How To Care Your Heart: हृदय विकाराची समस्या दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करत आहे. दररोज मृत्युचे नवे आकडे समोर येतात. खेळताना, गातांना, धावताना, चालताना किंवा व्यायाम करताना अचानक हृदय बंद पडतो आणि मृत्यू होतो. अनेकांनी तर झोपेतच जीव गमावला आहे. गेल्या काही वर्षात हृदयाशी संबंधित प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळं प्रत्येकाला आपल्या हृदयाची काळजी घेणं गरजेचं आहे. निरोगी हृदयासाठी नियमित योगासनं आणि व्यायामासोबतच निरोगी खाण्याची सवयी खूप महत्त्वाची आहे. नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात असं दिसून आलं की, दिवसातून किमान 30 मिनिटं योगा आणि व्यायाम केल्यानं हृदयविकाराचा धोका कमी होतो.
हेल्थ केअर पॉलीक्लिनिक, ठाणेचे जनरल फिजिशियन डॉ. रवी सिंग यांनी सांगितलं की, हृदय हे आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळं शरीरात रक्ताभिसरण होते. तसंच संपूर्ण शरीराला ऑक्सिजन आणि पोषक तत्वं पोहोचवण्याचं काम हृदय करतो. तुमचं हृदय निरोगी ठेवणं महत्त्वाचं आहे. नियमित योगासन आणि व्यायाम केल्यास हृदय मजबूत आणि निरोगी राहतं. तसंच रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास व्यायाम करणं गरजेचं आहे. कारण या दोन्ही समस्या प्रामुख्यानं हृदयविकाराला कारणीभूत ठरतात.
- कोणता व्यायाम किती वेळे करावा: यासोबतच कोणता व्यायाम आणि किती वेळा करावा हे जाणून घेणं आवश्यक आहे. याकरिता प्रशिक्षित प्रशिक्षकाचा सल्ला घ्यावा. जर तुम्ही कोणत्याही विशिष्ट प्रकारचा व्यायाम सुरू करत असाल तर तुम्हाला त्यासंबंधीची खबरदारी, आहार आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींकडं लक्ष देणं आवश्यक आहे. जर तुम्हाला उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, मधुमेह किंवा काही जुने आजार यांसारख्या हृदयाशी संबंधित समस्या असतील, तर तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि एरोबिक्स यासारखे कोणतेही विशेष व्यायाम सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- हृदयासाठी आरोग्यदायी व्यायाम: मुंबई येथील हेड टू फिटनेस सेंटरच्या ट्रेनर झरीन परेरा यांनी सांगितलं की, हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी विशिष्ट प्रकारचे व्यायाम आणि सराव यांचा रोजच्या दिनक्रमात समावेश करणं आवश्यक आहे.
- योग आणि ध्यान: योगामुळं मानसिक शांतीसोबतच शारीरिक फायदेही होतात. ताडासन, वीरभद्रासन आणि भूजंगासन यासारखी योगासनं हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. योगामुळं तणाव कमी होतो. रक्तदाब नियंत्रित राहतो. हृदयाच्या धमन्यांमध्ये रक्ताचा प्रवाह योग्य प्रकारे होतो. तसंच नियमित प्राणायाम केल्यानं छाती किंवा अनुलोम विलोम केल्यानं हृदय गती नियंत्रित करून रक्तदाब कमी होतो.
- एरोबिक व्यायाम: चालणं, जॉगिंग, सायकलिंग यासारख्या एरोबिक व्यायामामुळं हृदय मजबूत होण्यास मदत होते. या व्यायामामुळं हृदयाची गती वाढते आणि शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा चांगल्याप्रकारे होतो. दररोज ३० मिनिटे एरोबिक व्यायाम केल्यानं हृदयविकाराचा धोका कमी होतो.
- स्ट्रेंथ ट्रेनिंग: जड वजन उचलणं आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्यानं स्नायू मजबूत होतात. तसंच चयापचय सुधारतं. हे हृदय गती स्थिर करते आणि रक्तदाब नियंत्रित करते. आठवड्यातून 2-3 वेळा हा व्यायाम केल्यानं स्नायू आणि हृदय मजबूत होते.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)