Green Tomatoes Health Benefits: बरेच जण टोमॅटो घातल्याशिवाय भाजीची कल्पना देखील करू शकत नाही. प्रत्येक भाजीमध्ये टोमॅटो असतोच असतो. टोमॅटो खाणं आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. त्यामुळे कित्येक लोक फक्त भाजीच नाही तर टोमॅटोचं सूप, सॅलड, ज्यूस म्हणूनही वापर करतात. आपण रोजच्या भाज्यांमध्ये फक्त लाल टोमॅटोचा वापर करतो. परंतु तुम्हाला माहिती आहे काय? बाजारात मिळणारं हिरवं टोमॅटो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हिरव्या टोमॅटोमध्ये पोटॅशियम, प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन के, बीटा केरोटीन, मॅग्नेशियम, अॅंटिऑक्सिडंट्स सारखे पोषक घटक असतात. रक्तदाब, सर्दी, फ्लू, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याकरिता हिरवं टोमॅटो उपयुक्त आहे. याशिवाय डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्याकरिता हिरवं टोमॅटो उत्तम आहे.
- रोगप्रतिकार शक्ती वाढवते: हिरव्या टोमॅटोमध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते. यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. तसंच यात पुरेशा प्रमाणात अॅंटिऑक्सिडंट्स असतात. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे उपयुक्त आहे. यामुळे तुम्ही सर्दी, फ्लू आणि इतर आजारांपासून दूर राहू शकता.
- डोळ्यासाठी फायदेशीर: डोळ्याच्या आरोग्यासाठी हिरवं टोमॅटो उपयुक्त आहेत. हिरव्या टोमॅटोमध्ये बीटा कॅरोटीन पुरेशा प्रमाणात आढळतात. यामुळे डोळ्याचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. तसंच हिरव्या टोमॅटोच्या सेवनामुळे दृष्टी दोष दूर होवू शकतो. त्याचबरोबर डोळ्यासंबंधित इतर आजारांवर देखील हिरवे टोमॅटो रामबाण आहेत.
- बद्धकोष्ठतेसाठी फायदेशीर: टोमॅटोमध्ये मुबलक प्रमाणात पाणी असते. जे दीड ग्रॅम फायबर पोषक तत्त्व प्रदान करतात. तसंच हिरव्या टोमॅटोमध्ये अघुलनशील आणि विरघळणार असे दोन्ही संयुगे आढळतात. यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. परिणामी बद्धकोष्टतेची समस्या दूर होते.
- बीपी: हिरव्या टोमॅटोमध्ये पोटॅशियम जास्त आणि सोडीयम कमी प्रमाणात असते. यामुळे रक्तवाहिन्या खुलतात. परिणामी रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होवून रक्तदाब नियंत्रणात राहतं.
- त्वचेसाठी चांगलं: वाढत्या प्रदूषणामुळे त्वचेचं संरक्षण करायंच असेल तर हिरवे टोमॅटो उपयुक्त आहेत. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते. यामुळे त्वचेसंबंधित समस्या दूर होवू शकते.
संदर्भ
https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC7589907/
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)