Neck blackness: काळवंडलेल्या मानेमुळे अनेक जण त्रस्त आहेत. ही एक सामान्य समस्या आहे. काळवंडलेल्या मानेमुळे तरुणांमध्ये सार्वजनिक ठिकाणी कॅान्फिडन्सचा स्तर खालावतो. योग्य ग्रूमिंग न करणं, वायू प्रदूषण आणि इतर कारणांमुळे मान काळी पडते. विविध उपाय करूनही मानेचा काळपटपणा काही केल्या जात नाही. परंतु त्यासाठी तुम्हाला कोणत्याही क्रीम किंवा लोशनची गरज नाही. तुम्ही घरबसल्या या समस्येपासून मुक्त होऊ शकता. यावर तज्ञांनी काही घरगुती उपाय सांगितले आहेत, ज्याचा फायदा तुम्हाला अवश्य होईल.
- दही आणि लिंबाचा रस: मानेवरील काळसरपणा दूर करण्यासाठी दही आणि लिंबाचा रस हा एक चांगला उपाय आहे. एका भांड्यात दोन-तीन चमच दही घ्या. त्यात लिंबाचा रस घाला. हे मिश्रण मानेवर लावा आणि 10 ते 15 मिनिटं ठेवा. ते कोरडं झाल्यानंतर मान स्वच्छ धुवा. दही त्वचेला मॉइश्चरायझ आणि स्वच्छ करण्यास मदत करते.
- लिंबाचा रस: कॉटन बॉलमध्ये लिंबाचा रस घ्या आणि मानेवरील काळ्या डागांवर लावा. 20 मिनिटांनंतर स्वच्छ धुवा. लिंबाचा रस नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून काम करतो. जो त्वचेवरील मृत पेशी आणि तेल काढून टाकतो.
- खोबरेल तेल: खोबरेल तेलात थोडं पाणी मिसळून मानेवर मसाज करा. काही वेळाने कोमट पाण्यानं स्वच्छ धुवा. हे ब्लॅकहेड्स कमी करण्याचं काम करतं. खोबरेल तेलाऐवजी तुम्ही बदामाचं तेल किंवा ऑलिव्ह ऑईल देखील वापरू शकता.
- लिंबाचा रस आणि गुलाबजल: लिंबाच्या रसामध्ये समान प्रमाणात गुलाबजल मिसळा आणि हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी मानेवर लावा. सकाळी उठून थंड पाण्यानं मान धुवा. नियमित असं केल्यास मानेवरचा काळसरपणा हळूहळू कमी होईल.
- कोमट बदाम तेल: एका भांड्यात बदामाचं तेल कोमट करून मानेच्या काळ्या भागावर १० मिनिटं मसाज करा. यामुळं तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. आपल्या दैनंदिन दिनचर्येत या घरगुती उपायांचा समावेश करून, आपण आपल्या मानेवरील काळे डाग दूर करू शकता.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)