रणेचं काम पाहत होता. त्यासाठी प्रकल्प बैरुत आणि बैरुतच्या दक्षिण भागात प्रकल्प स्थापन करण्यात आला होता. राडवान फोर्समध्ये जमिनीवरून हवाई हल्ला करणाऱ्या अजीझ प्रोजक्टचादेखील हा दहशतवादी कमांडर होता."
मध्यपूर्वेत युद्धाचे ढग होण्यापूर्वी महासत्ता सक्रिय झाली आहे. इस्राययल आणि लेबेनॉनमध्ये तणावाची स्थिती वाढली असताना अमेरिकेनं दोन्ही देशांना सीमेदरम्यान २१ दिवसांची शस्त्रसंधी लागू करण्याच आवाहन केलं. युद्ध थांबवून राजनैतिक गोष्टींना संधी द्यावी, असा अमेरिकेनं दोन्ही देशांना सल्ला दिला. यापूर्वीदेखील अमेरिकेनं हिजबुल्लाह आणि इस्रायलमध्ये समन्वयकाची भूमिका बजाविण्याची तयारी दर्शविली होती.अमेरिकेच्या शस्त्रसंधीचे आवाहन इस्राययलच्या अधिकाऱ्यांनी फेटाळली आहे. लेबेनॉनकडून इस्रायलच्या सीमेवर हवाई हल्ले करण्यात आले. या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्युह यांनी संपूर्ण ताकदीनं देश लढणार असल्याचं म्हटलं होते.
लेबेनॉनमध्ये ७०० जणांचा मृत्यू- सोमवारपासून इस्रायलनं लेबेनॉनवर केलेल्या हल्ल्यात ७०० जणांचा मृत्यू झाल्याचं लेबेनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं म्हटलं. यामध्ये पेजरसह, वॉकीटॉकी हल्ल्यात मृत्यू झालेल्या नागरिकांचा समावेश आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना इस्रायल आणि लेबेनॉनध्ये २१ दिवसांची शस्त्रसंधी व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली. जो बायडेन म्हणाले, "दोन्ही देशांमधील शस्त्रसंधी करता आम्हाला युरोपसह अरब देशांकडून चांगलं सहकार्य मिळू शकते.
- लेबेनॉनच्या मदतीसाठी इराण पुढे येणार असल्याची चिन्हे आहेत. "संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेनं इस्रायलला थांबवावं. जर युद्ध थांबले नाही तर केलेल्या गुन्ह्यांना शिक्षा होणार आहे, असे इस्रायलच्या नेत्यांनी समजून घ्यायला पाहिजे. लेबेनॉन आणि इस्रायलमध्ये युद्ध झाले तर गप्प बसणार नाही," असा इशारा इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अर्काची यांनी दिला आहे.
हेही वाचा-