ETV Bharat / health-and-lifestyle

निद्रानाशाची गंभीर समस्या आहे? तर आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश; निद्रानाश होईल दूर - Foods that help better sleep - FOODS THAT HELP BETTER SLEEP

Foods that help better sleep : आधुनिक जीवनशैलीत माणसाला भेडसावणाऱ्या समस्यांपैकी 'निद्रानाश' ही एक प्रमुख समस्या आहे. चांगली झोप न झाल्यास त्याचा परिणाम कामावर होतो. तुम्हालाही या समस्येपासून सुटका पाहिजे असेल तर डॉक्टरांनी आहारातीबाबात दिलेले काही उपाय पाळावेत.

Foods that help better sleep
निद्रानाशाची गंभीर समस्या (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Aug 27, 2024, 12:15 PM IST

Updated : Aug 27, 2024, 1:21 PM IST

हैदराबाद Foods that help better sleep : दिवसभराच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना रात्री लवकर झोप लागणं एक अवघड काम वाटायला लागलं आहे. तणावपूर्ण वातावरण, अपेक्षांचे ओझे, घरच्यांकडून अपेक्षा यामुळं आज अनेकांना निद्रानाशाची समस्या भेडसावत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यत लोकं या आजाराने ग्रस्त झाले आहेत. झोपेच्या कमतरतेमुळं अनेक जण ओव्हवेटचे शिकार होत आहेत. तसंच बीपी आणि मधुमेह यासारख्या अनेक प्रकारच्या दीर्घकालीन आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो आहे. रात्री जास्त काळ फोन पाहणं, तवाण आणि चिंता ही देखील निद्रानाशाची कारणे आहेत. एवढेच नव्हे तर आपण जे अन्न खातो त्याचा देखील झोपेवर परिणाम होतो, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

पोषण विज्ञान तज्ज्ञ प्रोफेसर डॉ. एरिका जॉन्सन ( Erica Janses) यांनी सांगितलं की, मिशिगन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थनं नुकताच एक अभ्यास केला आहे. यामध्ये रोजच्या खाण्याच्या सवयीमुळे निद्रानाश होवू शकतो. तसचं दीर्घकाळापर्यंत निद्रानाश आणि स्लीप एपनियासारखे आजार होवू शकतात. यामुळे चांगली झोप यावी याकरिता कोणतं अन्न ग्रहण करावं याबद्दलची माहिती त्यात दिली आहे.

भरपूर फळं खाणारे घेतात पुरेशी झोप : हे संशोधन अमेरिकेतील १८ वर्षीय तरुणावर करण्यात आलं. या संशोधनात स्पष्ट झालं की, ज्यांच्या आहारामध्ये भरपूर फळं आणि भाज्या असतात त्यांच्या तुलनेत कमी भाज्या आणि फळं खाणारी लोकं कमी झोपतात. आहार आणि झोप एकमेकांवर अवलंबून असते. डॉ. एरिया जेन्सन यांनी सांगितलं की, आरामदायी झोपेसाठी कोणतेही विशेष अन्न किंवा पेय नाही. उत्तम पौष्टिक आहार घेतल्यास निंद्रानाश टळू शकतो. आजच्या या लेखात उत्तम झोप यावी याकरिता काय खावं आणि काय खावू नये याबद्दल आम्ही माहिती देत आहोत.

  • कोणती पदार्थ खावू नयेत
  1. प्रक्रिया केलेले अन्न
  2. खूप तळलेले
  3. बर्गर
  4. संतृप्त चरबीयुक्त पदार्थ
  5. पांढरा ब्रेड
  6. पास्ता
  7. परिष्कृत कर्बोदके
  8. दारू
  9. कॅफिन
  10. रसायनांनी पिकवलेले अन्न
  • तुम्हाला चांगले झोपण्यासाठी खाणे आवश्यक आहे
  1. फायबर समृध्द अन्न
  2. हिरव्या भाज्या
  3. ऑलिव्ह तेल
  4. मांस
  5. मासे
  6. दुग्धजन्य पदार्थ (दूध, दही, चीज)
  7. किवी फळ
  8. चेरी
  9. बेरी फळ
  10. लोह आणि व्हिटॅमिन समृद्ध अन्न

रात्री उशिरा जेवणं आणि प्रोसेस्ड फूड खाल्ल्यानं झोपेवरही परिणाम होतो, असं पोषण विज्ञान तज्ज्ञ प्रोफेसर डॉ. एरिका जेन्सेन सांगतात. अल्कोहोल आणि कॅफिनसारखे पदार्थ टाळावेत. झोपण्याच्या सुमारे 3 तास आधी जास्त अन्न न खाण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय रात्रीच्या वेळी फोन आणि कॉम्प्युटरसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर करू नये, असं संशोधनात सांगण्यात आले.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचकांसाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )

हेही वाचा

  1. बैठे काम करणाऱ्यांनी 'हा' डायट प्लॅन फॉलो करा; आरोग्याची समस्या टळेल - ICMR Diet Plan
  2. ड्रॅगन फ्रुटचे 'हे' आहेत ८ आरोग्यदायी फायदे; आवर्जून आहारात करा समावेश - Benefits Of Eating Dragon Fruit

Last Updated : Aug 27, 2024, 1:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.