ETV Bharat / health-and-lifestyle

लोक आत्महत्या का करतात? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत - Warning Sign Of Suicide

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 15, 2024, 6:00 AM IST

Updated : Sep 15, 2024, 1:19 PM IST

Warning Sign Of Suicide: दिवसेंदिवस आत्महत्या करण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. तज्ज्ञांच्या मते यामागे अनेक कारणं असू शकतात. परंतु आत्महत्या सारखं कठोर पाऊल उचलणाऱ्या व्यक्तीमध्ये असे काही बदल जाणवतात. हे बदल लक्षात आल्यास आपण इतरांचा जीव वाचवू शकतो. चला तर जाणून घेऊया कोणती आहेत कारणं ज्यामुळे आपण इतरांचा जीव वाचवू शकतो.

Warning Sign Of Suicide
लोक आत्महत्या का करतात? (ETV Bharat)

हैदराबाद Warning Sign Of Suicide : मनात येणारे आत्महत्येचे विचार विनाकारण येत नाहीत. बहुतांश वेळा त्यामागं अनेक कारणं असू शकतात. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींमध्ये अनेक पूर्वीपासूनच लक्षणं आढळून येतात. आज आपण कोणत्या गोष्टींकडं दुर्लक्ष केलं पाहिजे याबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या अजूनही त्याच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. 34 वर्षीय तरुण अभिनेत्यानं आत्महत्या केल्यानं चित्रपटसृष्टीत आणि नेटिझन्समध्ये खळबळ उडाली होती. एवढा प्रतिभावान तरुण अभिनेता आत्महत्या करेल, असं कुणाला वाटलं नव्हतं. नुकतेच मलायका अरोराचे सावत्र वडील अनिल मेहता यांनी सुद्धा आत्महत्या केली. वडिलांच्या अचानक जाण्यानं मलायका खूप दुःखी आहे. रिपोर्ट्सनुसार, सुशांत सिंग राजपूत आणि अनिल मेहता यांच्या आत्महत्येमागील मुख्य कारण म्हणजे नैराश्य.

10 सप्टेंबर रोजी जगभरात जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागील उद्देश म्हणजे, लोकांमध्ये जनजागृती करणं होय, यामुळे अनेकांचे जीव वाचू शकतील. आत्महत्येवर चर्चा होणं गरजेचं आहे. कारण गेल्या काही वर्षांत आत्महत्येच्या घटनामध्ये झपाट्यानं वाढ होत आहे.

एक प्रश्न सहसा विचारला जातो की, नैराश्याची अशी कोणती अवस्था असते, ज्यामुळे माणसाला आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागतं?

डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेंटल डिसऑर्डर (DSM) मध्ये सुसाइडल बिहेवियर डिसऑर्डर (SBD) सादर करण्यात आला. संशोधनामध्ये आत्महत्येपूर्वी उद्भवणाऱ्या काही लक्षणांचा तपशीलवार उल्लेख केला आहे. आज आपण या लक्षणांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करुया.

अचानक कोणी आत्महत्या करत नाही : आत्महत्येसारखं मोठं पाऊल कोणीही अचानक उचलत नाही. तज्ज्ञांच्या मते, आत्महत्या करणारी व्यक्ती खूप दिवसांपासून आत्महत्येचा विचार करत असते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ (NIHM ) नुसार, कोणीही एवढ्या टोकाचं पाऊल सहजासहजी उचलत नाही. व्यक्ती या सर्व गोष्टींचा बराच वेळ विचार करत असतो. या संदर्भात, आपण आपल्या सभोवतालच्या लोकांच्या हालचालीवरुन काही चिन्हे ओळखू शकतो.

आत्महत्येचा विचार करण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीला दिसणारी काही चिन्हं खालील प्रकारचे असू शकतात :

आत्महत्येबद्दल बोलणं

मरण्याची इच्छा व्यक्त करणं.

लोकांध्ये उठता बसताना अपराधीपणा किंवा लाज वाटणं.

इतरांवर ओझं असल्याचा विचार करणं.

भावना

निराशा किंवा जगण्याचं कोणतंही कारण नसणं, अशी भावना मनात उत्पन्न होणं.

अत्यंत दुःखी, अधिक चिंताग्रस्त, उत्तेजित किंवा रागानं भरलेलं असणं.

असह्य भावनिक किंवा शारीरिक वेदना जाणवनं.

वर्तणुकीत बदल होणं.

मृत्यूची योजना बनवणं किंवा मृत्यूचा मार्ग शोधणं.

