ETV Bharat / health-and-lifestyle

कच्च्या घाण्याचं तेल आरोग्यासाठी खरंच फायदेशीर असतं का? जाणून घ्या, आहारतज्ज्ञ काय म्हणतात? - Cold pressed oils - COLD PRESSED OILS

cold pressed oils : कच्चा घाण्याचं तेल आरोग्यासाठी जास्त चांगलं असतं, असं आपण अनेक वेळा ऐकलंय. पण हे तेल खरंच आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? याचं सेवन केल्यानं काय फायदा होतो? यावर सविस्तरपणे माहिती आहारतज्ञ डॉ. प्रीती कांबळे यांनी दिली.

cold pressed oils
cold pressed oils (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 27, 2024, 11:35 AM IST

चंद्रपूर Benefits of cold pressed oils : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणं, एक मोठं आव्हान ठरतं आहे. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचे प्रयोग होताना दिसत आहेत. अशातच कच्चा घाण्यातून तयार झालेले तेल खाण्याचा ट्रेण्ड सुरू झाला. आपल्या आरोग्याबाबत दक्ष असणारे लोक आता बाजारात मिळणारे रिफाईन ऑईल खरेदी न करता त्यांचा कल आता कच्चा घाणाच्या तेलाकडे वळला आहे. हे कच्चा घाण्याचे तेल खरंच आरोग्यवर्धक आहे का? याचं सेवन केल्यानं काय फायदा होतो? बाजारात मिळणारे रिफाईन ऑइल हे आणि त्यात करण्यात येणारे दावे यात किती सत्यता असते, यावर आहारतज्ञ डॉ. प्रीती कांबळे यांनी सविस्तरपणे माहिती दिली.

कच्चा घाणीच्या तेलाचे आरोग्यदायी फायदे (Source - ETV Bharat Reporter)

कच्चा घाणाच्या तेलाचे प्रकार : कच्चा घाण्याचे हे तेल हे लाकडी घाण्यातून काढलं जाते. त्यामुळं ते अस्सल आणि शुद्ध असते. यामध्ये खोबऱ्याचं तेल, जवस तेल, तिळाचं तेल, सुर्यफुलाचं तेल, मोहरी, शेंगदाणा आणि बदाम तेलाचादेखील समावेश असतो. आपल्या आवडीनुसार हे तेल काढता येतं.

कच्चा घाणाच्या तेलाचे फायदे : कच्चा घाण्याचे तेल हे लाकडी घाण्यातून तयार केलं जातं. लाकूड हे आगीचे गतिरोधक असल्यानं यात बियाण्याचं तापमान हे वाढत नाही. त्यामुळं या तेलात जीवनसत्त्वे कायम असतात. कच्चा घाणाच्या तेलात व्हिटॅमिन ई, सी, ए आणि के ही जीवनसत्त्वे कायम असतात. सोबत अनेक प्रकारचे मिनिरल्सदेखील यात शाबूत असतात. हे तेल घातक रसायनापासून पूर्णपणे मुक्त असते. यात महत्वाचे आरोग्यवर्धक फॅटी असिड्स असतात. ते शरीराचे वजन नियंत्रित करण्यास मदत करतात. हृदयासाठी हे तेल अत्यंत गुणवर्धक आहे. हे तेल चांगले कोलेस्टेरॉल वाढवते. तसचे अपायकारक कोलेस्टेरॉल कमी करते.

रिफाईन ऑईलचे तोटे : रिफाईन ऑईल हे कच्चा घाणाच्या तेलाच्या तुलनेत स्वस्त असतं. मात्र, ते आरोग्याच्या दृष्टीनं फारसं चांगलं नसतं. सध्या बाजारात अनेक ब्रँडचे तेल उपलब्ध आहेत. सोयाबीन तेल, शेंगदाणा तेल, राईस ब्रँन तेल, सुर्यफुल तेल अशा अनेक प्रकारचे रिफाईन तेल बाजारात उपलब्ध आहेत. मात्र या तेलाची तयार होण्याची प्रक्रिया हे आरोग्याच्या दृष्टीनं अपायकारक आहे. या तेलाचा गंध आणि चव जावी यासाठी त्यावर अनेक रासायनिक प्रक्रिया पार पाडल्या जातात. तेल जास्त तापविल्यानं त्यात अनेक बदल होतात. हे तेल जवळपास 200 डिग्रीपर्यंत तापवलं जातं. या तेलाला आणखी पातळ करण्यासाठी प्रक्रिया केली जाते. त्यामुळं याचा सातत्यानं केलेला वापर हा आपल्या शरीरासाठी अपायकारक ठरू शकतो.

पाम ऑइलचा उपयोग : सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे रिफाईन ऑइल उपलब्ध आहेत. त्यात सर्वाधिक पाम ऑइलचा वापर होतो. कारण, हे तेल सर्वाधिक स्वस्त असते. मात्र ते खाण्यासाठी तितकंच जोखमीचं आहे. या तेलाचा अधिक वापर अनेक आजाराचं कारण ठरू शकतं. कारण यात 50 टक्के सॅच्युरेटेड फॅटशिवाय यात एलडीएलचं प्रमाण अधिक असतं. जे हृदयासाठी घातक असते.

...तर कच्चा घाण्याचं तेलदेखील महागात पडू शकतं : कच्चा घाण्याचं तेल सेवन करणे, हे आरोग्यासाठी चांगले आहे. मात्र प्रमाणात घ्यावे. कच्च्या घाणाच्या तेलाचा अतिरेकी वापर केल्यास हे तेलदेखील अपायकारकच ठरते. अशा तेलात तळलेले पदार्थ खाल्ल्यानं इतर तेला इतकाच अपाय होऊ शकतो. त्यामुळं याचा संतुलित वापर होणं आवश्यक आहे. चार जणांच्या कुटुंबात महिन्यात तीन लिटर इतकेच तेल वापरावं. त्यापेक्षा अधिक वापरल्यास अनेक शारीरिक व्याधी उत्पन्न होण्याचा धोका असतो, असं आहारतज्ज्ञ डॉ. प्रीती कांबळे यांनी मत व्यक्त केलं.

(Disclaimer- ही सामान्य माहिती असून वाचकांनी त्याचा वापर करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)

हेही वाचा

  1. मधुमेहींचा डायट चार्ट कसा असावा? जाणून घ्या सर्वकाही - Best Foods For diabetes
  2. कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय; 'गोबी मंचुरियन' आणि 'कॉटन कँडी' नंतर आता कबाबमध्ये कृत्रिम रंगांवर बंदी! - Artificial Colors In Kebabs
  3. कमीत कमी काळजी आणि घरातील सजावटीसाठी लावा 'ही' झाडे - stress free greenery
  4. काही केल्या चहा पिणं सुटता सुटत नाही? मग 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा, होणार नाही नुकसान - Health Tips

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.