How Much Time Walking Per Day: How Much Time Walking Per Day: चालणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी व्यायामाचा प्रकार आहे. हृदयाच्या आरोग्यापासून ते मानसिक आरोग्यपर्यंत याचे अनेक फायदे होत असल्याचे तज्ञांचं म्हणणे आहे. नियमित चालण्यामुळे तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहू शकता. चालण्यासंदर्भात अमेरिकन प्रशिक्षक बेथनी रुटलेज यांनी वयानुसार किती चालावं याबद्दल माहिती दिली आहे.
- 18-30 वर्षे: तरुण वर्ग स्थायूंच्या ताकदीमुळे खूप उत्साही राहतात. तज्ञांच्या मते, ते दिवसातून 30 ते 60 मिनिटं सहज चालू शकतात, असं केल्यानं वजन नियंत्रणात राहते. शिवाय तणाव कमी होतो आणि हृदयाचं आरोग्य देखील सुधारते. बैठे काम करणाऱ्यांनी तर न चुकता नियमित चालावं असा सल्ला तज्ञांनी दिलाय.
- 31-50 वर्षे: या वयोगटातील लोकांनी नियमित 30 ते 45 मिनिटं चालेलं पाहिजे. यामुळे स्नायू मजबूत होतात तसंच वजन देखील नियंत्रणात राहते, असं म्हटलं जाते. चालल्यामुले केवळ जुनाट आजारांपासून संरक्षण होत नाही तर, मानसिक दृष्ट्या शांतता मिळते. लंच ब्रेक दरम्यान आणि कामावर काही फ्री वेळ मिळतो अशा वेळी चालण्याचा सल्ला तज्ञांनी दिलाय.
- 51-65 वर्षे: या वयोगटातील लोकांसाठी 30 ते 40 मिनिटं चालणं पुरेसे आहे. शरीरातील बदलांमुळे या वयातील लोकांचे स्नायू आणि पचनसंस्थेचे कार्य कमी होते. यामुळे व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. परिणामी हाडे आणि सांधे निरोगी राहतात. गरज भासल्यास काठीच्या मदतीने तुम्ही चालू शकता. दुखापती टाळण्यासाठी चालताना प्री-वॉकिंग वॉर्म-अप आणि पोस्ट-वॉकिंग कूल-डाउन क्रियाकलापांचा सल्ला दिला जातो.
- 66-75 वर्षे: या वयोगटातील लोकांना दररोज 20-30 मिनिटं चालण्यामुळे बरेच फायदे होतात. या वयात चालण्यात समतोल राखून दुखापती टाळता येतात, असं म्हणतात. त्यामुळे हृदयविकारांपासून बचाव होतो. तसंच अनेक अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, चालण्यामुळे वृद्ध लोकांची स्मरणशक्ती सुधारू शकते. जुनाट आजार आणि सांधेदुखी असलेल्या लोकांना प्रत्येकी 15 मिनिटांच्या दोन सत्रात चालण्याचा सल्ला दिला जातो.
- तज्ञांचे म्हणणे आहे की 75 वर्षांवरील ज्येष्ठांनी 15-20 मिनिटे चालले तरी त्यांचे सांधे आणि स्नायू निरोगी राहतील.
संदर्भ
https://www.nhs.uk/live-well/exercise/physical-activity-guidelines-for-adults-aged-19-to-64/
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)