How To Deal With An Angry Wife: नवरा बायको म्हटलं की लहान-सहान गोष्टींवरून भांडणं होत राहतात. त्यानंतर रूसवा-फुगवा सामान्य आहे. ही नाराजी वेळीच दूर केली नाही तर नात्यात दूरावा निर्माण होतो. नात्याची रेशम गाठ नेहमी घट्ट असावी म्हणून वेळोवेळी जोडीदाराची समजूत काढावी लागते. परंतु बऱ्याच वेळा नवऱ्याला बायकोचा रुसवा दूर करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. कधी-कधी बायको रुसली कशाला याचं कारण देखील नवऱ्याला माहिती नसतं, अशा वेळी नवऱ्यांची फजिती होते. काय करावं काय नाही त्यांना कळत नाही. परंतु आम्ही दिलेल्या टिप्स फॉलो केल्यास तुम्ही आरामात बोयकोची नाराजी दूर करू शकता.
- माफी मागा: चूक कळाल्यास माफी मागा. माफी मागितल्यास कुणीही मोठं किंवा लहान होत नाही. यामुळे नात्यातील प्रेम वाढतं. तुमच्या एक सॉरीमुळे पत्नीचा राग कमी होवू शकतो. यापुढे चूक होणार नाही. पत्नीच्या भावना दुखावल्या जाणार नाही अशी खात्री करून द्यावी.
- शांत रहा: कुठल्यागोष्टीवरून वाद झाला? चूक कुणाची? यावर शांत बसून चर्चा करा. चर्चा केल्यास भांडण मिटू शकतात. दोघेही एकमेकांचं म्हणणं ऐकून घ्या. बायकोशी खोटं बोलले असाल तर त्याचं कारण सांगा. पत्नी रागावत असल्यास शांत राहा आणि तिचं बोलणं ऐकूण घ्या. तुम्ही देखील रागाच्या भरात बोलल्यानं भांडण वाढू शकतं. यामुळे शक्य तितकं शांत राहण्याचा प्रयत्न करा.
- सरप्राईज द्या: बहुतेक महिला सरप्राईज दिल्यास खूश होतात. यामुळे रागावलेल्या पत्नीला मनवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे सरप्राईज देणे. तुम्ही काहीही देवू शकता. जसं की पत्नीची आवडती वस्तू, एखाद्य फूल, चॉकलेट्स, साडी किंवा दैनंदिन जीवनात उपयोगात येणारी वस्तू सुद्धा तुम्ही देवू शकता. तसंच पत्नीसाठी एखाद खास रेसिपि घरीच तयार करुन तिला सरप्राईज देवू शकता. डिनरचा प्लॅन करा.
- आपुलकी दाखवा: प्रेमानं बोला आणि बोलता बोलता काही अशा गोष्टी बोला ज्यामुळे तिचा राग दूर होईल. दोघांच्या सहवासातील काही चांगले क्षण आठवा यावरून दोघातील प्रेम आणखी वाढेल. शिवाय तुम्ही मस्करी किंवा जोक्स मारून बायकोला हसवण्याचा प्रयत्न करा. बायकोला जाणीव करून द्या की, तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती ती आहे.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही.)