ETV Bharat / health-and-lifestyle

जागतिक पर्यटन दिन 2024; जाणून घ्या इतिहास आणि थीम - World Tourism Day 2024 - WORLD TOURISM DAY 2024

World Tourism Day 2024: 'जागतिक पर्यटन दिन' दरवर्षी 27 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. पर्यटनामुळे देशाची किंवा राज्याची आर्थिक स्थिती सुधारते. यामुळे पर्यटनाला चालना देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जाणून घ्या जागतिक पर्यटन दिनाचा इतिहास थीम आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ.

World Tourism Day 2024
जागतिक पर्यटन दिन 2024 (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Sep 27, 2024, 4:16 PM IST

World Tourism Day 2024: दरवर्षी 27 सप्टेंबर रोजी 'जागतिक पर्यटन दिन' साजरा केला जातो. लोकांना पर्यटनाविषयी जागरूक करणे तसंच त्यासाठी योगदान देण्यास प्रवृत्त करणे हा यामागील हेतू आहे. पर्यटनामुळे देशाची किंवा राज्याची आर्थिक स्थिती सुधारते तसंच स्थानिकांना देखील आर्थिक मदत होते. देश-विदेशातून पर्यटक हॉटेल्स, पर्यटनस्थळ, वाहतुक आणि रेस्टॉरंटवर खर्च करतात. यामुळे देशाचा महसूल वाढतो.

  • इतिहास : सन 1980 साली जागतिक पर्यटन दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक व्यापार संघटनेनं (UNWTO) या दिवसाची सुरुवात केली. विशेष म्हणजे या दिवशी संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक व्यापर संघटनेचा वर्धापन दिवस देखील असतो.
  • यदाची थीम: दरवर्षी विविध थीमच्या आधारे जागतिक पर्यटन दिवस साजरा केला जातो. पर्यटन आणि शांतता ही यंदाची थीम आहे. रोजगाराला चालणा देणे या थीमचं उद्देश आहे.
  • महाराष्ट्रातील सर्वात शांत आणि सुंदर पर्यटन स्थळ
  • निवती बीच : हा एक स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा असलेल्या लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे सुंदर पर्यटनस्थळ वसलेलं आहे. पांढरी वाळू आणि चमकदार स्वच्छ लाटा या ठिकणी येणाऱ्या निसर्गप्रेमींना स्वर्गाची अनुभूती देतात. हे स्थळ पर्यटकांचं मन प्रफुल्लित करतं. निवतीचा समुद्रकिणारा कुडाळपासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. इथं भेट दिल्यानंतर ताण तणाव निघून जातो. समुद्रकिनाऱ्यालगत सुपारी आणि नारळाची उंच झाडं आहेत.
World Tourism Day 2024
जागतिक पर्यटन दिन 2024 (ETV Bharat)
  • महाबळेश्वर : लोकप्रिय पर्यटन स्थळांमध्ये महाबळेश्वर सर्वात सुंदर ठिकाण म्हणून ओळखलं जातं. हे थंडहवेचं ठिकणा असून समुद्रसपाटीपासून 1 हजार 372 मिटर उंचीवर आहे. या नयनरम्य पर्यटन स्थळावर बाराही महिने पर्यटकांची गर्दी असते. याला महाराष्ट्राचं नंदनवन म्हणून देखील ओळखतात. येथे स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं.
  • अजिंठा लेणी : अजिंठा लेणी जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. या लेण्या दुसऱ्या ते चौथ्या शतकामधील आहेत. यात एकूण 29 बोद्ध लेणी आहेत. अजिंठा लेणी भारतीय कलेचं सर्वोत्तम उदाहरण आहे. दरवर्षी येथे हजारोंच्या संख्येनं विदेश पर्यटक भेट देतात. या लेण्या बौद्ध धर्मातील हीनयान आणि महायान पंथाच्या आहेत.
World Tourism Day 2024
जागतिक पर्यटन दिन 2024 (ETV Bharat)
  • चिखलदरा: सातपुडा पर्वाताच्या कुशीत चिखलदरा हिलस्टेशन आहे. हे नैसर्गिक शांततापूर्ण ठिकाण आहे. याला विदर्भाचं नंदनवन देखील म्हणतात. येथील दऱ्या मखमली धुक्यांना भरलेल्या असतात. येथील भीमकुंड हा महत्त्वाचा पॉइंट आहे, डोंगरावरून पडणारा धबधवा हे भीमकुंड पॉइंटचे वैशिष्ट्य आहे.
World Tourism Day 2024
जागतिक पर्यटन दिन 2024 (ETV Bharat)
  • गणपतीपुळे : गणपतीपुळे हे गणपतीचे प्रसिद्ध तिर्थस्थळ आहे. हे रत्नागिरी जिल्ह्यात वसलेलं आहे. येथे स्वयंभू गणेश मंदिर आहे. हे मंदिर 400 वर्षांपूर्वी बांधले गेले होते. लाखोंच्या संख्येनं येथे भाविक दर्शनासाठी येतात. येथे पर्यटकांना आकर्षित करणारा सुंदर समुंद्रकिनारा आहे.

हेही वाचा

  1. जागतिक प्रथमोपचार दिवस का साजरा केला जातो, जाणून घ्या इतिहास, थीम आणि महत्व - World First Aid Day 2024
  2. आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व - World Suicide Prevention Day 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.