बँकॉक : थायलंडमध्ये एका विमानात ओव्हरहेड केबिनमध्ये जिवंत साप आढळून आला आहे. थायलंडमधील एअर एशिया या विमान कंपनीचे प्रवासी विमान राजधानी बँकॉकहून फुकेत शहरासाठी उड्डाण करणार होते. विमान टेक ऑफ करणार असतानाच एका प्रवाशानं विमानाच्या ओव्हरहेड केबिनमध्ये साप सरकत असल्याचं पाहिलं. त्यानंतर विमानात एकच गोंधळ निर्माण झाला. विमानातील अनेक प्रवाशांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. व्हिडिओमध्ये एक फ्लाइट अटेंडंट पाण्याच्या बाटलीने सापाला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. एका 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वापरकर्त्यानं हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. बँकॉकवरून फुकेतला जाणाऱ्या एअर एशिया फ्लाइटमधील प्रवाशांना ओव्हरहेड केबिनच्या वरच्या बाजूला एक साप दिसला.' अशी पोस्ट या युजरनं शेअर केली आहे.
-
Passengers on an Air Asia plane flying from #Bangkok to Phuket found a #snake in the cabin crawling along the overhead bin. pic.twitter.com/YrfhDHyuhu
— Arthur Morgan (@ArthurM40330824) January 18, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Passengers on an Air Asia plane flying from #Bangkok to Phuket found a #snake in the cabin crawling along the overhead bin. pic.twitter.com/YrfhDHyuhu
— Arthur Morgan (@ArthurM40330824) January 18, 2024Passengers on an Air Asia plane flying from #Bangkok to Phuket found a #snake in the cabin crawling along the overhead bin. pic.twitter.com/YrfhDHyuhu
— Arthur Morgan (@ArthurM40330824) January 18, 2024
एअर एशियाचं निवदेन जारी : एअर एशिया, थायलंडनं या घटनेनंतर एक निवेदन जारी केलं आहे. बँकॉकच्या डॉन मुआंग आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 13 जानेवारीला उड्डाण केलेल्या FD 3015 या विमानात एक साप दिसला. आम्हाला या घटनेची माहिती आहे.' असं या निवेदनात म्हटलं आहे.
विमानाची तपासणी : विमान फुकेतमध्ये उतरल्यानंतर संबंधित सुरक्षा पथकांनी तातडीनं विमानाची तपासणी केलीय. मात्र, त्यानंतर सापाचं काय झालं, याचा उल्लेख निवेदनात करण्यात आलेला नाही. विमानात साप दिसणं ही अत्यंत दुर्मीळ घटना आहे. अशी घटना हाताळण्यासाठी फ्लाइट अटेंडंटना प्रशिक्षित केलं जातं, असं एअर एशिया एअरलाइन्सचे कॉर्पोरेट सुरक्षा प्रमुख फॉल पंपुआंग म्हणाले.
अशा घटना हाताळण्यासाठी प्रशिक्षण : फुकेतमध्ये उतरण्यापूर्वी एका प्रवाशानं ओव्हरहेड लगेज केबिनमध्ये साप पाहिल्यानंतर फ्लाइट अटेंडंटना सूचित करण्यात आलं. एअर एशियाचे कर्मचारी अशा घटना हाताळण्यासाठी प्रशिक्षित आहेत. एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून प्रवाशांना या भागातून बाहेर काढलं होतं.
एअर एशियाच्या विमानात दुसऱ्यांदा दिसला साप : यापूर्वी फेब्रुवारी 2022 मध्ये क्वालालंपूर ते सबा या एअर एशियाच्या फ्लाइटमध्ये अजगर आढळला होता. अजगर दिसल्यानंतर विमान कुचिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर परत आणण्यात आलं होतं.