मित्रांकडून निरोप घेणं, महत्त्वाच्या गोष्टी देणं

खूप वेगानं वाहन चालवणं

मूड स्विंग्स

कमी खाणं किंवा कमी झोपणं

ड्रग्ज किंवा अल्कोहोल वारंवार घेण्याची इच्छा व्यक्त करणं

ही लक्षणं देखील उद्भवू शकतात

सतत दुःखी राहणं : लोक आत्महत्येसारखं मोठं पाऊल उचलण्यास तयार होण्याची अनेक कारणं आहेत. एनआयएचएमच्या मते, जे लोक नेहमी दु:खी असतात, त्यांच्यात आत्महत्या करण्याची शक्यता जास्त असते. त्यांच्या बोलण्यात दुःख आणि निराशेची भावना येणं हे स्पष्ट लक्षणं आहे. असे लोक नेहमी कोणत्याही गोष्टीबद्दल सकारात्मक विचार करण्याऐवजी निराशावादी विचार करतात.

सोशल मीडियापासून अंतर : आत्महत्या करणारी व्यक्ती आपल्या सभोवतालपासून दूर जाऊ लागते. असे लोक सार्वजनिक ठिकाणी जात नाहीत, लोकांशी अंतर राखत असल्याचे दिसून येते. इव्हेंट्समध्ये किंवा मित्रांसोबत आउटिंगमध्ये सहभागी होत नाहीत. तसंच सोशल मीडियासारख्या प्लॅटफॉर्मपासून स्वतःला दूर ठेवतात. अनेकदा असे लोक त्यांच्या जुन्या पोस्ट डिलीट करतात. जर एखादी व्यक्ती असे करत असेल, तर तो आत्महत्येसारखं मोठं पाऊल उचलण्याची शक्यता आहे. व्यक्ती इतर कारणांसाठी सोशल मीडिया टाळू शकते, परंतु या लक्षणांकडं कधीही दुर्लक्ष करू नये.

कशाची तरी भीती वाटणं : एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीच्या भीतीनं आत्महत्येसारखं मोठं पाऊल देखील उचलू शकते. तज्ज्ञांच्या मते अनेक प्रकरणांमध्ये, लोकांना कशाची तरी भीती आत्महत्या करण्यास भाग पाडते. उदाहरणार्थ, कोरोनाव्हायरसच्या उद्रेकादरम्यान, दिल्लीतील एका IRS अधिकाऱ्यानं विषाणूच्या भीतीनं अ‍ॅसिड पिऊन आत्महत्या केली.

आत्महत्या करण्यापूर्वी प्रिय व्यक्तीशी शेवटचं बोलण्याची इच्छा : आत्महत्या करण्यापूर्वी ती व्यक्ती आपल्या प्रिय व्यक्तीशी बोलण्याची इच्छा व्यक्त करते. आत्महत्येच्या बऱ्याच प्रकरणांमध्ये असं आढळलं आहे. अनेक प्रकरणांमध्ये, व्यक्ती आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या प्रियजनांची माफी देखील मागते. जर तुमच्या आवडत्या व्यक्तीनं तुम्हाला कॉल केला आणि तुमच्याशी वेगळ्या पद्धतीनं बोलत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की कॉलर अडचणीत आहे, तर त्याला त्वरित मदत करण्याचा प्रयत्न करा.

पॅनीक हल्ला : अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये, एखाद्या व्यक्तीला पॅनीक अटॅक येऊ लागतात. पॅनीक अटॅक हे आत्महत्येचं लक्षण मानलं जाऊ शकतं. तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला पॅनिक अटॅक आला असेल तर तुम्ही त्यांना मदत करावी.

पॅनीक अटॅक म्हणजे काय?

चिंता आणि भीती याला पॅनिक अटॅक म्हणतात. पॅनीक अटॅकमध्ये, एखादी व्यक्ती अचानक घाबरते.

पॅनीक हल्ल्याची लक्षणं

जास्त घाम येणं

चिंता

श्वास घेण्यात अडचण

गुदमरल्यासारखे वाटणं

चक्कर येणं किंवा डोकं हलकं वाटणं

थंडी जाणवणं

बेशुद्ध होणं

मृत्यूची भीती

ही लक्षणे ओळखून आपण आपल्या प्रिय व्यक्तीचे किंवा परिचितांचे प्राण वाचवू शकतो. लक्षात ठेवा कधीकधी अशा परिस्थितीत तुम्ही एखाद्या व्यक्ती सोबत बोलून जगण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करू शकता.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

संदर्भ

https://www.nimh.nih.gov/health/publications/warning-signs-of-suicide

(जर तुम्हाला आत्महत्येचे विचार येत असतील किंवा तुम्हाला एखाद्या मित्राची काळजी वाटत असेल किंवा तुम्हाला भावनिक आधाराची गरज असेल, तर स्नेहा फाउंडेशन - 04424640050 (24x7 उपलब्ध) किंवा iCall, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस हेल्पलाइन - 9152987821 सोमवार ते शनिवार सकाळी 8 ते 110 पर्यंत उपलब्ध आहे.

हेही वाचा: आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व - World Suicide Prevention Day 2024

Last Updated : Sep 15, 2024, 1:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.