ETV Bharat / health-and-lifestyle

डॉक्टर दिनानिमित्त इतिहास, थीम आणि महत्त्व जाणून घ्या... - national doctors day 2024 - NATIONAL DOCTORS DAY 2024

National Doctor's Day 2024 : आज 1 जुलैला डॉक्टर दिन साजरा केला जातो. हा दिवस डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ असून या दिवसाचं विशेष महत्व आहे.

National Doctor s Day 2024
राष्ट्रीय डॉक्टर दिन 2024 (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 1, 2024, 7:09 PM IST

मुंबई - National Doctor's Day 2024 : डॉक्टर हे या पृथ्वीवरील देवाचे दुसरे रूप असल्याचं अनेकजण म्हणतात. एक डॉक्टर एखाद्या व्यक्तीला मृत्यूच्या तावडीतून वाचवण्यासाठी आणि त्याला नवीन जीवन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. या संदर्भात, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि डॉक्टरांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी, आपल्या देशात दरवर्षी 1 जुलै हा दिवस राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जात असतो. प्रसिद्ध डॉक्टर आणि बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा दरवर्षी करण्यात येते. दरवर्षी हा खास दिवस साजरा करण्यासाठी एक खास थीम ठरवली जाते.

राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाची थीम : 2024 मधील राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाची थीम 'हीलिंग हँड्स, कॅरिंग हार्ट्स' आहे जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये डॉक्टर्स डे हा काही विशिष्ट दिवशी साजरा केला जातो. दरम्यान यादिवशी प्रसिद्ध चिकित्सक डॉ. बिधानचंद्र राय यांचा जन्म 1 जुलै 1882 रोजी झाला होता. त्यांचा मृत्यू देखील 1 जुलै 1882 रोजी झाला होता. 1962 साली त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यासाठी १ जुलै रोजी डॉक्टर्स डे साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली. या दिवसाचं विशेष महत्व आहे. डॉक्टरांचे योगदान आणि त्यांच्या कार्याबद्दल लोकांना जागरूक करणे असून ते आपल्या सुख-दु:खाचा त्याग करून रुग्णांसाठी जगतात. समाज रोगमुक्त ठेवण्यात काम ते करतात.

कोविडमधील डॉक्टरांचे कार्य : कोविड संसर्गाच्या काळात जीवाची पर्वा न करता तासनतास ड्युटी करत असलेले डॉक्टरांनी अनेक लोकांचे प्राण वाचवलं आहे. यामध्ये अनेक डॉक्टरांनाही आपला जीव गमवावा लागला. तरीही डॉक्टरांनी हार न मानता आपले कार्य सुरू ठेवले होते. या डॉक्टरांच्या बलिदानाचेही या दिवशी स्मरण केले जाते. राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या विशेष प्रसंगी तुम्ही डॉक्टरांच्या योगदानाबद्दल त्यांचे आभार देखील मानू शकता. आजच्या या विशेष प्रसंगी तुम्ही आपल्या ओळखीमधील काही डॉक्टर्सला या दिवसाच्या शुभेच्छा देऊन कृतज्ञता व्यक्त करा, यामुळे त्याच्या चेहऱ्यावर थोडी हसू नक्की उमटेल.

हेही वाचा :

  1. 'आंतरराष्ट्रीय योग दिना'चा काय आहे इतिहास, जाणून घ्या, योगचे महत्त्व आणि फायदे - International Yoga Day 2024
  2. सक्रिय राहू इच्छिता, तर करा 'हा' व्यायाम - monday motivation
  3. 'जागतिक रक्तदाता दिवस'!जाणून घ्या रक्तदानाचे फायदे - WORLD BLOOD DONATION DAY

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.