हैदराबाद Tips To weight Loss : सध्या लहानांपासून मोठ्यापर्यंत वाढत जाणारं वजन ही मोठी समस्या झाली आहे. वाढत्या वयात चयापचय दर कमी होण्यास सुरुवात होते परिणामी पोटाची चरबी वाढू लागते. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर हार्मोन्समध्ये चढउतार होताना दिसतात. यामुळे आरोग्याशी निगडीत अनेक समस्या उद्धभवतात. बऱ्याच लोकांचं चाळीशीनंतर वजन वाढतं. मात्र, या वयात वाढलेलं वजन कमी करणं सर्वासाठी कठीण असतं. प्रसिद्ध सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. टी. लक्ष्मीकांत यांच्या मते, 40 वर्षांनतंर शरीराचं वजन कमी करायचं असेल तर आहारात काही सौम्य बदल करणे गरजेचं आहे. या वयात फळं आणि भाज्या पुरेशा प्रमाणात खाणं फायदेशीर ठरतं.
मांस, दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि संपूर्ण धान्याच्या तुलनेत फळं आणि भाज्यांमध्ये अधिक पोषक तत्व असतात. यामुळे कॅलरी आणि चरबी कमी करण्यास मदत होते. तसंच चरबी आणि कार्बोहायड्रेट्स असलेल्या स्नॅक्सपेक्षा ताजे धान्य खाणं कधीही उत्तम आहे. दुपाच्या वेळी जास्त भूक न लागावी म्हणून सकाळच्या नाश्त्यामध्ये डॉक्टर ओट्स, शेंगा आणि पचनास हलके पदार्थ खाण्याचा सल्ला देतात.
चहा, कॉफी, शीतपेये कमी करा : आपल्याला चहा, कॉफी घेण्याची सवय असते. परंतु चाळीशीनंतर या पेयांचं जास्त सेवन करणं धोकादायक आहे. कॉफी, चहा किंवा इतर शातपेय पिण्यापेक्षा ताजं पाणी पिणं केव्हाही उत्तम.
कॅलरी कमी करा : वजन कमी करायचं असेल तर कॅलरीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. चाळीशीनंतर शरीरात बरेच बदल होतात. म्हणून वाढत्या वयानुसार कॅलरीजचं प्रमाण थोडं कमी करण्याची गरज असते. अतिरिक्त कॅलरी घेतल्यास वजन वाढतो. त्यामुळे तुम्ही आहारात कमी कॅलरी घ्या.
व्यायाम करा : वजन कमी करण्याचं उत्तम मार्ग व्यायाम आहे. नियमित व्यायाम केल्यास कॅलरी बर्न होण्यास मदत मिळते. वजन कमी करायचं असेल तर चालणं हा सर्वोत्तम पर्याय आहे. चालण्याने हृदयाचं आरोग्य सुधारतं. तसंच रक्तदाब संतुलित राखण्यास मदत मिळते. याशिवाय रक्तातील साखरेचं प्रमाण सुधारण्यासाठी देखील चालनं महत्त्वाचं आहे.
योग, ध्यान करा : चाळीशीनंतर ताण जास्त असतो. परिणामी अस्वस्थता वाढते. यामुळे योग, ध्यान आणि इतर व्यायाम केल्यास तुम्ही निरोगी राहू शकता. नियमित व्यायाम केल्यानं ताणतणाव कमी होतो. तसंच झोपेसंबंधित समस्या देखील दूर होतात. वजन कमी करण्यासाठी चांगली झोप घेणं फार महत्ताचं आहे.
अंडी खा : आरोग्यासाठी अंडी सर्वोत्तम उपयुक्त पदार्थांपैकी एक आहे. यामध्ये कॅलरी, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए,बी, बी 6, ई तसंच बी 12 सारखे पोषक असतात. त्याचबरोबर व्हिटामिन डी मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे हाड बळकट होतात.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचकांसाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )