Maharashtrian Style Sabudana Khichdi : आपल्यापैकी बहुतांश जणांना साबुदाणा खिचडी खायला आवडते. साबुदाणा खिचडी अतिशय लोकप्रिय महाराष्ट्रीयन उपवासाचा खाद्यपदार्थ आहे. उपासाच्या दिवशी ही खिचडी बनवली जाते. उपास असो वा नसो साबुदाणा खिचडी खायला सर्वच आतुर असतात. साबुदाणा खिचडीची गोष्टच खास आहे. उपवासाव्यक्तीरिक्त सकाळी नाश्त्याकरिता देखील साबुदाणा खिचडी बनवली जाते. परंतु अनेकांना खिचडी बनवता येत नाही. बनवण्याची योग्य पद्धत माहिती नसल्यामुळे अनेकांचा साबुदाणा चिकट होतो आणि त्याचा लगदा तयार होतो. खिचडी मऊ आणि मोकळी असेल तर खायला औरच मजा येते. चला तर मग जाणून घेऊया मऊ आणि लुसलुशित साबुदाणा खिचडी कशी बनवायची.
साहित्य
- 1 कप मोठ्या आकाराचा साबुदाणा
- 1 चमचा तुप
- 2,3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- भाजलेल्या शेंगदाण्याची कूट
- 1/2 टीस्पून जिरे
- चवीनुसार मीठ
- 1 बटाटा
कृती
- साबुदाणा 2 ते 3 वेळा चांगला स्वच्छ धुवून घ्या.
- धुतलेला साबुदाण्यात पाणी ओतून एक ते दीड तास तसाच पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर पाणी काढून टाका आणि साबुदाणा रात्रभर भिजत ठेवा.
- सकाळी साबुदाणा जास्त कोरडा वाटत असेल तर त्यात एक दोन चमचे पुन्हा पाणी घाला. साबुदाणा मिक्स करून बाजूला ठेवा.
- आता कढई गरम करा
- कढईमध्ये तूप घाला आणि गरम करून घ्या. त्यानंतर त्यात जिरे टाकून चांगल परतून द्या.
- साबुदाणा तयार करताना गॅस फ्लेम नेहमी मध्यम ठेवा.
- जिरे फॉय झाल्यानंतर त्याच चिरलेली हिरवी मिरची व्यवस्थित परतून घ्या.
- नंतर यात बटाटा घाला आणि कढई झाकून ठेवा.
- बटाटे शिजल्यानंतर त्यात भिजलेला साबुदाणा, शेंगदाण्याचे कूट, चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. त्यानंतर हे मिश्रण झाकून शिजू द्या.
- झाकन काढून साबुदाणा चांगला मिक्स करून घ्या.
- 10 मिनिट झाल्यानंतर मिश्रणामध्ये कोथिंबीर घाला आणि चागलं मिक्स करून घ्या. आवडत असल्यास लिंबाचा रस देखील घालू शकता.
- आता तुमची साबुदाणा खिचडी तयार आहे. मऊ आणि लुसलुशित खिचडी दह्यासोबत खाऊ शकता.