ETV Bharat / health-and-lifestyle

जागतिक थॅलेसेमिया दिवसाचा इतिहास आणि महत्त्व घ्या जाणून ... - world thalassemia day 2024

World Thalassemia Day 2024: 'जागतिक थॅलेसेमिया दिवस' दरवर्षी 8 मे रोजी साजरा केला जातो. म्हणून आज आम्ही तुम्हाला आमच्या लेखात या आजाराबद्दल काही विशेष गोष्टी सांगणार आहोत.

World Thalassemia Day 2024
जागतिक थॅलेसेमिया दिवस 2024 (Representational Image(GettyImages))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 8, 2024, 12:15 PM IST

मुंबई - World Thalassemia Day 2024: आज 8 मे रोजी 'जागतिक थॅलेसेमिया दिवस' आहे. थॅलेसेमिया हा रक्ताशी संबंधित एक गंभीर आजार आहे. या आजारात व्यक्तीच्या शरीरात हिमोग्लोबिन तयार होणे थांबते. हा आजार पालकांकडून मुलांमध्ये पसरतो. हा आजार अतिशय धोकादायक आहे. यावर वेळीच उपचार न केल्यास रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. हिमोग्लोबिन कमतरतेमुळे हा आजार होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, भारतात दरवर्षी सुमारे 7 ते 10 अशी मुले जन्माला येतात, ज्यांमध्ये हा विकार आढळून येतो. या आजाराबाबत लोकांमध्ये जागरुकता वाढवण्यासाठी 8 मे रोजी 'जागतिक थॅलेसेमिया दिन' साजरा केला जातो.

थॅलेसेमिया आजार धोकादायक : हा रक्ताचा अनुवांशिक रोग आहे, ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन तयार करण्याची क्षमता कमी होते. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येतो, ज्यामुळे थकवा आणि इतर विविध लक्षणे शरीरात आढळून येतात. यानंतर शरीर सुदृढ ठेवण्यासाठी दर दोन आठवड्यांनी रक्त चढवावे लागते. थॅलेसेमिया अल्फा आणि बीटा या दोन प्रकारात आढळतो. फक्त काही लोकांना रक्ताशी संबंधित आजारांची लक्षणे आणि उपचार पद्धती माहिती आहेत. जेव्हा शरीरात पुरेसे हिमोग्लोबिन नसते, तेव्हा शरीरातील लाल रक्तपेशी नीट कार्य करत नाहीत आणि कालांतराने त्या नष्ट होतात. त्यामुळे लाल रक्तपेशी शरीरातील सर्व पेशींमध्ये ऑक्सिजन पोहोचवू शकत नाहीत आणि इतर अवयव खराब होतात.

'जागतिक थॅलेसेमिया दिना'चा इतिहास आणि थीम : थॅलेसेमिया इंटरनॅशनल फेडरेशन (TIF) द्वारे 1994 साली, आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. जॉर्ज एंगेलजोस यांनी थॅलेसेमिया इंटरनॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष आणि संस्थापक म्हणून काम केलंय. टीआईएफ, एक नॉन-प्रॉफिट ऑर्गेनाइजेशन संस्था 1986 मध्ये पॅनोस एंगेल्स यांनी त्यांचा मुलगा जॉर्ज आणि इतर थॅलेसेमिया रुग्णांच्या स्मरणार्थ स्थापन केली होती. दरम्यान दरवर्षी जागतिक थॅलेसेमिया दिन साजरा करण्यासाठी एक विशेष थीम ठेवली जाते. या वर्षीची थीम 'सक्षम जीवन, प्रगती स्वीकारणे: सर्वांसाठी समान आणि सुलभ थॅलेसेमिया उपचार' आहे.

थॅलेसेमियाची लक्षणे

सतत सर्दी आणि खोकला

अशक्तपणा कायम राहणे

अनेक प्रकारचे संक्रमण

शारीरिक विकास वयानुसार होत नाही

दात बाहेरच्या बाजूने निघणे

हेही वाचा :

  1. जागतिक मालवणी भाषा दिन : मराठी भाषेचं वैभव समृद्ध करणारी 'मालवणी' भाषा - Malvani Language Day
  2. 'जागतिक वसुंधरा दिना'निमित्त पर्यावरणाचं रक्षण करण्याची घ्या शपथ... - world earth day 2024
  3. जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्त्व आणि इतिहास - World Health Day 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.