हैदराबाद Energy Drink Side Effects : धावपळीच्या जीवनात दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी बहुतांश लोक एनर्जी ड्रिंक पितात. शक्य तितक्या लवकर या कॅन किंवा बाटलीचा नाद सोडणंच तुमच्या हिताचं आहे. कारण या ड्रिंकमुळे तुमच्या हृदयावर आणि एकूणच आरोग्यावर गंभीर परिणाम होवू शकतो. एनर्जी ड्रिंक्समध्ये कॅफेन सर्वात जास्त प्रमाणात असतो. यामुळे तुम्हाला अस्वस्थता, निद्रानाश, हृदयाचे ठोके वाढणे यासारखे आजार उद्भवू शकतात. कोणतीही एनर्जी ड्रिंक घेण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचं आहे.
एनर्जी ड्रिंक्स प्यायल्यानं हृदयाची गती वाढते. एखाद्याला पूर्वापासून हृदयाच्या समस्या असल्यास त्यांना एनर्जी ड्रिंक्स पिताना सावधगिरी बाळगणे महत्तावचं आहे. शिवाय एनर्जी ड्रिंक्समध्ये साखरेचं प्रमाणही जास्त असतं. त्यामुळे दातांचे एनॅमल खराब होवू शकते. त्याचबरोबर कॅव्हिटी सारख्या समस्या तोंड वर करू शकतात. शरीरात साखरेचं प्रमाण अति झाल्यास साखरेचं यकृतातील फॅटरमध्ये रुपांतर होवून चरबी यकृतामध्ये जमा होवू लागते. एनर्जी ड्रिंकच्या जास्त सेवनामुळे मानसिक आरोग्य देखील बिघडते.
आरोग्यावर काय परिणाम होतो?
कॅफीन : हा एक यामधील प्रमुख उत्तेजक पदार्थ आहे. याचा अति सेवनामुळे हृदयाची धडधड आणि उच्च रक्तदाब होवू शकतो.
टॉरिन : एनर्जी ड्रिंक्समध्ये कॅफीन सोबतच टॉरिन देखील मिक्स केलं असतं. यामुळे हृदयाची गती आणि रक्तदाब वाढते.
गुआरना : यामध्ये अधिक प्रमाणात कॅफिन असतं.
जिनसेंग: हे जरी आरोग्यासाठी फायदेशीर असेल तरी याच्या अति सेवनामुळे पोटाशी निगडीत समस्या उद्भवू शकतात. तसंच डोकेदुखी आणि झोप नीट न येणे आदी समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
साखरेची पातळी वाढवते : एनर्जी ड्रिंक्सचं अति प्रमाणात सेवन केल्यानं रक्तातील साखरेची पातळी वाढते. परिणामी तुम्ही लठ्ठ होवू शकता. तसंच त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
व्हिटॅमिन बी: व्हिटॅमिन बी आवश्यक आहे, परंतु जास्त प्रमाणात आरोग्यावर दुष्परिणाम होते. विशेषतः यकृत आणि मूत्रपिंडाची समस्या असलेल्या लोकांना प्रभावित करते.
कृत्रिम स्वीटनर्स : साखरेचा पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम स्वीटनर्समुळे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी धोका निर्माण होऊ शकतो.
एनर्जी ड्रिंक्सचे घटक जाणून घ्यावे : तुम्ही पिणारे एनर्जी ड्रिंक हे फायदेशीर ठरावं म्हणून त्यात समाविष्ट घटकांची चांगल्यानं माहिती करून घ्यावं.
हेल्दी एनर्जी ड्रिंक चॉईसेस: हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर झोप, निरोगी खाणे आणि पेये यांसह तुमची ऊर्जा पातळी वाढवा.
तुमच्या शरीराचं ऐका : युवक आणि मुलांमध्ये एनर्जी ड्रिंक्सी पिण्याची क्रेझ वाढत चालली आहे. जर एनर्जी ड्रिंक्स प्यायल्यानं तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर याचं सेवन करणे थांबवा.
डॉक्टरांचा सल्ला घ्या: एनर्जी ड्रिंक्स घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या, विशेषतः जर तुम्हाला हृदयाची समस्या किंवा उच्च रक्तदाब असेल. एनर्जी ड्रिंक्सचे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. यामुळे एनर्जी ड्रिंक्सचे संभाव्य धोके लक्षात घेता डॉक्टरांच्या सल्ला घेणे गरजेचं आहे.
अधिक माहितीकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )