ETV Bharat / health-and-lifestyle

'ही' लक्षणं दिसल्यास व्हा सतर्क; असू शकतो 'थायरॉईड'

बदलत्या जीवनशैमुळे महिलांमध्ये थायरॉईचं प्रमाण वाढत आहे. वाचा सविस्तर

Symptoms Of Thyroid In Marathi
थायरॉईडची लक्षणं (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Health Team

Published : 18 hours ago

Symptoms Of Thyroid In Marathi: बदलती जीवनशैली, अयोग्य खाण्याची सवय आणि शारीरिक हालचालींच्या अभावामुळे अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. विशेषतः महिलांमध्ये थायरॉईडची समस्या वाढू लागली आहे. प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. पी. व्ही. राव यांनी थायरॉईडमुळे होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांबद्दल माहिती दिली आहे. चला तर पाहूया थायरॉईमुळे कोणत्या समस्या उद्भवतात.

आपल्या शरीरातील इतर अवयवांच्या तुलनेत थायराईड प्रणाली सर्वात महत्वाची आहे. थायरॉईड ग्रंथी चयापचयाचे नियमन करण्याचे महत्वाचे कार्य करते. परंतु, थायरॉईड ग्रंथीद्वारे उत्सर्जित होणारे थायरॉक्सिन संप्रेरक खूप जास्त किंवा खूप कमी असल्यास, विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात. थायरॉईडमुळे होणाऱ्या समस्या दोन प्रकारात विभागल्या जाऊ शकतात. जर थायरॉईड संप्रेरक आवश्यक पातळीपेक्षा जास्त प्रमाणात तयार होत असेल तर अशा स्थितीला हायपरथायरॉईडीझम म्हणतात आणि जेव्हा थायरॉईड संप्रेरक सामान्य पातळीपेक्षा कमी होते तेव्हा त्याला हायपोथायरॉईडीझम म्हणतात.

  • हायपोथायरॉईडची लक्षणं
  • थायरॉईड ग्रस्त लोक सहसा तीव्र थकवा सहन करतात.
  • थायरॉईड हार्मोन्स कमी झाल्यास वजन वाढते
  • केस गळतात
  • अतिप्रमाणात घाम येतो
  • मानेवर सूज येणे, थायरॉईड ग्रंथीतील बदलांमुळे मानेची सूज येते.
  • शरीराच्या तापमानात बदल होतो. तापमान एकाच वेळी वाढते किंवा कमी होते. हवामान चांगले असले तरीही थंडी किंवा गरमी वाटते
  • त्वचा कोरडी होते
  • नखे ठिसूळ होतात
  • पाय आणि हातांमध्ये पेटके
  • हाताला मुंग्या येणे
  • बद्धकोष्ठता
  • असामान्य मासिक पाळी
  • हायपरथायरॉईडीझमची लक्षणं
  • शरीरात थायरॉईड संप्रेरक वाढल्यास शरीराचं वजन एकाच वेळी कमी होते.
  • स्नायू कमकुवत होतात तसंच हात थरथरतात.
  • डोळ्यांच्या समस्या
  • अतिसार वेदना
  • अनियमित मासिक पाळी
  • हायपोथायरॉईडीझनं, वाढलेल्या चरबीमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. हृदयापासून ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी वरदान आहे एबीसी ज्यूस; आजच करा आहारात समावेश
  2. दिवसातून 20 हजार पावलं चालल्यास होतात 'हे' आश्चर्यकारक फायदे
  3. डाळिंबाचा रस पिण्याचे आश्चर्यकारक फायदे
  4. गुडघेदुखीसाठी उत्तम आहेत 'हे' पदार्थ; गुडघेदुखी होईल छुमंतर
  5. ववर्कआउटनंतर करा 'या' पदार्थांचं सेवन; दिवसभर रहा ताजेतवाणे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.