Karvi Flower : तब्बल आठ वर्षांनी फुलणाऱ्या कारवीनं सह्यद्रीच्या खोऱ्यात निळं शार गालिच्छा पसरला आहे. निसर्गाचा हा दुर्मिळ नजारा पाहाण्यासाठी, विकेंडमध्ये निसर्गप्रेमी सह्याद्री पर्वतरांगांवरील किल्ले आणि डोंगरावर गर्दी करत आहेत. सतत सात वर्ष वाढल्यानंतर एकदाच फुलणारी ही वनस्पती २०१६ नंतर आता २०२४ मध्ये बहरली आहे.
निळ्या-जांभळ्या रंगाची ही फुलं संपूर्ण डोंगर व्यापून घेते. प्रत्येकवर्षी पावसाच्या आगमनानंतर ही वनस्पती हिरवीगार होते. पावसाळा संपला की पानं गळून केवळ खोड शिल्लक राहतं. सतत सात वर्ष हा क्रम चालतो. त्यानंतर आठव्या वर्षी सप्टेंबर ते ॲाक्टोबरमध्ये ही झुडूपं जांभळ्या निळ्या फुलांनी बहरून जातात. यावेळी डोंगराचं हे दृश्य अवर्णनीय असतं. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य, फिल्मसिटी, खारघर हिल्स आदी ठिकाणी लोकांची वर्दळ पाहायला मिळत आहे.
कारवी ही औषधी वनस्पती असून दैनंदिन जीवनात त्याचे असंख्य फायदे आहेत.
- कारवीचं मध : कारवीच्या मधाचे अनेक फायदे आहेत. तसंच हे मध लहान मुल, वद्धांसाठी आणि महिलांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. तज्ज्ञांच्या मते, त्यांना हीमोग्लोबिन समस्या उद्भवत नाही. कारवीचं मध हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
- तोंडाला चव प्रदान करते : तोंडाला चव नसेल तर कारवी तोंडाला रूची प्रदान करते.
- आग होत नाही: कारवी हे थंड आयुर्वेदिक ओषधं आहे. कारवीचे कोंब खाल्ल्यानं अंगाची आग होत असेल तर शातं होण्यास मदत होते.
- लघवी करताना आग : लघवी करताना आग होत असेल तर कारवीच्या कोंबाची भाजी खावी. यामुळे लघवी करताना होणारी आग थांबते.
- कुष्टरोग तसंच खरूजसाठी उपयुक्त: कारवीचा रस घेतल्यास कुष्ठरोग आणि कोणत्याही कारणानं अंगावर उठलेली खरूज बंद होते. तसंच शरीरावरील सूजसुद्धा कारवीचा रस घेतल्यामुळे बरी होते.
- जखम बरी : जखम पिकून फुटली असेल आणि त्यातून पू वाहून जखम झाली असेल, तर कारवीची मूळं उकडून लावल्यास जखम बरी होते.
- शरीरावरील सुजेसाठी फायदेशीर : कारवीची मुळं उगाळून सुजेवर लावल्यास सूज ताबडतोब कमी होते. सुरजेसाठी कारवी रामबाण आहे.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)