Cheapest Rate Flight Booking Tips: सणासुदीच्या काळात ट्रॅव्हल्स, बस आणि विमानांचं भाडं झपाट्यानं वाढतं. या काळात अनेकांना तिकीट मिळत नाही. तर बहुतांश वेळा दुप्पट भाडं देवून प्रवास करावा लागतो. यामुळे आपलं बजेट बिघडते. परंतु खिशाला अधिक ताण न देता विमान प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर 'व्हिसा'ने दिलेल्या काही टीप्सचा वापर करा. तुम्हाला नक्की फायदा होईल.
- प्राइस अलर्ट्स सेट करा आणि लवकर बुकिंग करा: विमान सेवांचा लाभ घेण्यासाठी फ्लाइट्स प्राइज अलर्ट्स सेट करा. यामुळे तुम्हाला अधिक पर्याय मिळू शकतात. तसंच सर्वोत्तम डील्स सुनिश्चित करू शकता. यामुळे सुट्ट्यांच्या कालावधीत दरांमध्ये होणारी वाढ टाळता येवू शकते.
- रिवॉर्ड्सचा फायदा घ्या: तुमच्या प्रवासात क्रेडिट कार्ड बहुमूल्य सोबती ठरू शकतो. व्हिजा नेटवर्कमधील अनेक को-ब्रॅण्डेड कार्डवर सूट, मोफत अपग्रेड्स तसंच पॅाइण्ट्ससह अनेक लाभ मिळतात. आगामी प्रवासाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी क्रेडिट कार्ड्सच्या माध्यमातून पैशाची बचत करता येऊ शकते.
- नो-कॉस्ट ईएमआय पर्याय: फ्लाइट बुकिंगसाठी नो-कॉस्ट ईएमआय पर्याय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे व्याज-मुक्त हप्त्यांमध्ये पेमेंट्स करण्याची सुविधा तुम्हाला मिळते. त्याचबरोबर हप्ता देखील परवडणारा असतो.
- कनेक्टिंग फ्लाइट्सचा: दूरच्या प्रवासासाठी किंवा कमी दरांसाठी थेट फ्लाइट्सऐवजी कनेक्टिंक फ्लाइट्सचा पर्याय चांगला आहे. यामुळे बजेटचे व्यवस्थापन चांगल्याप्रकारे होईल. यासाठी काळजीपूर्वक गंतव्याचं मूल्यांकन करा आणि बजेटला परवडेल अशा कनेक्टींग फ्लाइट्सची निवड करा.
- उच्च कन्वर्जन दर टाळा: आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी कमी कन्वर्जन दर देणारे मल्टी-करन्सी फोरेक्स कार्ड्स किंवा क्रेडिट कार्ड्सचा अवलंब करा. या लहान लहान नियोजनामुळे तुमची मोठ्या प्रमाणात बचत होईल. यामुळे तुम्हाला प्रवासादरम्यान धमाल अनुभवांवर अधिक खर्च करता येवू शकतो. या उपयुक्त टिप्ससह तुम्ही आत्मविश्वासानं प्रवास करू शकता.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही.)