ETV Bharat / health-and-lifestyle

व्हिटॅमीन डी च्या कमतरतेनं आरोग्य धोक्यात! 'हे' पदार्थ घ्या आहारात, किडनी राहील निरोगी - Vitamin D Rich Foods - VITAMIN D RICH FOODS

Vitamin D Rich Foods : व्हिटॅमीन डी आपल्या शरीरासाठी सर्वात आवश्यक पोषक घटकांपैकी एक आहे. आरोग्य सुरळीत राहण्यासाठी व्हिटॅमीन डी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. मात्र, पावसाळा आणि हिवाळ्यात पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही, अशा वेळी काही अन्नपदार्थ घेतल्यास शरीराला आवश्यक असलेले ‘ड’ जीवनसत्त्व मिळू शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ते पदार्थ कोणते हे पाहू.

Vitamin D Rich Foods
व्हिटॅमीन डी च्या कमतरतेनं आरोग्य धोक्यात! (CANVA)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Sep 10, 2024, 3:36 PM IST

हैदराबाद Vitamin D Rich Foods: जीवनसत्त्वे शरीरासाठी संरक्षणात्मक कवच म्हणून काम करतात. शरीराच्या आवश्यकतेनुसार जीवनसत्त्व न मिळाल्यास अवयवांच कार्य मंदावते. यापैकीच एक व्हिटामीन डी. शरीराच्या चांगल्या कार्यासाठी व्हिटीमीन डी फार महत्त्वाचं आहे. हाडांसह दातांच्या आरोग्यासाठी व्हिटामीन डी महत्वाची भूमिका बजावते. जीवनसत्त्वे डी ची कमतरता भासल्यास हेअर लॉस, थकवा, डिप्रेशन, विकनेस आणि भूक कमी होणं अशा समस्या उद्भवू शकतात. तसंच व्हिटामीन डी च्या कमतरतेमुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो. सुर्यांची किरणं व्हिटामीन डी मिळण्याचा मोठा स्त्रोत आहे. परंतु उन्हाळ्यात उन्हात बसणं शक्य नाही. पावसाळ्यात कमी प्रमाणात सुर्यप्रकाश मिळतो. तर, हिवळ्यामध्ये कोवळ्या उन्हात बसून आपण व्हिटामीन डी घेवू शकतो. परंतु कामाच्या व्यस्ततेमुळे ते देखील शक्य नाही, अशा परिस्थित व्हिटामीन ‘डी’ची मात्रा मुबलक प्रमाणात मिळण्यासाठी तुम्ही आहारात काही पदार्थांचा समावेश करु शकता.

मासे: फॅटी सॅल्मन, ट्यूना, मॅकरेल आणि सार्डिनमध्ये कॅल्शियम आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिडसह व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असतं, असं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या रिपोर्टमध्ये नमुद केलं आहे. पावसाळ्यात मासे खाल्ल्यानं व्हिटॅमिन डीची कमतरता टाळता येते.

मशरूम: सूर्यप्रकाशात पिकवलेल्या काही प्रकारच्या मशरूममध्ये व्हिटॅमिन ‘डी’चं प्रमाण जास्त असतं, असं प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ लक्ष्मी किलारू म्हणतात. तसंच, त्यात कॅल्शियम, B1, B2, B5 आणि तांबे असल्यानं ते पावसाळ्यात घेतले जाऊ शकतात.

अंडी: अंडी हे व्हिटॅमिन डी मिळवण्याचा उत्तम स्त्रोत आहे. अंडी व्हिटॅमिन डी आणि प्रथिनांनी समृद्ध आहेत. तसंच अंड्यातील पिवळं बलक जास्त प्रमाणात चरबीयुक्त असल्यानं दररोज एक अंड्यातील पिवळ बलक खाणं आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं

दूध आणि दही: दूध आणि दही शरीराला व्हिटॅमिन डी प्रदान करण्यात मदत करतात. तसंच, त्यात कॅल्शियम आणि प्रथिनं भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे, याचं सेवन करून तुम्ही व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेपासून स्वतःचं संरक्षण करू शकता.

पालक : पालकामध्ये अनेक पोषकतत्व आढळतात. त्यापैकी एक म्हणजे व्हिटामीन डी. पालकमध्ये अल्फा लिपोइक अ‍ॅसिड असतं त्यामुळे आजारांचा धोका कमी होतो.

अधिक माहितीकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

https://ods.od.nih.gov/factsheets/VitaminD-HealthProfessional/

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. दुध प्यायचा येतो कंटाळा? मग आहारात समाविष्ट करा 'हे' कॅल्शियम रिच फूड - Non Dairy Rich Calcium Foods
  2. भोपळ्याचे आश्चर्यकारक फायदे; नियमित बियांचं सेवन केल्यास पुरुषांमधील 'ही' समस्या होईल दूर - PUMPKIN SEEDS BENEFITS

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.