पुणे- Donald Trump Attack : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे शनिवारी बटलर, पेनसिल्व्हेनिया येथे निवडणूक रॅलीदरम्यान समर्थकांना संबोधित होते. यावेळी अचानक अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराच्या घटनेत गोळी ट्रम्प यांच्या कानाला स्पर्श करून गेली. त्यांच्या कानातून रक्त वाहत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं यूएस सिक्रेट सर्व्हिसचे प्रवक्ते अँथनी गुग्लिएल्मी यांनी सांगितलंय. ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा पंतप्रधान मोदी आणि काँग्रेस खासदार राहुल गांधींनी निषेध केला आहे.
" bullet pierced upper part of my ear": donald trump after attack on him at pennsylvania rally
— ANI Digital (@ani_digital) July 14, 2024
read @ANI story| https://t.co/CshyekGaLi#DonaldTrump #US #Pennsylvania #shooting pic.twitter.com/tUVN9QmJSB
पंतप्रधान मोदी काय म्हणाले? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, "माझे मित्र माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे मी चिंतेत आहे. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही. ट्रम्प लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे. आमचे विचार आणि प्रार्थना मृतांचे कुटुंब, जखमी आणि अमेरिकन लोकांसोबत आहेत."
I have been briefed on the shooting at Donald Trump’s rally in Pennsylvania.
— President Biden (@POTUS) July 13, 2024
I’m grateful to hear that he’s safe and doing well. I’m praying for him and his family and for all those who were at the rally, as we await further information.
Jill and I are grateful to the Secret…
- राहुल गांधींची पोस्ट : राहुल गांधींनी सोशल मीडियावर एक्सवर पोस्ट शेअर करत म्हणाले की, "अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येच्या प्रयत्नाबद्दल मी अत्यंत चिंतेत आहे. अशा कृत्यांचा तीव्र शब्दात निषेध केला पाहिजे. मी त्यांना लवकरात लवकर बरे होण्याची प्रार्थना करतो."
Deeply concerned by the attack on my friend, former President Donald Trump. Strongly condemn the incident. Violence has no place in politics and democracies. Wish him speedy recovery.
— Narendra Modi (@narendramodi) July 14, 2024
Our thoughts and prayers are with the family of the deceased, those injured and the American…
गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...: "आपल्या देशात असं कृत्य घडू शकते, यावर मला विश्वास बसत नाहीय. माझ्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला गोळी लागली. मला लगेच लक्षात आलं की, काहीतरी गडबड आहे. कारण मी बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकला. लगेच लक्षात आले की गोळी कानाच्या वरच्या भागाला लागली आहे. मला समजलं की कानातून खूप रक्तस्त्राव होत आहे. देवा अमेरिकेला वाचव,' असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे."
I am deeply concerned by the assassination attempt on former US President Donald Trump.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 14, 2024
Such acts must be condemned in the strongest possible terms.
Wishing him a swift and complete recovery.
हिंसाचाराला अमेरिकेत स्थान नाही : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी या घटनेबाबत एक्सवर पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटलं की, "पेनसिल्व्हेनियामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे. ते पूर्णपणे बरे आहेत. ट्रम्प आणि त्यांच्या रॅलीत सहभागी झालेल्या प्रत्येकासाठी मी प्रार्थना करत आहे. आम्ही या घटनेबाबत अधिक माहितीची वाट पाहत आहोत. ट्रम्प यांना सुरक्षित ठेवल्याबद्दल मी सिक्रेट सर्व्हिसचे आभार मानतो. अशा प्रकारच्या हिंसाचाराला अमेरिकेत स्थान नाही. एक देश म्हणून आपण पूर्णपणे एकत्र आहोत. या घटनेचा मी निषेध करतो आणि खेद व्यक्त करतो."
हेही वाचा
- डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत गोळीबार; थोडक्यात बचावले, पाहा घटनेचा व्हिडिओ - DONALD TRUMP NEWS
- गाझामध्ये नरसंहार : इस्रायलच्या हवाई हल्ल्यात 71 जण ठार; 289 हून अधिक जखमी - airstrikes on Gaza
- नेपाळमध्ये 'प्रचंड' सरकार पडलं, विश्वासदर्शक ठराव गमावल्यानंतर पुष्प कमल दहल यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा - Nepal Prime Minister resigns