हैदराबाद Dengue Disease Severe Symptoms : पावसाळ्यात डेंगी, टायफॉईड सारखे आजार प्रामुख्यानं डोकं वर करतात. सध्या देशामध्ये डेंगीच्या रुग्णामध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. डेंगी हा रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून होणारा विषाणूजन्य आजार आहे. डासांची एडिस इजिप्ती प्रजाती डेंगी पसरवण्यास कारणीभूत असते. डेंगीची सहसा सौम्य लक्षणं दिसतात किंवा कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. काही प्रकरणांमध्ये डेंगी गंभीर आणि संभाव्य प्राणघातक ठरू शकतो. अशा परिस्थितीत जर एखाद्याची रोप्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर हा त्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न ठरू शकतो. डेंगीची सामान्य आणि गंभीर लक्षणे आणि त्यापासून बचावासाठी कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊयात.
सामान्य लक्षणं : डेंगी ताप साधारणतः संक्रमित डास चावल्यानंतर सुमारे 3 ते 10 दिवसांनी दिसून येतो. जागतिक आरोग्य संघटनेनेच्या मते ही लक्षणं 2-7 दिवस राहू शकतात. त्यात खालील लक्षणांचा समावेश अशू शकतो.
- स्नायू आणि सांधेदुखी
- तीव्र डोकेदुखी
- उच्च तापमान 40°C (104°F) पर्यंत पोहोचू शकते.
- डोळ्यांच्या मागे वेदना
- पुरळ
- मळमळ आणि उलट्या
- सुजलेल्या ग्रंथी
रीइन्फेक्शनचा वाढलेला धोका : दुसऱ्यांदा डेंगीची लागण झालेल्या लोकांना गंभीर स्वरुपाचा डेंगी होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे खबरदारी घेणं गरजेचं आहे. त्यात खालील लक्षणांचा समावेश असू शकतो.
थकवा आणि अस्वस्थता
- तीव्र पोटदुखी
- सतत उलट्या होणे
- अत्यंत तहान
- जलद श्वास घेणे
- अशक्तपणा
- हिरड्या किंवा नाकातून रक्तस्त्राव
- उलट्या किंवा लगवीतून रक्त बाहेर पडणं
- फिकट गुलाबी आणि थंड त्वचा
डेंगीपासून बरं झाल्यानंतरची खबरदारी : वरील गंभीर लक्षणं दिसू लागल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. डेंगीचा सामना करण्यासाठी त्वरित उपचार आणि काळजी घेणं गरजेचं आहे. डेंगीमधून बरे झाल्यानंतर, एखाद्या व्यक्तीला अनेक आठवडे थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. या कालावधीत विश्रांती घेणं आणि हायड्रेटेड राहणं महत्वाचं आहे.
आहारात हे घ्यावं : डेंगी झालेल्यांनी आहारावर काटेकोर लक्ष दिलं पाहिजे. आहारात ताजी फळं, बीन्स, भाज्या, कडधान्य, डाळी, नट्स यांचा समावेश असावा. पपईच्या पानांचा रस पिणं फायदेशीर आहे. नारळ पाणी तसं लिंबूवर्गीय फळं पुरेशा प्रमाणात घ्यावं. तेलकट तसंच मसालेदार काही खाऊ नये.
अधिक माहितीकरीता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://www.who.int/news-room/fact-sheets/detail/dengue-and-severe-dengue
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचकांसाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )