Author Han Kang: कोरीयाच्या लेखिका हान कांग या 2024 च्या नोबल पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या. साहित्यात नोबल पारितोषिक प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या आशियाई महिला आहेत. जीवनातील मार्मिक कथा अतिशय चांगल्या प्रकारे सादर केल्याबद्दल त्यांना हा मान मिळाला. सन 1993 साली त्यांनी कवितांच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली. तसंच 1995 मध्ये त्यांनी कथा- कादंबऱ्या लिहिण्यास सुरुवात केली. त्यांचा जन्म कोरियातील ग्वांग्जू येथे 27 नोव्हेंबर 1970 मध्ये झाला. लेखनाचं बाळकडू त्यांना त्याच्या वडीलांकडून मिळालं.
हान कांग यांच्या लेखणातून मानवी जीवनातील अस्वस्थ्य सत्य प्रकट होतात. आतापर्यंत तुम्ही त्यांची एकही पुस्तक वाचली नसेल तर त्यांच्या कोणत्या पुस्तकांपासून सुरुवात केली पाहिजे याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत. या कादंबऱ्या वाचल्यास तुमचा देखील जीवनाकडं पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल.
- द व्हेजिटेरियन: 2016 मध्ये त्याच्या 'द व्हेजिटेरियन' या कादंबरीला मॅन बुकर इंटरनॅशनल पारितोषिक मिळालं आहे. एका महिलेला मांसाहार खाणं थाबविण्याच्या निर्णयाचं विचित्र परिणाम उलगडून सांगणारी ही कांदबरी आहे.
- ह्यूमन अॅक्ट: 1980 मध्ये दक्षिण कोरियातील सैन्यांनी मारलेल्या ग्वांगजू लोकांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी आहे. त्यांची ही पुस्तक 2014 मध्ये प्रसिद्ध झाली. या कादंबरीत हिंसाचार, सामूहिक आघात आणि स्मरणशक्तीची निर्दयता दर्शवते. माणसाला भेडसावणारं दुःख आणि जीवनातील नाजूकपणा अधोरेखित करतं. ही कादंबरी 2018 मध्ये बुकर पुरस्कारासाठी अंतिम फेरीत होती.
- द व्हाइट बुक: या पुस्तमध्ये जन्माच्या दोन तासांच्या आत मृत्यू झालेल्या सावत्र बहिणीच्या दुखाचं वर्णन करतं. हान यांनी आपल्या काव्यात्मक भाषेक जन्म-मृत्यूची कहाणी प्रतिबिंबित केली आहे. मनुष्य हानी आणि त्यासोबत येणाऱ्या दुःखाचा सामना कसा करावा लागतो. हे या पुस्तकात मांडण्यात आलं आहे.
- आय डू नॉट बीड फेअरव्हेल: दक्षिण कोरियातील जेजू उठावाच्या भावनिक आणि ऐतिसाहिक दरीला संबोधित करतो. यात हजारो लोक मारले गेले. हान कांन आणी तीन स्त्रियांच्या दृष्टीकोनातून वाचकांना घटनेमुळं झालेलं नुकसान, दुःख आणि आठवणी यांचं वर्णन या पुस्तकामध्ये केलं आहे.
- वी डू नॉट पार्ट: जीवन-मृत्यू, स्मृती-इतिहास आणि मानवी अस्तित्वाची नाजूकता यांच्यातील सीमारेषा शोधणारी ही कादंबरी आहे. कथा क्युंगा, ऐतिहासिक हत्याकांडांच्या वारंवार दुःस्वप्नांनी ग्रस्त असलेल्या महिलेवर आहे. ती मित्र इन्सनला मदत करण्यासाठी जेजू बेटावर जाते, जो जखमी आणि रुग्णालयात भरती असतो.
हेही वाचा
व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर