मुंबई - World Autism Awareness Day 2024: 'जागतिक ऑटिझम जागरूकता दिवस' दरवर्षी 2 एप्रिल रोजी साजरा केला जातो. लोकांमध्ये जागरुकता वाढवण्याचे आणि ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (ASD) असलेल्या व्यक्तींच्या हक्क मिळवून देण्यासाठी अनेक संस्था जगभरात सक्रिय आहेत. या विकाराबाबत जागरूक होऊनच आपण या आजारानं ग्रस्त असलेल्या व्यक्तीप्रती संवेदनशील होऊन त्यांचं जीवन आनंदी करू शकतो. हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, जो मुलांच्या मेंदूतील बदलांमुळे होतो. 2007 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेनं साजरा केला. अनेक संस्था जगभरात ऑटिझम व्यक्तींच्या मानवी हक्क आणि स्वातंत्र्यांचे समर्थन करण्यावर जोर देत आहेत.
ऑटिझम जागरूकता दिवसाची थीम : या आजाराबाबत लोकांमध्ये एक वेगळीच वृत्ती दिसून येते. ही बहुतांश प्रसंगी उपेक्षा, न्यूनगंड, भीती अशा अनेक नकारात्मक भावनांनी भरलेली असते. ऑटिझमनं ग्रस्त मुले आणि प्रौढ योग्य उपचार, शैक्षणिक कार्यक्रम आणि वर्तणुकीशी संबंधित थेरपीच्या मदतीनं मोठ्या प्रमाणात चांगले जीवन जगू शकतात. परंतु त्यांचे उपचार योग्य वेळी म्हणजेच शक्य तितक्या लवकर बालपणात सुरू झाले पाहिजे. या वर्षी 2024, जागतिक ऑटिझम जागरूकता दिवसाची थीम आहे 'एम्पॉवरिंग ऑटिस्टिक व्हॉईसेस' म्हणजे या विकारानं ग्रस्त लोकांच्या आवाजाला बळकटी देणे, जेणेकरून असे लोक समाजात आपली जाग निर्माण करू शकेल आणि तेही चांगले आयुष्य जगू शकेल. निळ्या रंगाला ऑटिझमचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे दरवर्षी या दिवशी निळ्या रंगात दिवे लावले जातात.
ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर : ऑटिझम असलेल्या मुलांना सामाजिक क्रियाकलाप आणि संभाषणात समस्या असू शकतात. साधारणपणे हा विकार बालपणातच 2-3 वर्षांच्या वयात आढळून येतो. 'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन'च्या मते, जगभरातील प्रत्येक 100 मुलांपैकी 1 मुलाला ऑटिझम आहे. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरमध्ये, पीडित व्यक्तीची वागणूक आणि विचार करण्याची क्षमता इतरांपेक्षा वेगळी असते. चेहऱ्यावरील आणि आवाजाचे भाव हे वेगळे असतात. याशिवाय त्यांना समोरच्या व्यक्तीची देहबोली समजण्यात अडचण येऊ शकते, ज्यामुळे त्यांना समोरची व्यक्ती काय बोलत आहे हे समजण्यात अडचण येते.
ऑटिझमने प्रभावित प्रसिद्ध व्यक्ती
डॅन आयक्रोयड - अभिनेता आणि चित्रपट लेखक
अल्बर्ट आइनस्टाईन - वैज्ञानिक आणि गणितज्ञ
डॅरिल हॅना - अभिनेत्री आणि पर्यावरण कार्यकर्ता
अँथनी हॉपकिन्स - अभिनेता
टिम बर्टन - चित्रपट दिग्दर्शक
हेन्री कॅव्हेंडिश - शास्त्रज्ञ
चार्ल्स डार्विन - निसर्गशास्त्रज्ञ, भूवैज्ञानिक आणि जीवशास्त्रज्ञ
एमिली डिकिन्सन - कवी
बॉबी फिशर - बुद्धिबळ ग्रँडमास्टर
बिल गेट्स – मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे सह-संस्थापक
बार्बरा मॅकक्लिंटॉक - शास्त्रज्ञ आणि सायटोजेनेटिकिस्ट
सर आयझॅक न्यूटन - गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ
एलोन मस्क - उद्योजक, टेस्ला सीईओ
हेही वाचा :