हैदराबाद LADA Diabetes : सर्वाधिक झपाट्यानं वाढणाऱ्या आजारात मधुमेहाचा समावेश झाला आहे. चिंतेची बाब म्हणजे भारत हा मधुमेह रुग्णांचा हब होत चालला आहे. या आजाराने माणूस शारीरिकच नाही तर माणसिक दृष्ट्या ही खचत चाललेला आहे. आजपर्यंत या आजाराचे दोन मुख्य प्रकार, टाईप 1 आणि टाईप 2 चाच विळखा होता. परंतु आता टाईप 1.5 मधुमेहाची अनेकांना लागण होत आहे. याला प्रौढांचा सुप्त स्वयंप्रतिकार मधुमेह म्हणतात. टाईप 1.5 मधुमेह हा टाईप 1 आणि टाईप 2 सारखाच आहे. याला प्रौढांचा सुप्त स्वयंप्रतिकार मधुमेह (Latent autoimmune diabetes of adults - LADA)) म्हणतात परंतु, हा निराळा कसा? याची लक्षणे कोणती? प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत? हे माहिती करून येऊयात.
टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेह म्हणजे काय : मधुमेहाचे दहापेक्षा जास्त प्रकार आहेत. यापैकी दोन महत्त्वाचे आहेत. टाइप 1 मधुमेह, टाइप 2 मधुमेह. या आजाराची लागण झालेल्या लोकांच्या रक्तातील ग्लुकोजची (साखर) पातळी सामान्यपेक्षा जास्त असते. टाइप 1 मधुमेह ही एक स्वयंप्रतिकार स्थिती आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वादुपिंडातील इन्सुलिन संप्रेरक-उत्पादक पेशींवर हल्ला करते आणि नष्ट करते. त्यामुळे इन्सुलिन तयार होत नाही किंवा खूप कमी होतात. टाइप 1 मधुमेह सहसा लहान मुलं आणि तरुण प्रौढांमध्ये दिसून येतो. टाइप 2 मधुमेह ही स्वयंप्रतिकारक नाही. टाइप 2 मधुमेहात पेशी इंसुलिनशी संवाद साधू शकत नाहीत. यामुळे स्वादुपिंड रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करु शकत नाही.
टाइप 1.5 मधुमेह म्हणजे काय? टाइप 1 मधुमेहामध्ये, रोगप्रतिकारक शक्ती स्वादुपिंडाच्या पेशींवर हल्ला करते जे इन्सुलिन तयार करतात. त्यानंतर टाइप 1.5 मधुमेह होतो. 1.5 मधुमेह झालेल्या लोकांना सहसा इन्सुलिनची लगेच गरज भासत नाही. यामागील कारण म्हणजे त्याची स्थिती हळूहळू बिघडते. 1.5 मधुमेह असलेल्या बहुतांश लोकांना निदान झाल्यानंतर पाच वर्षांच्या आत इन्सुलिन वापरावं लागते.
टाइप 1.5 मधुमेहाची लक्षणे आणि उपचार: टाइप 1.5 मधुमेहाची लक्षणे प्रत्येकामध्ये सारखी नसतात. व्यक्तीनुसार बदलते. जास्त तहान लागणे, वारंवार लघवी होणे, थकवा येणे, दृष्टी कमजोर होणे, हात-पायाला मुंग्या येणे, अचानक वजन कमी होणे ही टाइप 1.5 मधुमेहाची लक्षणे आहेत. जर एखाद्याला अशी लक्षणे असतील तर त्याने मधुमेह निदान चाचणी करून घेणे चांगले. सुरुवातीला, प्रकार 1.5 मधुमेह नियंत्रित करण्यासाठी औषधे पुरेशी असतात. रक्तातील ग्लुकोजची पातळी सामान्य मर्यादेपेक्षा जास्त वाढल्यास इन्सुलिनचा वापर करावा लागेल.
संदर्भ