World Vegetarian Day: जगभरात 1 ऑक्टोबर हा 'जागतिक शाकाहारी दिवस' म्हणून साजरा केला जातो. लोकांना शाकाहारी पदार्थांच्या फायद्यांविषयी जागृत करणं हा यामागील उद्देश आहे. चांगल्या आरोग्यासाठी शरीराला सर्व पोषक घटकांची आवश्यकता असते. म्हणून आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी शाकाहारी अन्न खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. याचबरोबर शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अन्न महत्त्वाची भूमिका बजावते. चला तर मग जाणून घेऊया शाकाहारी खाण्याचे आश्चर्यकारक फायदे.
शरीराच्या उत्तम कार्यासाठी व्हिटॅमिन बी12 एक आवश्यक पोषक घटक आहे. बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की, बी 12 मांसाआहारमुळेच मिळतो. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे शरीरात रक्ताची कमतरता भासते. तसंच याच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, थकवा, बद्धकोष्ठता आणि वजन कमी होणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. परंतु मांसाआहार वगळता असेही काही घटक पदार्थ आहेत. जे शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची मात्रा पूर्ण करु शकतात.
- इतिहास: जागतिक शाकाहारी दिनाची स्थापना 1977 मध्ये नॉर्थ अमेरिकन व्हेजिटेरियन सोसायटी (NAVS) द्वारे करण्यात आली. 1978 मध्ये आंतरराष्ट्रीय शाकाहारी संघानं त्याला मान्यता दिली. NAVS ने 1 ऑक्टोबर 1977 रोजी जागतिक शाकाहारी दिवस सुरू केला होता. 1978 मध्ये आंतरराष्ट्रीय शाकाहारी संघानं याला मान्यता दिली, तेव्हापासून जागतिक शाकाहारी दिवस साजरा केला जातो.
- थीम : दरवर्षी वेगवेगळ्या थीमच्या आधारे हा दिवस साजरा केला जातो. 'मिक्स इट अप'! ही जागतिक शाकाहारी दिन 2024 ची थीम आहे.
- व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता पूर्ण करणारे शाकाहारी पदार्थ
- बीट : बीट हे आयर्नचे स्रोत आहे परंतु यात व्हिटॅमिन बी 12 देखील मुबलक प्रमाणात आहे. बीटरुटचा आहारात समावेश केल्यास रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते. तुम्ही बीट ज्यूस बनवून पिऊ शकता किंवा सॅलाडच्या स्वरुपात बीटचा आहारात समावेश करु शकता.
- बटाटा : बटाट्याची भाजी सर्वांना आवडते. बटाटा आवश्यक पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. तसंच व्हिटॅमिन बी 12 असलेल्या सर्वोत्तम भाज्यांपैकी एक आहे. शियाव यामध्ये पोटॅशियम, स्टार्च, सोडियम पोषक घटक आढळतात. तसंच बटाट्यामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात आहे.
- ब्रोकोली : ब्रोकलीमध्ये व्हिटॅमिन बी 12 चांगल्या प्रमाणात आहे. यासोबतच ब्रोकलीमध्ये फोलट असते. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता पूर्ण करते.
- संत्री आणि ब्लूबेरी: ब्लूबेरी आणि संत्रामध्ये व्हिटॅमिन बी 12 चांगल्या प्रमाणात असतं. तसंच ब्लूबेरीमध्ये अॅंटीऑक्सिडंट्स आणि संत्राध्ये बीटा -कॅरोटीन, कॅल्शियम आणि अॅंटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. हे पोषक घटक शरीरासाठी महत्वाचे आहेत. यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. वजन कमी होते तसंच तणाव, मधुमेह आणि कर्करोगासारख्या आजारांशी लढण्यास मदत होते.
- सफरचंद आणि केळी : सफरचंदमध्ये फ्लेव्होनॉइड्स, अॅंटीऑक्सिडंट्स आणि फायबर बरोबर व्हिटॅमिन बी 12 पुरेशा प्रमाणात असतो. यासोबच केळी व्हिटॅमिन बी 12 चा चांगला स्त्रोत आहे. याशिवाय केळीमध्ये फायबर आणि जीवनसत्त्वे आढळतात. जे रक्तदाब आणि तणाव कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत.
संदर्भ
https://ods.od.nih.gov/factsheets/VitaminB12-HealthProfessional/
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)