ETV Bharat / health-and-lifestyle

गॅस,अपचनानं परेशान आहात? ट्राय करा 'हा' घरगुती आयुर्वेदिक उपचार - Ayurvedic Treatment For Indigestion

Ayurvedic Treatment For Indigestion : अपचनाची समस्या अनेकांना भेडसावते. काही लोक यापासून आराम मिळवण्यासाठी थेट औषधांचा वापर करतात. मात्र, आयुर्वेदात तयार केलेलं हे औषधं घेतल्यास अपचनाची समस्या दूर होईल असं तज्ज्ञ डॉक्टरांचं म्हणणं आहे.

Ayurvedic Treatment For Indigestion
अपचनासाठी आयुर्वेदिक घरगुती उपाय (CANVA)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Sep 7, 2024, 2:20 PM IST

Updated : Sep 7, 2024, 2:25 PM IST

हैदराबाद Ayurvedic Treatment For Indigestion: अयोग्य जीवनशैलीमुळे अपचन आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या वाढू लागल्या आहेत. नियमित बाहेरचं खाणं अथवा जेवणाच्या अनियमिततेमुळे पोट फुगल्या सारखं वाटतं. तसंच अपचन, आंबट ढेकर, गॅस यासारख्या समस्या जाणवतात. यामुळे चालणं देखील अशक्य होऊन जातं. काम करण्याची इच्छाही होत नाही. कितीही उपाय करा, काही फायदा होत नाही. परंतु या समस्येवर आयुर्वेदात उत्तम उपाय आहे आणि ते औषध सहजचं घरच्या घरी तयार करता येतं, असं प्रख्यात आयुर्वेदिक डॉक्टर गायत्री देवी यांनी सांगितलं. औषध तयार करण्याचे घटक आणि पद्धत जाणून घेऊया.

औषध तयार करण्यासाठी आवश्यक घटक

250 ग्रॅम कच्या आल्याचं पेस्ट

खळी साखर 275 ग्रॅम

5 ग्रॅम सुंठ पावडर

10 ग्रॅम चणा डाळ पावडर

10 ग्रॅम मिरे पावडर

5 ग्रॅम वेलची पावडर

मध

औषध कसे तयार करावे?:

एका पातेल्यात आल्याचं पेस्ट घ्या व ते गॅसवर शिजवून घ्या.

नंतर त्यात खडीसाखर घालून मंद आचेवर मिक्स होईपर्यंत उकळा.

त्यात सुंठ पावडर, मिरेपूड, वेलची पावडर आणि हडद पावडर घाला.

मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यास गॅस बंद करा. त्यानंतर त्यात मध घाला.

आयुर्वेदिक तज्ञ म्हणतात की, अपचन आणि बद्धकोष्ठतेनं त्रस्त असलेले लोक हे औषध घेऊ शकतात.

अपचनाच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी जेवणाच्या 10 मिनिटापूर्वी तयार झालेलं हे औषध एक चमचा घेण्याची शिफारस केली जाते.

औषधात वापरल्या जाणाऱ्या घटकांचे काय फायदे आहेत?

आलं: आपली वडीलधाऱ्या मंडळी अपचन झाल्यावर आलं खाण्यास सांगतात. कारण अद्रक पचन क्रिया सुधारतं आणि अपचनाची समस्या कमी करते, असं आयुर्वेदिक तज्ञांचं म्हणणं आहे.

चणा डाळ : आयुर्वेदिक तज्ञ म्हणतात की चण्यामध्ये पचन क्रिया सुधारणारे गुणधर्म असतात. याच्या सेवनानं अपचनाची समस्या कमी होते.

मिरेपूड : आरोग्याविषयक अनेक समस्यासाठी मिरपूड उपयुक्त आहे. संक्रमण कमी करण्यासाठी आणि शरीरातील अशुद्धता काढून टाकण्यासाठी मिरेपूड वापरले जातात. यात अपचनाची समस्या कमी करणारे गुणधर्म असल्याचं सांगितलं जातं.

वेलची: आयुर्वेदिक तज्ञ म्हणतात की मसालेदार वेलची अपचनावर उपचार करण्यासाठी चांगली आहे.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. मधुमेह नियंत्रणासाठी ज्वारी भाकरी लाभदायक, बघा 'टिप्स'! - Jowar Roti Recipe
  2. मेथी दाण्याचे आरोग्यदायी फायदे; मधुमेहासह वजनही राहील नियंत्रणात - Fenugreek Seed Water Benefits

Last Updated : Sep 7, 2024, 2:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.