टोकियो Syphilis Case Rising in japan: कोरोनानंतर सिफलिस नावाच्या नव्या आजारानं युरोपातील अनेक देशांमध्ये धूमाकुळ घातला आहे. टोकियोमध्ये सिफिलीसची प्रकरणं झपाट्यानं समोर येत आहेत. आतापर्यंत 2400 हून अधिक रुग्ण समोर आल्याचं अधिकृत आकडेवारीवरून दिसून आलं आहे. वृत्तसंस्था शिन्हुआच्या मते, टोकियो मेट्रोपॉलिटन इन्फेक्शियस डिसीज सर्व्हिलन्स सेंटरच्या आकडेवारीनुसार राजधानीत सुमारे 2,460 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तज्ज्ञांच्या मते सिफिलीसची प्रकरणं वेगानं वाढत आहेत. गेल्या वर्षी 3,701 प्रकरणे नोंदवली गेली होती.
सिफिलीसची लक्षणं : सिफिलीस एक बॅक्टिरेयल इन्फेक्शन आहे. जो प्रामुख्यानं लैंगिक संपर्काद्वारे पसरतो. हा आजार झाल्यानंतर व्यक्तीच्या शरीरामध्ये ट्रॅपोनेमा पॅलिडम नावाचा विषाणू तयार होतो. यामुळे शरीराला खाज सुटते. त्यानंतर विषाणू शरीरातील इतर अवय डॅमेज करतो. या आजाराची लागण गरोधर महिलांना झाल्यास नवजात बाळाला पुरळ आणि विकृती निर्माण होते. संसर्ग झालेल्या मुलांमध्ये लहान वयात कोणतीही लक्षणं दिसत नाही. काही वर्षानंतर डोळ्यांना सूज येणे आणि श्रवण क्षमता कमी होणे यासारखी लक्षणं दिसू शकतात. या आजारावर प्राथमिक अवस्थेत योग्य उपचार केला तर तो बरा होण्याची शक्यत आहे. परंतु सिफिलीसवर उपचार न केल्यास मेंदू आणि हृदयात गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.
70 टक्के रुग्ण पुरुष : आकडेवारीनुसार, सिफिलीसचे सुमारे 70 टक्के रुग्ण पुरुष आहेत. हा रोग विशेषतः 20 ते 50 वर्षे वयोगटातील पुरुषांना आणि 20 ते 30 वयोगटातील महिलांना प्रभावित करतो. संस्थेच्या म्हणण्यानुसार, बरेच संक्रमित व्यक्ती चुकून विश्वास ठेवतात की ते सुरक्षित आहेत कारण त्यांना वर्षानुवर्षे संसर्गाची माहिती नसते, ज्यामुळे सिफिलीस हा एक दुर्लक्षित आजार आहे.
टोकियोने सिफिलीस प्रकरणांमध्ये विक्रमी वाढ रोखण्यासाठी शिंजुकू आणि तामा सारख्या भागात विनामूल्य चाचणी आणि समुपदेशन कक्ष स्थापन केले आहेत. सार्वजनिक आरोग्य केंद्रांवर चाचणी देखील उपलब्ध आहे, शिंजुकू केंद्र 24-तास ऑनलाइन बुकिंग आणि शनिवार आणि रविवार चाचणी ऑफर करते. टोकियो मेट्रोपॉलिटन सरकारने रहिवाशांना काही समस्या असल्यास त्वरित चाचणी घेण्याचे आवाहन केले आहे.